अ‍ॅना हॉफमन. वय वर्षे २६. गोरीपान ब्रिटीश तरूणी.
दिसताक्षणी कुणालाही भुरळ पडेल अशीच.
अंगाने भरलेली आणि आजच्या आधुनिक जमान्यातील परफेक्ट फिगर असलेली.
तीची आई भारतीय आणि वडील ब्रिटीश. अ‍ॅना लहान असतांनाच वडीलांचा मृत्यु झालेला. वडील जहाजावरील टेलीकॉम इंजिनीयर होते. आईने त्यानंतर लग्न केले नाही.

एकाकीपणा दूर करण्यासाठी आणि थोडेफार पैसे मिळवण्यासाठी तीने लायब्ररीयन म्हणून जॉब पत्करला होता.

अ‍ॅना एन. एच. एस्. मध्ये डॉक्टर. लंडनला असताना एकदा रिपोर्टींग करता करता अमेय जखमी झाला होता.

जेव्हा त्याला अ‍ॅना कडे योगायोगाने उपचारासाठी नेण्यात आले होते, त्यावेळेस दोघांमध्ये आकर्षण निर्माण झाले होते. प्रेम बसले. एकमेकांवर. ओळख पाळख झाली. त्याने त्याच्या मॅनेजरला यु. के. मध्ये सेटल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणजे अ‍ॅनासोबत रहायला मिळेल आणि मुंबईला त्याने एक फ्लॅट घेतलेला होताच. दोघांनी लग्नानंतर यु.के. ला रहायचे की भारतात हे अजून त्यांनी ठरवले नव्हते.
ती हौस म्हणून काही सिरियल आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये काम करत असे.

अ‍ॅना च्या भारतीय आईशी - रोझी डिमेलो शी सुद्धा त्याची ओळख झाली होती आणि अमेय तीलाही पसंत होता.

त्याच्या पसंतीला घरच्यांचा होकार मिळणार हे त्याने गृहीत धरले होते. तसे त्याने घरी स्पष्ट सांगितले नव्हते पण, थोडीशी कल्पना दिली होती.

..
लंडन आय जवळ वाट बघत असतांना त्याने तीला फोन लावला.

ती त्याच्या जवळपासच होती आणी पोहोचतच होती. तीला पाहाताच त्याने तीला मिठी मारली. तीचा किस घेतला. नंतर बराच वेळ तेथे स्तब्धता होती आणि ते दोघे एकमेकांकडे नुसते नि:शब्द बघत होते...

भानावर आल्यानंतर ते बोलू लागले. त्यांनी पुन्हा एकदा "लंडन आय" मधून लंडन एन्जॉय करायचे ठरवले.

एका काचेच्या सेल मध्ये ते बसले. लंडन शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. तो सेल अगदी हळूहळू वर चढत होता.

"
अ‍ॅना, मला तुला एक सांगायचे आहे!"

"
बोल ना, लाडक्या!"

"
मी तुला मागे एकदा लहानपणी भारतात भेटलेल्या एका मुलीबद्दल सांगितले होते. माझे पहिले प्रेम...त्याबद्दल मी तुला सविस्तर बोलेलो नव्हतो..पण?"

"
सोन्या! अरे, काही सांगायची गरज सुद्धा मी समजत नाही. मला तुझ्यावर विश्वास आहे, आणि सविस्तर मला ऐकायचे नाही. आता ते संपलं असे तूच म्हणाला होतास ना?"

"
हो गं. ते संपलं...पण, योगायोगाने त्याच ठीकाणी नेमके मला कामानिमित्ताने जायले मिळते आहे, त्यानिमित्तने माझ्या मागच्या सगळया आठवणी परत जाग्या झाल्यात. असं वाटतंय की ..."

"
हे बघ. तुला जर सांगावेसे वाटत असेल तर सांग. त्याने मन मोकळे होणार असेल तर जरूर सांग. आणि तेथे जाण्याने जर का तुला त्रास होणार असेल तर .. नकोच जावूस. नाही सांग त्यांना ..ती असाईनमेंट स्वीकारु नकोस!"

"
तसे नाही गं. तसे तर त्या मुलीबद्दल सत्य कळल्यानंतर मी तीला विसरलो सुद्धा होतो. पण त्या घटनेबद्दल मला असे काही तुला सांगायचे आहे., जे मी तुला आजपर्यंत सांगितले नव्हते.!"

"
सांग ना राजा. मी तुझीच आहे ना!"

अमेय ने सांगायला सुरूवात केली.

"
तेव्हा मी वीस वर्षांचा असेन. माझ्या वडीलांचे भाऊ मिस्टर अशोक हे भारतातल्या मध्य प्रदेशातल्या एका छोट्याश्या खेड्यात - आसंद येथे राहातात. त्यांची तेथे शेत्ती असल्याने आणि ती व्यवस्थित पैसा मिळवून देत असल्याने ते तेथेच असतात.
त्यांच्या वडीलांसोबत. मी एकदा सुट्टीत तेथे गेलो होतो.
सोबत माझा मित्रही होता- जितिन.

तेथून जवळच असलेले शर्वरी जंगल - आणि त्याजवळचा जार्वार पर्वत.

नाफ्ट चॅनेलने आयोजीत केलेल्या तीन्ही जागतीक पातळीवरच्या ऑनलाईन परिक्षा मी नुकताच पास झालो होतो. टेलीफोनीक इंटरव्ह्यू ही झाला होता. माझ्यासारखे अनेक जण सिलेक्ट झाले होते. आता वेळ होती प्रत्यक्ष साहसाची.
ती डॉक्युमेंटरी नव्याने सुरु झालेल्या त्या चॅनेलकडे सिलेक्शनसाठी पाठवण्यात येणार होती. त्यासाठी खुप स्पर्धक होते. ते ही वेगवेगळ्या ठीकाणांहून वेगवेगळे फिल्मस बनवून आणणार होते.

या फिल्म साठी मी खुप मेहेनत घेणार होतो. सहाजिकच मी हे हक्काचे ठीकाण निवडले जेथे जास दिवस रहाता येईल्..आणि माझ्या मित्राला सहज सोबतीला म्हणून मी आणले होते. आम्ही आजोबांच्या घरापासून दूर पर्वताच्या पायथ्याशी आमचा तंबू वसवला होता. तसा आजूबाजूला धोका नव्हता. मोबाईल सोबत होतेच. कॅमेरा आणि इतर आधुनिक साहित्य होते. पण पर्वताच्या आसपास वस्ती नव्हती. सकाळी दहा वाजता तंबू बसवून पूर्ण झाला. आजचा तो दिवस साहसपूर्ण असणार होता...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel