जितिन शर्मा. आसंद गावतला एक सरकारी नोकर. एक वर्षापूर्वीच लग्न
झालेला.
ओपन
जीपमध्ये मागच्या बाजूस अमेय दोन्ही हात डोक्यामागे ठेवून मस्त आकाशाकडे बघत होता
आणि जितिन जीप चालवत होता.
गावातल्या
गल्ल्यांनधून जीप वळणे घेत घेत जात होती.
जितिन -
"काय मग, अमेय. काय
म्हणतं लंडन आणि अंग्रेजी मेम मतलब, हमारी होनेवाली भाभी?"
अमेय-
" बस. सगळं ठीक. एकदम झकास. आणि कामानिमित्ताने येथे प्रथमच मी एखादी फिल्म
शूट करणार आहे."
जितिन-
" हो ना. मागच्या वेळेस तुझा कॅमेरा नाहीसा झाला होता. "
अमेय -
" बरं, घरी सगळं
कसं आहे? "
जितिन-
" बस. भगवान की कृपा से ठीक चल रहा है"
इकडच्या
तिकडच्या गप्पा मारत ते गावाबाहेरच्या नदीजवळच्या रस्त्याच्या बाजूने चालत होते.
आकाशात
बरेचसे ढग होते. तसे त्या ढगांचा आकार कसाही असतो. ते आकारहीन असतात असे म्हटले
तरी हरकत नाही. पण आकार नसला तरी तो कोणता तरी आकार असतोच की.
फक्त तो
आकार आपण या आधी पाहिलेल्या कोणत्याच आकारांशी मिळताजुळता नसतो, एवढेच!
असे ढगांचे
आकार बघायला लहानपणापासूनच अमेय ला आवडायचे.
एखाद्या
कॅम्प मध्ये किंवा बाहेर आउटींगला गेला असता गवतावर पडल्या पडल्या तो तास न तास
आकाशातल्या या ढगांच्या अद्भुत आकारांकडे बघत बसायचा.
आताही तो
मस्तपैकी आकाशातल्या ढगांकडे बघत बघत जितिनशी बोलत होता.
अमेय-
"अरे, उद्या
गुरुवारी तुला सुटी आहे का?"
जितिन-
"का?"
अमेय-
" अरे शर्वरी जंगलात आणि जार्वार पर्वताजवळ आणि आसपास मला जी फिल्म बनवायची
आहे, त्यासाठी तू सुद्धा माझेसोबत चल!
उद्या मला तेथे जावून सर्वे करायचा आहे, तंबू ठोकायचा आहे. काही भाग मी एकटाच शूट करणार
आहे."
जितिन -
"ओ. सॉरी. मी उद्या नाही पण शुक्रवारी येवू शकेन. उद्या मला महत्त्वाचे काम
आहे."
अमेय-
" पण शुक्रवारी मुंबई आणि दिल्ली ऑफिसहून टीम येणार आहेच. ओके. मी उद्या
एकटाच जाईन. नो प्रोब्लेम"
आकाशाकडे
बघतांना त्याला एका ढगामध्ये दोन मोती चमकताहेत असे उगाच वाटून गेले. त्याने पटकन
जितिनला वर बघायला सांगितले.
अमेय अगदी
मोठ्याने ओरडला- "जितिन, अरे ते बघ. ते चमकणारे मोती."
जितिन मागे
वळून दचकून म्हणाला- "चमकणारे मोती? कुठे? झाडावर? जीपखाली"
अमेय-
" अरे मुर्खा वर बघ. वर पटकन. ढगांत?"
जितिन-
"ढगांत? कुठे? थांब. मी चालवता चालवता वर बघितले तर अॅक्सीडेंट
होईल"
जितिने
झाडाखाली गाडी थांबवली आनि वर बघितले. वर काहीच नव्हते.
जितिनने वर
बघायच्या आंत त्या ढगातल्या दोन मोत्यांतून डॉळे उघडल्याचा भास अमेयला झाला, ते डोळे अमेयकडे रोखून बघत होते आणि ते डोळे (की
मोती?) अचानके
वेगाने मिटले आणि गायब झाले.
जितिन-
"काय रे. झोप झाली ना व्यवस्थित? आकशात काय मोती असतात? "
अमेयलाही
आश्चर्य वाटले. ते डोळे गेले कुठे?
तो स्तब्ध
होवून वर बघत होता.
जितिन
म्हणाला, "
अरे, चल, आता समोरच्या मारुतीच्या देवळात पायी जावून दर्शन
घेवून परतूया. अंधार होत आलाय. आपण गावाच्या वेशीजवळ पोहोचलोय."
अमेय-
"होय. मला वाटते मला भासच झाला असावा. चल जावूया!"
पण आतून तो
थोडा घाबरला होता.
दर्शन
घेवून आल्यानंतर जीपमध्ये ते दोघे पुढेच बसले.
गावाकडे
परत येत असतांना सहज म्हणुन एकदा अमेयने वर पाहीले तर तो ढ्ग त्यांच्या गाडीचा
पाठलाग करतोय असे त्याला वाटले. ते डोळे पुन्हा त्याचेकडॅ रोखून बघत होते.
त्याने
पटकन खाली पाहीले.
पुन्हा वर
पाहीले. वर तो ढग होता, पण ते चमकणारे डोळे नव्हते.
घरी रात्री
जेवण झाल्यावर त्याला लगेच झोप लागली.
सकाळी नऊ
वाजता जाग आली. त्याने लॅपटॉप काढले, त्यावर ईमेल चेक केले.
त्याचे
आजोबा सहसा वरच्या खोलीत असत कारण ते म्हातारे झाले होते. आंथरूणावरच असत.
काकांशी
जुजबी बोलणे झाल्यावर ते शेतावर व इतर कामासाठी निघून गेले.
आज तो दिवस
होता. लवकरच त्याची या जंगलातली पहीली फिल्म शूट होणार होती.
खरी गोष्ट
ही की, या
जंगलातली ही फिल्म जगातली सर्वप्रथम फिल्म असणार होती.
काकूंचा
निरोप घेवून, पाठीवर सॅक
घेवून तो गुरूवारी जंगलाकडे जीपने निघाला.