रात्री जेफ ने अ‍ॅनाला फोनवरून निरोप दिल्यानंतर टीव्ही लावला. एक पोलीस अधिकारी भर रस्त्यावर पाण्यावरून पाय सटकून खाली पडलेला दिसला. तेथे लोकल न्यूज चॅनेलची टीम आलेली होती.

वार्ताहर सांगत होती:

"
आता एक अजब घटना घडली आहे. एक पाण्यासारखा दिसणारा मानव आता येथे होता....

या पोलीसाला एक अजब अनुभव आला आहे. एक पाण्यासारखा दिसणारा माणूस हातात काहीतरी घेवून पळत होता. सुरुवातीला पोलीस हबकून गेला. तो मानव अधून मधून बर्फ बनून काचेवर आदळत काच फोडत होता....

पण नंतर त्याने त्या पाणी-मानवाला गोळी मारली आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो पाणी मानव पुन्हा माणुस झाला आणि पळायला लागला. त्या पाणी मानवाने पोलीसावर हल्ला केला, तो त्या पोलीसाच्या नाकातोंडात जावू लागला आणि शेवटी त्या पोलीसाने त्या पाणी-मानवाचा नाद सोडला आणि त्या पाण्यावरून तो सटकून पडला.

तोपर्यंत तो पाणी मानव वाफ बनून हवेत उडाला आणि ढगात जावून विविध आकारात रुपांतरीत होवून पळून गेला...."

जेफ आश्चर्यचकीत होवून हे बघत होता. त्याने अ‍ॅनाला कॉल लावला....अ‍ॅना नॉट रीचेबल होती......

विमानातल्या प्रवासात अ‍ॅनाला झोप लागली नाही. तीने तो लॅपटॉप काढला आणि फाईल नं. २ वाचू लागली.

केट चा अनुभव त्यात लिहिला होता.

"
आम्ही चौघं मोठ्या उत्साहाने निघालो. आम्हाला तब्बल सहा दिवस मिळणार होते. आम्ही पुढे जावू लागलो. आमच्या एकूण दोन मिनी नाव- बोटी होत्या. पहीले बेट अगदी जवळच होते. सहा दिवसांत या डेव्हीलस स्क्वेअर मधली असतील नसतील ती सगळी बेटं आम्हाला पालथी घालायची होती. पाणबुड्याचे पोषाक सुद्धा आम्ही बरोबर घेतले होते. आम्ही होतोच असे साहसी. आम्हाला थांबवणारे तिथे कुणीही नव्हते. मॅट मोठ्या उत्साहात होता.

आम्हाला लवकरच पहीले बेट सापडले.

त्यावर आम्ही उतरलो. बोटी किनार्‍याला लावल्या. एवढे झकास बेट आणि लोक काय नसत्या अफवा पसरवत असतात.

बेटावर अनेक हिरवे पहाड आणि त्या बाजूला एक जंगल.

खाणे पिणे आटोपल्यानंतर आम्ही दुपारचे थोडे पहुडलो. आम्ही सर्व तेथल्या जंगलात गेलो.

जंगल मोठे अद्भुत. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी. त्यांची शूटींग केल्यानंतर संध्याकाळी आम्ही दुसर्‍या बेटावर जाण्याचा प्लान बनवत होतो.

पण, दिवसभर थकल्याने तंबू ठोकून तेथेच आराम करून उद्या सकाळी निघण्याचा बेत ठरला.

रात्र झाली. सॅम, जेन, मॅट सगळ्यांचा डोळा लागला. मी मात्र रात्रीच्या आकाशातल्या चंद्राकडे बघत पहुडले होते. मी मॅट्ला माझ्या बाहुपाशातून हळूच बाजूला केले आणि सहज आकाशाकडे बघत लोळत पडले.

आमचा तंबू किनार्‍यापासून फार लांब नव्हता. रात्रीचे आकाश थोडे विचित्र दिसत होते. आकाशात विविध आकारांच्या ढगांच्या आड चंद्र लपाछपी खेळत होता.

एक काळा ढग अचानक आपले आकार बदलू लागला. अमीबा या प्राण्यासारखे वेडेवाकडे आकार तो करू लागला. तो ढग नंतर पाणी होवून समुद्रावर खाली पडू लागला.

मी उठून बसले आणि आश्चर्याने बर बघत राहीले.....

काहीतरी भास झाला असेल असे वाटून मी ते विसरण्यासाठी थोडे चालायला लागले तोच अंधार्‍या किनार्‍यावर फेसाळणारी पांढरी लाट हळूहळू आपला आकार बदलू लागली. तीने माणसाचे रूप घेतले आणि तीने सरळसरळ तीघे झोपले होते तेथे हल्ला चढवला. एका लाटेने आमची एक नाव हातात धरून उलटीपालटी करून टाकली आणि सॅमच्या गळ्याभोवती ती स्वतःला गुंडाळून घेवू लागली, हळूहळू तीने सर्वांच्या अंगाभोवती विळखा घातला. त्या लाटेने तिघांना समुद्रात ओढून घेतले.

मग काही वेळ समुद्रात मला दिसले की एक बर्फाळ पांढरी पाणियुक्त स्त्री लाटांवर उभी होती अन मग गायब झाली...
काही वेळानंतर एक लाट माझ्या मागे यायला लागली तशी मी या प्रकाराने भेदरून जावून पहाडांच्या दिशेने पळू लागले......

समोरून अमीबाच्या आकारचे पाणी त्या जख्ख काळ्या अंधारात, चंद्राच्या अंधुक प्रकाशात वेडेवाकडे नाचत माझ्या पुढे येत होते.

मी पुन्हा किनार्‍याकडे पळाले.
अमीबाच्या आकाराचे ते पाणी माझेकडे येवून माझ्या अंगावर चढू लागले. एक अमीबा-पाणी गरम तर एक अगदी थंडगार लागत होता. मी किंचाळले... बचाव म्हणून मी खालची माती उचलून समोरच्य अलाटेवर फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
पण काहीच फरक पडला नाही.लाटेने मला उंच उचलले. आणि पुन्हा किनार्‍यावर आदळले....
थोड्यावेळाने शुद्ध आल्यावर सगळे शांत होते. मग मी कशीबशी बोटीला तरंगून समुद्रात जावू लागले....
....
त्यानंतर मी डोळे उघडले ते साऊथ जॉर्जियाच्या किनार्‍यावरच. "

"
मोठा अद्भुत अनुभव आहे." अ‍ॅना स्तंभित होवून वाचत होती.....

ती पुढे वाचू लागली.

वडीलांनी पुढे लिहीले होते:

"
या अनुभवावरून मला कळून चुकले की जलजीवा आहेत आणि ते आहेत तर त्यांना नियंत्रीत करण्यासाठी किंवा नाहिसे करण्यासाठी कुठेतरी काहितरी नक्कीच असणार.

त्यानंतर अनेक दिवसांनी रॉबर्ट गॉडमन याचेकडून मला मिळालेल्या माहितीच्या आधारे मी ते सगळे "हाऊ टू कंट्रोल वॉटर डीमन्स" या सिडी मध्ये साठवून ठेवला आहे. तो कुणाला आणि केव्हा द्यायचं हेही त्या सिडीत तपशीलवार सांगितलेले आहे. असो. तसेच "स्टेटस ऑफ द वॉटर: अ बुक बाय अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो" यातला एक महत्त्वाचा भाग सुद्धा त्या सिडी मध्ये आहे.......असो."

पुढचे न वाचताच अ‍ॅनाला अचानक काहीतरी वाटले आणि तीने सिडीजचा बॉक्स उघडून पाहीला. त्यात नेमकी ती सिडी नव्हती.......ज्यात जलजीवांना कंट्रोल कसे करायचे ते लिहिले होते!!!

विमान मुंबईत धावपट्टीवर उतरले.
विमानतळावर अमोल, अरविंद आणि अमेय ची आई असे सगळे होते.
अ‍ॅनाला प्रत्यक्ष प्रथमच ते तिघे बघत होते.
पुढे गाडीतून ते सर्व घरी आले.
जुजबी बोलणे झाल्यावर ... ती थकव्या मुळे झोपली.
सकाळी सकाळी जेफचा कॉल आला.
अ‍ॅना: "हा जेफ, आय रिच्ड सेफली... "
जेफ : "अ‍ॅना... तू म्हणत होतीस ते खरे आहे.... इकडे एक जलजीवा सापडला आहे.... चॅनेल्स वर च्या अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार जलजीवा पुन्हा जागॄत झालेत्....आंटार्टीका खंडाजवळच्या डॅव्हील स्क्वेअरवरून ते जगभरात हळूहळू पसरत आहेत आणि आपल्या साध्यासाठी ते अनेक माणसांना "मानव्-जलजीवा" बनवत आहेत... टी.व्ही बघ."

काही वेळानंतर थोडक्यात सगळी हकिकत सगळ्यांना सांगितल्यानंतर अ‍ॅनाने टी.व्ही. लावला.
सि. एन. एन. वर न्यूज येत होत्या, ""दुसर्‍या महायुद्धाच्या काळात काही ठीकाणी असे जलजीवा दृष्टीस पडले होते....असे काहीजण सांगत होते...
पण आता ते पुन्हा परत आलेत....वॉटर्-डीमन्स आर बॅक!"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel