सूचना: या कादंबरीतील पात्रे, घटना आणि ठिकाणे यांचे जगातल्या इतर काही ठिकाणे, व्यक्ती किंवा घटना यांच्याशी साम्य आढळले तर त्याला योगायोग मानायचा की सत्य मानायचे हे मी वाचकांवर सोपवत आहे.

(1)

लंडन शहरातल्या ट्यूब (लोकल ट्रेन्स) मध्ये प्रवास करत असतांनाच त्याला तो कॉल आला. असा एक कॉल ज्याने आपले आयुष्य खुप बदलणार आहे, आपले ते पूर्वायुष्य आपल्याला पुन्हा भेटणार आहे याची त्याला पुसटशीही जाणीव नव्हती.

लंडन शहरातल्या एका प्राणिसंग्रहालयाला भेट देवून त्याची सगळी माहिती रेकॉर्ड करून ती तो काम करत असलेल्या चॅनेलवर लाईव्ह टेलीकास्ट करून झाली होती आणि आता तो पुन्हा यु.एस.मध्ये परतणार होता. त्यानंतर त्याला दोन दिवस सुट्टी होती आणि मग पुढची असाईनमेंट येण्याची तो वाट बघणार होता.

पण ट्रेनमध्येच त्याला तो कॉल त्याला आला आणि -

" गुड मॉर्निंग मिस्टर अमेया. हाऊ आर यु? (सुप्रभात अमेय. कसा आहेस?) "
- पलीकडून कॉल आला तो त्या चॅनेलचे आशीया खंडातील कार्यक्रमांचे काम बघणारे लेस्टर बेनेट यांचा.

" या! आय एम गुड. हाऊ अबाऊट यू? ( मी ठीक आहे. आपण कसे आहात?)" - अमेय

" फाईन. अमेया, देयर इज अ‍ॅन न्यू असाईनमेंट फॉर यु. यु वुड लाईक ईट इन फॅक्ट! (फाईन. अमेय, तुझ्यासाठी एक नवीन काम आहे. खरी गोष्ट तर अशी आहे की ते काम तुला खुप आवडेल.) " - लेस्टर

"या. टेल मी सर. आय एम रेडी. बट ऑन्ली आफ्टर संडे. लेट मी टेक सम ब्रेदिंग स्पेस ऑन संडे.
(होय. चालेल. पण रविवार नंतरच. मला थोडा रविवारी आराम करु द्यात..)" - अमेय

"नॉट अ‍ॅन इश्यू. टेक यूर टाईम.
बट बी अवेअर दॅट, द असाईनमेंट इज इन युवर ओन कंट्री..
(चालेल. पण लक्षात घे की पुढचे तुझे काम हे तुझ्या भारतातले आहे.)" - लेस्टर

ट्यूब मध्ये आता त्याला बसायला जागा मिळाली. खिडकी बाहेर बघता बघता तो बोलायला लागला.

"दॅट्स ग्रेट. आय वुड डेफिनेटली लाईक टू गो देयर..( फारच छान. मी नक्कीच तेथे जाईन)" - अमेय

लेस्टर पुढे म्हणाला -

" यु हॅव टू गो टू द शार्वारी जंगल्स इन मध्या प्रडेश... डिटेल्स विल बी सेण्ट टु युर ईमेल आयडी ameya.a@naft.com - अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स विल बी क्रेडीटेट टू युर अकाऊंट. ऑन वेन्सडे, त्रीशा फ्रॉम मुंबई-ऑफिस अ‍ॅण्ड भार्गवी फ्रोम डेल्ही-ऑफिस विल असिस्ट यु. बेस्ट लक! बाय.
(तुला मध्य प्रदेशातले शर्वरी जंगल येथे जायचे आहे. कामाबद्दलचे बारकावे, माहिती हे ईमेल द्वारे पाठवले जातील आणि अ‍ॅडव्हान्स पैसे हे तुझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येतील. बुधवारी मुंबई च्या आपल्या ऑफिसमधून त्रीशा आणि दिल्ली ऑफिस मधून भार्गवी तुला मदत करायला येतील. शुभेच्छा. बराय.)!"

शर्वरी जंगल - नाव ऐकताच त्याच्या अंगावर शहारे आले. सरसरून काटे आले. आणि एका आठवणीने मन व्याकूळ झाले....

ते पाणी... तो जार्वार पर्वत. ढग दाटुन आलेले. पर्वतावर पाऊस पडत असतांना पर्वता वर त्याला दिसलेले ते दृश्य...

आपल्याला तेथे जायला मिळणे हा योगायोग आहे की नियतीचा ठरवलेला डाव?... नियती.. भाग्य... असे खरेच काही असते का? आपण हे जन्मापासून मृत्युपर्यंतचे जीवन जगतो ते कसे असावे हे कोण ठरवतं? आपण स्वत: ? की दुसरंच कुणी?

त्याला तशा बरेचदा भारत आणि आसपासच्या देशातील कामे मिळत होती. पण मध्य प्रदेशात त्याला प्रथमच आता पाठवण्यात येणार होते.

भारतात जायला मिळाल्याने त्याला आनंद नक्कीच झाला होता. सगळ्यांची भेट होणार होती.

तो - म्हणजे - अमेय आचरेकर हा एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि हौशी प्रवासी. जीममध्ये जावून जावून सिक्स पॅक अ‍ॅब्स कमावलेले. लहानपणापासून साहसी. वय वर्षे - २५. अजूनपर्यंत अविवाहित. त्याचे आई- वडील मुंबईत विले पार्ले येथे त्याच्या मोठ्या भावासह - म्हणजे अमोल सोबत राहात होते.

अमेय हा जगप्रसिद्ध अमेरिकन चॅनेल - "नेचर, अनिमल्स, फुड अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स" (NAFT - नाफ्ट) मध्ये काम करत होता. नाफ्ट हे चॅनेल जगभरातील निसर्ग आणि प्राणी यांचेबाबत विविध अंगानी विचार करून त्याची माहिती लोकांसमोर आणते. तसेच विविध प्रकारची स्थळे तेथील संस्कृती, तेथील खाद्यपदार्थ याबद्दल विविध प्रकारची माहिती चोवीस तास पुरवत असते. जगभर या चॅनेलचे असंख्य चाह्ते आहेत. त्याच चॅनेलचा नुकताच जन्मलेला जुळा भाऊ - "नॅचरल ऑर सुपरनॅचरल (Natural Or Supernatural- NOS- नॉस) " हाही लोकांमध्ये लोकप्रिय होत होता.

त्यांची सर्वात मोठी बहीण आरती ही लग्नानंतर यु.एस. ला सेटल्ड होती. तीचे मिस्टर एका शहरात आयटी क्षेत्रात ट्रेनर.

अमोल हा विवाहीत. अमोल हा एका आयटी कंपनीत नोकरीला. त्याची पत्नी डॉक्टर सौ. आसावरी आंबेकर - आचरेकर. अमेयला लहानपणापासूनच फोटोग्राफी ची सुद्धा आवड होती.

वडीलांनी दोघांना त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करण्याची मोकळीक दिली होती.

त्याच्या भावाला अमोलला यु.एस. , यु. के मध्ये सेटल होण्यात एवढा रस नव्हता. पण तो एक दोन वेळा परदेशात जावून आलेला होता.

वडीलांचे भाऊ अशोकराव हे मध्य प्रदेशातल्या एका छोट्याश्या खेड्यात - आसंद येथे राहात होते. त्यांची तेथे शेत्ती असल्याने आणि ती व्यवस्थित पैसा मिळवून देत असल्याने ते तेथेच असत. त्यांच्या वडीलांसोबत.

... रविवारी पुन्हा एकदा क्रुझ वरची सफर केल्यानंतर संध्याकाळी तेथील त्याची एक मैत्रीण अ‍ॅना हॉफमन हीला तो भेटायला गेला. दुसर्‍या दिवशी - सोमवारच्या दुपारच्या फ्लाईटचे तिकिट होते.

रविवारी तीने त्याला घरी बोलावण्या ऐवजी त्याला वेस्टमिन्स्टर स्टेशन जवळ बोलावले. लंडन आय जवळ तीची वाट बघत तो उभा राहीला.

विचारांत असतांनाच त्याचे लक्ष समोरच्या एका जोडप्याकडे गेले. ते जोडपे एकमेकांचे चुंबन घेत असतांनाच त्याला अ‍ॅनाची प्रकर्षाने आठवण व्हायला लागली आणि त्याने तीला परत फोन लावला...


(2)

अ‍ॅना हॉफमन. वय वर्षे २६. गोरीपान ब्रिटीश तरूणी.
दिसताक्षणी कुणालाही भुरळ पडेल अशीच.
अंगाने भरलेली आणि आजच्या आधुनिक जमान्यातील परफेक्ट फिगर असलेली.
तीची आई भारतीय आणि वडील ब्रिटीश. अ‍ॅना लहान असतांनाच वडीलांचा मृत्यु झालेला. वडील जहाजावरील टेलीकॉम इंजिनीयर होते. आईने त्यानंतर लग्न केले नाही.

एकाकीपणा दूर करण्यासाठी आणि थोडेफार पैसे मिळवण्यासाठी तीने लायब्ररीयन म्हणून जॉब पत्करला होता.

अ‍ॅना एन. एच. एस्. मध्ये डॉक्टर. लंडनला असताना एकदा रिपोर्टींग करता करता अमेय जखमी झाला होता.

जेव्हा त्याला अ‍ॅना कडे योगायोगाने उपचारासाठी नेण्यात आले होते, त्यावेळेस दोघांमध्ये आकर्षण निर्माण झाले होते. प्रेम बसले. एकमेकांवर. ओळख पाळख झाली. त्याने त्याच्या मॅनेजरला यु. के. मध्ये सेटल होण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणजे अ‍ॅनासोबत रहायला मिळेल आणि मुंबईला त्याने एक फ्लॅट घेतलेला होताच. दोघांनी लग्नानंतर यु.के. ला रहायचे की भारतात हे अजून त्यांनी ठरवले नव्हते.
ती हौस म्हणून काही सिरियल आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये काम करत असे.

अ‍ॅना च्या भारतीय आईशी - रोझी डिमेलो शी सुद्धा त्याची ओळख झाली होती आणि अमेय तीलाही पसंत होता.

त्याच्या पसंतीला घरच्यांचा होकार मिळणार हे त्याने गृहीत धरले होते. तसे त्याने घरी स्पष्ट सांगितले नव्हते पण, थोडीशी कल्पना दिली होती.

..लंडन आय जवळ वाट बघत असतांना त्याने तीला फोन लावला.

ती त्याच्या जवळपासच होती आणी पोहोचतच होती. तीला पाहाताच त्याने तीला मिठी मारली. तीचा किस घेतला. नंतर बराच वेळ तेथे स्तब्धता होती आणि ते दोघे एकमेकांकडे नुसते नि:शब्द बघत होते...

भानावर आल्यानंतर ते बोलू लागले. त्यांनी पुन्हा एकदा "लंडन आय" मधून लंडन एन्जॉय करायचे ठरवले.

एका काचेच्या सेल मध्ये ते बसले. लंडन शहराचे विहंगम दृश्य दिसत होते. तो सेल अगदी हळूहळू वर चढत होता.

"अ‍ॅना, मला तुला एक सांगायचे आहे!"

" बोल ना, लाडक्या!"

"मी तुला मागे एकदा लहानपणी भारतात भेटलेल्या एका मुलीबद्दल सांगितले होते. माझे पहिले प्रेम...त्याबद्दल मी तुला सविस्तर बोलेलो नव्हतो..पण?"

"सोन्या! अरे, काही सांगायची गरज सुद्धा मी समजत नाही. मला तुझ्यावर विश्वास आहे, आणि सविस्तर मला ऐकायचे नाही. आता ते संपलं असे तूच म्हणाला होतास ना?"

"हो गं. ते संपलं...पण, योगायोगाने त्याच ठीकाणी नेमके मला कामानिमित्ताने जायले मिळते आहे, त्यानिमित्तने माझ्या मागच्या सगळया आठवणी परत जाग्या झाल्यात. असं वाटतंय की ..."

"हे बघ. तुला जर सांगावेसे वाटत असेल तर सांग. त्याने मन मोकळे होणार असेल तर जरूर सांग. आणि तेथे जाण्याने जर का तुला त्रास होणार असेल तर .. नकोच जावूस. नाही सांग त्यांना ..ती असाईनमेंट स्वीकारु नकोस!"

"तसे नाही गं. तसे तर त्या मुलीबद्दल सत्य कळल्यानंतर मी तीला विसरलो सुद्धा होतो. पण त्या घटनेबद्दल मला असे काही तुला सांगायचे आहे., जे मी तुला आजपर्यंत सांगितले नव्हते.!"

"सांग ना राजा. मी तुझीच आहे ना!"

अमेय ने सांगायला सुरूवात केली.

"तेव्हा मी वीस वर्षांचा असेन. ...
माझ्या वडीलांचे भाऊ मिस्टर अशोक हे भारतातल्या मध्य प्रदेशातल्या एका छोट्याश्या खेड्यात - आसंद येथे राहातात. त्यांची तेथे शेत्ती असल्याने आणि ती व्यवस्थित पैसा मिळवून देत असल्याने ते तेथेच असतात.
त्यांच्या वडीलांसोबत. मी एकदा सुट्टीत तेथे गेलो होतो.
सोबत माझा मित्रही होता- जितिन.

तेथून जवळच असलेले शर्वरी जंगल - आणि त्याजवळचा जार्वार पर्वत.

नाफ्ट चॅनेलने आयोजीत केलेल्या तीन्ही जागतीक पातळीवरच्या ऑनलाईन परिक्षा मी नुकताच पास झालो होतो. टेलीफोनीक इंटरव्ह्यू ही झाला होता. माझ्यासारखे अनेक जण सिलेक्ट झाले होते. आता वेळ होती प्रत्यक्ष साहसाची.
ती डॉक्युमेंटरी नव्याने सुरु झालेल्या त्या चॅनेलकडे सिलेक्शनसाठी पाठवण्यात येणार होती. त्यासाठी खुप स्पर्धक होते. ते ही वेगवेगळ्या ठीकाणांहून वेगवेगळे फिल्मस बनवून आणणार होते.

या फिल्म साठी मी खुप मेहेनत घेणार होतो. सहाजिकच मी हे हक्काचे ठीकाण निवडले जेथे जास दिवस रहाता येईल्..आणि माझ्या मित्राला सहज सोबतीला म्हणून मी आणले होते. आम्ही आजोबांच्या घरापासून दूर पर्वताच्या पायथ्याशी आमचा तंबू वसवला होता. तसा आजूबाजूला धोका नव्हता. मोबाईल सोबत होतेच. कॅमेरा आणि इतर आधुनिक साहित्य होते. पण पर्वताच्या आसपास वस्ती नव्हती. सकाळी दहा वाजता तंबू बसवून पूर्ण झाला. आजचा तो दिवस साहसपूर्ण असणार होता.... "


(3)

त्याचे बोलणे थांबवत अ‍ॅना त्याला पुढे म्हणाली,

" होय. आणि मग एके दिवशी तुझा मित्र तुझ्या सोबत त्या जंगलात आला नसताना ती तुला भेटली होती. तुम्ही दोघे दिवसभर सोबत होते. संध्याकाळी ती अचानक नाहीशी झाली, तू तीला नाव गाव काहीच विचारले नव्हते, पण ते तुझे पहिले प्रेम होते, ते तू बरेच दिवस विसरला नव्हतास आणि ती खुप सुंदर होती, दुसर्‍या दिवशी तुझा कॅमेरा गायब झाला होता. तुझी सगळी मेहेनत वाया गेली पण मग तुला दुसरीकडचा कुठलातरी व्हि. डी. ओ. शूट करावा लागला होता.

नंतर या चॅनेलतर्फे तू सिलेक्ट झालास, पण तुझा तो प्रथम व्हीडीओ हा त्या जंगलातला नव्हता याचे तुला वाईट वाटते वगैरे वगैरे...बरोबर?"

"हो. पण ती मुलगी तेथे आली कशी आणि ती नाहीशी कशी झाली हे मला तुला सांगायचे होते... ते सांगितले तर तुझा विश्वास बसणार नाही आणि हे तुला आत्ताच सांगावेसे मला वाटले कारण मला तेथे जाण्याचा योग पुन्हा येतो आहे..आणि.."

"होय रे. पुन्हा कधीतरी सांग. ते मी कधीतरी ऐकेनच, अमेय.
आता मला एक गोष्ट फक्त महत्त्वाची वाटतेय, ती म्हणजे आपण आपल्या लग्नाचे ठरवू या. आईची ही इच्छा आहे तशी. लवकरात लवकर!"

"वाव. दॅट्स ग्रेट देन. इन फॅक्ट मीच तुला हे सांगायचे ठरवले होतेच. मी ही यावेळेस बोलतो घरच्यांशी. मला खात्री आहे ते अर्थातच नाही म्हणणार नाहीत."

एव्हाना त्यांचा लंडन आयचा सेल सर्वात उंचावर होता.

" तू एकदा का तुझी ही असाईनमेंट पूर्ण केली, की आपण पुन्हा भेटू आणि मग लग्नाचे प्लान करूया. तू तोपर्यंत घरच्यांशी बोलून घे.." - अ‍ॅना.

"ओ.क्के. ठिक." - अमेय.

काही वेळाने त्यांचा लंडन आय मधला "प्रवास" संपला.

रात्री मार्केट मध्ये फिरून स्वत: साठी, घरच्यांसाठी आणि अ‍ॅनासाठी खरेदी केल्यानंतर झाल्यानंतर तो तीच्या आईला भेटायला गेला आणि दुसर्‍या दिवशी सोमवारी रात्री भारतात- मुंबईत घरी पोहोचला.

अ‍ॅना ला त्याने पोहोचल्याचा फोन केला.

दुसर्‍या दिवशी मंगळवारी त्यला जाग आली ती सकाळी अकरा वाजता.

चर्चगेटला असलेल्या नाफ्ट च्या ऑफिस मध्ये रिपोर्टींग करून तो परत आला. तेथे त्रीशा ला भेटला. इतर क्रू मेंबर्स ना भेटला.

बर्‍याच दिवसांनंतर त्यांना तो भेटत होता. त्रीशा सोबत ऑफिशियल बोलणे झाल्यानंतर तो सगळ्यांचा निरोप घेवून परतला. ती आणि इतर क्रू मेंबर्स त्याला शुक्रवारी जॉईन होणार होते.

ईमेल मध्ये सविस्तर असाईनमेंट होतीच.

घरी आल्यानंतर सगळयांसाठी केलेली खरेदी आणि चॉकलेट्स वगैरे दिल्यानंतर त्याने सर्वांसमोर अ‍ॅना शी त्याने ठरवेलेल्या लग्नाचा विषय काढला. तीचा, तीच्या आईवडीलांचा इतिहास थोडक्यात सांगितला.

आधी सगळ्यांना थोडी कल्पना होतीच. फक्त आता त्यावर शिक्कामोर्तब झाले. विविध विषयांवरच्या गप्पा- गोष्टी झाल्या. जेवणं वगरे झालीत.

लग्नाची तारीख वगैरे अजून ठरायची होती. त्या संदर्भात त्याने अजून अ‍ॅना आणि तीच्या आईशी चर्चा केली नव्हती.

बुधवारी पहाटे त्याचा प्रवास सुरु झाला. तसे त्याला फ्लाईटचे तिकिट मिळाले असते पण त्याने ट्रेन निवडली. जस्ट फॉर एन्जॉय. तो आसंद येथे जाण्यासाठी निघाला होता. सोबत कॅमेरा, लॅपटॉप, वायरलेस इंटरनेट व इतर अनेक वस्तू असलेली पाठीवरची सॅक आणि आणखी एक कपड्यांची बॅग.

त्रीशा आणि भार्गवीला त्याने कॉल करून तो आल्याचे कळवले.

ट्रेनने प्रवास करत प्रवासात अ‍ॅनाचा विचार चालू होता. लग्नाचा मार्ग आता मोकळा झाला होता. अ‍ॅनाशी लग्न होणार. आवडीच्या क्षेत्रात करियर करायला मिळाले आणि तेही व्यवस्थित सुरु आहे. त्याच्या चेहेर्‍यावर समाधानयुक्त हास्याची लकेर उमटली.

येथे त्याला आलेले अनुभव जरी विचित्र होते तरी एका गोष्टीमुळे त्याने हे असाईनमेंट स्वीकारले होते - "त्या" मुलीची पुन्हा भेट होईल अशी एक मनात कुठेतरी त्याला आशा होती. असा विचार हास्यास्पद होता, बालिश होता तरी त्याला तसे वाटत जरुर होते.

अनाकलनीय अनुभव कुणी सहसा विसरत नाही आणि पहिले प्रेम सुद्धा. अनाकलनीय असले तरी!

त्या दिवशीच्या एका दिवसात कितीतरी गोष्टी घडल्या होत्या. त्या मुली शी झालेली भेट त्याने फक्त अ‍ॅनाला सांगीतली होती.

...एवढे मोठे ब्रम्हांड.
त्यात अनेक आकाशगंगा...
त्यात अनेक ग्रहतारे..
आणि त्यात आपली छोटीशी पृथ्वी.
त्यावरचे प्राणी आणि इतर दृश्य- अदृश्य जीव.
पृथ्वीवर मानवाने वाटून घेतलेले अनेक देश.
अजस्त्र ब्रम्हांडाच्या तुलनेने अगदी नगण्य असलेल्या या पृथ्वीवर असलेल्या भारतातल्या एका धावत्या ट्रेनमधला तो एक तुलनेने नगण्य जीव- अमेय.

आपण म्हणतो सगळे काही आपल्या हातात असते. पण, या ब्रम्हांडात, या पृथ्वीवर, या निसर्गात अशा अनेक गूढ, चमत्कारीक, गोष्टी आहेत ज्या आपल्या आणि आपणच बनवलेल्या विज्ञानाच्या आकलनशक्तीच्या इतक्या पलीकडच्या आहेत की त्यांचे रहस्य अजूनपर्यंत कुणालाही समजले नाही. आपण त्यापासून अनभिज्ञ आहोत. काही फार थोडे जीव फक्त अशा काही गोष्टींच्या थोडेफार जवळ जावून त्यातले रहस्य काही प्रमाणात समजून शकले आहेत. फार थोडे!

ट्रेनमधल्या त्या एका डब्यात असलेल्या आणि चेहेर्‍यावर समाधानाची लकेर असणार्‍या अमेय च्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे हे त्यालाही माहिती नव्हते.

माहिती नव्हते म्हणूनच तो आनंदात, मजेत होता.

काकांच्या घरी पोहोचल्यावर त्याचे जंगी स्वागत झाले.

जितिन ला तो येणार याची आधीपासून खबर मिळाली होती. तो आधीच त्याच्या आजोबांकडे - काकांकडे येवून बसला होता.

आजोबांकडे पोहोचल्यावर सेटल वगैरे झाल्यानंतर तो त्याच दिवशी संध्याकाळी जितिनला घेवून काकांच्या जीपमध्ये भटकंती करायला निघाला.

(4)


जितिन शर्मा. आसंद गावतला एक सरकारी नोकर. एक वर्षापूर्वीच लग्न झालेला.

ओपन जीपमध्ये मागच्या बाजूस अमेय दोन्ही हात डोक्यामागे ठेवून मस्त आकाशाकडे बघत होता आणि जितिन जीप चालवत होता.

गावातल्या गल्ल्यांनधून जीप वळणे घेत घेत जात होती.

जितिन - "काय मग, अमेय. काय म्हणतं लंडन आणि अंग्रेजी मेम मतलब, हमारी होनेवाली भाभी?"

अमेय- " बस. सगळं ठीक. एकदम झकास. आणि कामानिमित्ताने येथे प्रथमच मी एखादी फिल्म शूट करणार आहे."

जितिन- " हो ना. मागच्या वेळेस तुझा कॅमेरा नाहीसा झाला होता. "

अमेय - " बरं, घरी सगळं कसं आहे? "

जितिन- " बस. भगवान की कृपा से ठीक चल रहा है"

इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ते गावाबाहेरच्या नदीजवळच्या रस्त्याच्या बाजूने चालत होते.

आकाशात बरेचसे ढग होते. तसे त्या ढगांचा आकार कसाही असतो. ते आकारहीन असतात असे म्हटले तरी हरकत नाही. पण आकार नसला तरी तो कोणता तरी आकार असतोच की.

फक्त तो आकार आपण या आधी पाहिलेल्या कोणत्याच आकारांशी मिळताजुळता नसतो, एवढेच!

असे ढगांचे आकार बघायला लहानपणापासूनच अमेय ला आवडायचे.

एखाद्या कॅम्प मध्ये किंवा बाहेर आउटींगला गेला असता गवतावर पडल्या पडल्या तो तास न तास आकाशातल्या या ढगांच्या अद्भुत आकारांकडे बघत बसायचा.

आताही तो मस्तपैकी आकाशातल्या ढगांकडे बघत बघत जितिनशी बोलत होता.

अमेय- "अरे, उद्या गुरुवारी तुला सुटी आहे का?"

जितिन- "का?"

अमेय- " अरे शर्वरी जंगलात आणि जार्वार पर्वताजवळ आणि आसपास मला जी फिल्म बनवायची आहे, त्यासाठी तू सुद्धा माझेसोबत चल! उद्या मला तेथे जावून सर्वे करायचा आहे, तंबू ठोकायचा आहे. काही भाग मी एकटाच शूट करणार आहे."

जितिन - "ओ. सॉरी. मी उद्या नाही पण शुक्रवारी येवू शकेन. उद्या मला महत्त्वाचे काम आहे."

अमेय- " पण शुक्रवारी मुंबई आणि दिल्ली ऑफिसहून टीम येणार आहेच. ओके. मी उद्या एकटाच जाईन. नो प्रोब्लेम"

आकाशाकडे बघतांना त्याला एका ढगामध्ये दोन मोती चमकताहेत असे उगाच वाटून गेले. त्याने पटकन जितिनला वर बघायला सांगितले.

अमेय अगदी मोठ्याने ओरडला- "जितिन, अरे ते बघ. ते चमकणारे मोती."

जितिन मागे वळून दचकून म्हणाला- "चमकणारे मोती? कुठे? झाडावर? जीपखाली"

अमेय- " अरे मुर्खा वर बघ. वर पटकन. ढगांत?"

जितिन- "ढगांत? कुठे? थांब. मी चालवता चालवता वर बघितले तर अ‍ॅक्सीडेंट होईल"

जितिने झाडाखाली गाडी थांबवली आनि वर बघितले. वर काहीच नव्हते.

जितिनने वर बघायच्या आंत त्या ढगातल्या दोन मोत्यांतून डॉळे उघडल्याचा भास अमेयला झाला, ते डोळे अमेयकडे रोखून बघत होते आणि ते डोळे (की मोती?) अचानके वेगाने मिटले आणि गायब झाले.

जितिन- "काय रे. झोप झाली ना व्यवस्थित? आकशात काय मोती असतात? "

अमेयलाही आश्चर्य वाटले. ते डोळे गेले कुठे?

तो स्तब्ध होवून वर बघत होता.

जितिन म्हणाला, " अरे, चल, आता समोरच्या मारुतीच्या देवळात पायी जावून दर्शन घेवून परतूया. अंधार होत आलाय. आपण गावाच्या वेशीजवळ पोहोचलोय."

अमेय- "होय. मला वाटते मला भासच झाला असावा. चल जावूया!"

पण आतून तो थोडा घाबरला होता.

दर्शन घेवून आल्यानंतर जीपमध्ये ते दोघे पुढेच बसले.

गावाकडे परत येत असतांना सहज म्हणुन एकदा अमेयने वर पाहीले तर तो ढ्ग त्यांच्या गाडीचा पाठलाग करतोय असे त्याला वाटले. ते डोळे पुन्हा त्याचेकडॅ रोखून बघत होते.

त्याने पटकन खाली पाहीले.

पुन्हा वर पाहीले. वर तो ढग होता, पण ते चमकणारे डोळे नव्हते.

घरी रात्री जेवण झाल्यावर त्याला लगेच झोप लागली.

सकाळी नऊ वाजता जाग आली. त्याने लॅपटॉप काढले, त्यावर ईमेल चेक केले.

त्याचे आजोबा सहसा वरच्या खोलीत असत कारण ते म्हातारे झाले होते. आंथरूणावरच असत.

काकांशी जुजबी बोलणे झाल्यावर ते शेतावर व इतर कामासाठी निघून गेले.

आज तो दिवस होता. लवकरच त्याची या जंगलातली पहीली फिल्म शूट होणार होती.

खरी गोष्ट ही की, या जंगलातली ही फिल्म जगातली सर्वप्रथम फिल्म असणार होती.

काकूंचा निरोप घेवून, पाठीवर सॅक घेवून तो गुरूवारी जंगलाकडे जीपने निघाला.

(5)


अमेय जीप घेवून निघाला. आजचा दिवस महत्त्वपूर्ण होता. त्याने रस्त्याने जातांना शूटींग करायला सुरुवात केली. अर्थात शूटींग करण्यासाठीचे परवाने व कायदेशीर बाबींची पूर्तता योग्य ठिकाणी केल्यानंतरच त्याने शूटींगला सुरुवात केली होती.

कालच्याच रस्त्याने तो जीप नेत होता. गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता. सकाळचे दहा वाजले होते. नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव होता. त्यावर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता. चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आणि मग ते शर्वरी जंगल होते. जंगलाच्या सुरुवातीला काही स्थानिक लोकवस्ती होती. अन मग पुढे सुना रस्ता.

वर आकाशात पाहील्यावर त्याला फक्त थोडेसेच ढग दिसले. त्यातले काही काळे आणि काही पांढरे.

कालच्यासारखे ते डोळे आज काही दिसत नव्हते. काल मात्र तो खुप घाबरला होता.

त्याने जितिनला फोन लावला - "जितू, येतोस का?"

जितिन -"नाही ना यार. महत्त्वाचं काम आहे. उद्या नक्की येतो. तू काय एकटा चाल्ल्यायस का?"

अमेय- " होय रे. जावू जरा म्हट्लं. पूर्वतयारी करूया."

जितिन -" तसे भितीदायक असे काही नाही तेथे! गरज पडली तर मला फोन कर. मी कुणाला तरी मदतीला पाठवीन."

अमेय -" ओके. थॅंक्स! चल बाय!"

या जंगलाचे एक वैशिष्ट्य अमेयच्या लक्षात राहीले होते ते म्हणजे तीन पंखांचा एक छोटा पक्षी. स्थानिक लोक त्या पक्ष्याला नामातुआ म्हणायचे. शास्त्रीय भाषेत त्याला "एरिन्होटा टेस्कावोया" असे नाव होते. त्याला तीन पंख असतात आणि तो तुआआ तुआआ असा आवाज करत जंगलात उडत असे. जंगला जवळची लोकवस्ती संपल्यानंतर तो पक्षी उडतांना त्याला दिसला. त्याने अर्थातच लगेच त्या पक्ष्याच्या प्रत्येक हालचाली शूट केल्या.

जस जसा तो जंगलात आत जात होता तसा त्या मुलीची त्याला आठवण झाली....

तो स्वत:शी हसला.

बीप बीप बीप करत त्याचा मोबाईल वाजला. अ‍ॅनाचा कॉल होता. साधारण अकरा वाजले होते. तेथे लंडनमध्ये अजून सकाळी सात वाजले होते.

"हाऊ आर यु, माय डियर. आय लव्ह यू"

"लव्ह यु टू. आज लवकर उठलीस?"

"होय रे. तुझी प्रकर्षाने आज आठवण आली, म्हणून केला फोन. कुठे आहेस. पोहचलास वाटते त्या जंगलात?"

"हो. शेवटी सुरु झाली शूटींग. पण आज मी एकटाच आहे. उद्या सगळेजण जॉईन होतील मला. आता मी त्या पक्ष्याची शूटींग करतोय ज्याला तीन पंख आहेत- नामातुआ."

"वाव. ग्रेट. चल बाय्. कीस यु. कॉल मी अगेन. आय वील वेट फोर योर कॉल."

"या. बाय. कीस यु लॉट. बाय."

अमेयचे लक्ष वर आकाशाकडे नव्हते तेव्हा एका ढगातले ते दोन डोळे त्याचा माग घेत होते.

तो ढग त्याच्या मागोमाग येत होता. पण अमेयचे तिकडे लक्ष नव्हते.

आतापर्यंत जीपच्या जवळ उडणारा नामातुआ गर्द झाडींमध्ये दिसेनासा झाला.

तसे या जंगलात हिस्त्र प्राणी नव्हते. पण काही वेगळ्याच प्रकारचे प्राणी होते. जसे रानमांजरासारखे दिसणारे - एक वेगळेच मांजर- त्या मांजराचे डोळे अंधारात हिरवे न दिसता पिवळे दिसत.

अजून तो प्राणी दृष्टीस पडला नव्हता.

पूर्वी ज्या तळ्याकाठी अमेय ने तंबू ठोकला होता ते ठीकाण आले.

तेथे त्याने तंबू ठोकला. जागा सेफ होती.

तेथे थोडी झाडी आणि थोडे मोकळे मैदान होते. त्याच्या थोडे पुढे गेले की होता जार्वार पर्वत. त्या पर्वताचे वैषिष्ट्य म्हणजे तो पर्वत हिरवट होता. त्यावर गवत वगैरे नव्हते तर मातीचा रंग हिरवा होता.

अंधारून आल्यासारखे वाटत होते. आकाशात विविध आकाराचे ढग गर्दी करत होते.

सोबत आणलेल्या सर्व वस्तू जागच्या जागी सेट केल्यावर तो थोडा पहुडला.

दहा मिनिटे डोळा लागल्यावर त्याला नामातुआ च्या जोरा जोरात ओरडण्याने जाग आली. पुन्हा त्या पक्ष्याची फिल्म शूट केल्यावर त्याने सोबत आणलेला टीफिन संपवला.

समोरच्या तळ्यातले पाणी तसे शांत होते. तो तळ्याकडे एकटक बघत बसला. जार्वार पर्वताच्या टोकावर पाऊस पडायला सुरुवात झाली.

त्याला काकांचा फोन आला, " बेटा, पाऊस सुरु झाला आहे. लवकर निघून ये घरी संध्याकाळच्या आत. बाकी तुझं शूटींग वगैरे कसं चाल्लंय?"

अमेय - "ठीक आहे. व्यवस्थित. मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. बरं ठेवतो."

बराचसा भाग शूटींग करून झाल्यावर दुपारी एक वाजता त्या जार्वार पर्वतावरच्या पडणार्‍या पावसाकडे तो पहात होता.

ढगांतून पडणारे विविध थेंब आता एकत्र येत होते. नैसर्गिकरित्या जेव्हा पाऊस पडतो तेव्हा थेंब सरळ पडतात. आता ते अनेक थेंब एकमेकांकडे आकर्षले जावून आकाशातच अधांतरी एके ठीकाणी एकत्र येत होते.
त्या अनेक थेंबाचा एक मोठा थेंब झाला. असे अनेक मोठे थेंब एकत्र आले. त्यातून मानवी डोक्याचा आकार तयार होत होता.

तेच ते. पूर्वी बघितले होते तसे. तेच. तेच....

इकडे तळ्यात मानवी डोक्याच्या आकाराचे मोठे बुडबुडे आळीपाळीने डोके वर करत होते.
त्याचा आवाज एवढा मोठा होता की अमेयचे तिकडे तळ्याकडे लक्ष गेले. अंधारलेले तळे आणि त्यातून मानवी डोक्याच्या आकाराचे मोठे बुडबुडे आळी पाळीने डोके वर खाली करत होते.
दृश्य मोठे अद्भुत आणि भीतीदायक होते. त्या प्रत्येक डोक्यामध्ये दोन मोत्यासारखे चमकणारे डोळे होते.

तिकडे पर्वतावरच्या पावसातून डोके आणि मानेपर्यंतची स्त्री- मानवाकृती तयार होत होती.
मग माने पासूनचा खालचा भाग दिसायला लागला. चेहेरा अजून ओळखीचा वाटत नव्हता. पण ती आकृती खुपच सुंदर होती.
पावसाच्या थेंबाथेंबांपासून हळूहळू एक स्त्री तयार होत होती.

अमेय उठून उभा राहीला आणि त्या अद्भुत दृश्याकडे पाहू लागला.
कॅमेरा घेवुन याची शूटींग केली पाहीजे असा विचार त्याच्या मनात आला. पण त्या दृश्याकडे पाहून तो इतका हरखला होता की डोळ्याची पापणी न लवता तो समोर बघत होता.

अ‍ॅनाचा कॉल आल्याने अमेयचा तंबूतला मोबाईल वाजू लागला.


(6)

पावसाच्या थेंबापासून तयार होणार्‍या त्या स्त्रीचा चेहेरा तयार झालयानंतर मानेपासूनचा खालचा भाग हळूहळू तयार होत होता. मग त्या स्त्रीची पूर्ण आकृती तयार झाली.

एक अद्भुत सुंदर स्त्री. यापेक्षा सुंदर स्त्री या भूतालावर असूच शकत नाही, असे वाटण्याइतकी सुंदर आकृती तेथे तयार होत होती.

तीचे डोळे अजूनपर्यंत बंद होते. ती पाठमोरी होती. तीने डोळे उघडले आणि अमेयकडे बघितले.

तीच् ती! त्या दिवशी भेटलेली.

अमेय उठून उभा राहीला आणि त्या अद्भुत दृश्याकडे पाहू लागला. डोळ्याची पापणी न लवता तो समोर बघत होता.

त्याला आठवले :

"मागच्या वेळेस ती स्त्री त्याला जेव्हा प्रथम भेटली होती तेव्हा ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात असताना काही वेळ त्याला कसा गेला ते कळलेच नाही, जवळपास एखाद्या संमोहनासारख्या अवस्थेत तो होता आणि त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर नंतर पाण्याने पूर्ण ओला झालेला होता आणि ती मात्र तेथे नव्हती"

अ‍ॅनाचा कॉल आल्याने वा़जणारा मोबाईल उत्तर न मिळाल्याने थोड्यावेळाने वाजणे बंद झाला.

एव्हाना ते तळ्यातले वर डोके काढणारे बुडबुडे जास्त वेळा वर खाली व्हायला लागले, ते आता पूर्ण वर आले आणि पाण्यात पूर्ण उभे राहीले होते आणि आता तळ्यातल्या अंधारात उभे होते सात पाणी-सदृश्य मानव!

चमकणारे डोळे असणार्‍या पाणीयुक्त मानवाकृती. ते सात पाणी-मानव होते किंवा जलजीवा. ते सातही जलजीवा एकमेकांकडे पाहून हसत होते. मग ते त्या स्त्रीकडे पाहून ओळखीचे हसले.

एक जलजीवा म्हणाला: "मागच्या वेळेस आपण चुकलो आता चुकणार नाही."

दुसरा जलजीवा म्हणाला: "इथपर्यंत येणे काही साधी गोष्ट नाही. किती वर्षे निघून गेलीत, तेव्हा आपण येथेपर्यंत आणि या साध्यापर्यंत पोचलो आहोत. पण आपल्यासाठी काळ, वेळ गौण आहे. काळ-वेळाच्या सीमारेषेंचे बंधन आपण कधीच तोडले आहे.

आता लवकरच आपल्याला विविध ठीकाणी सावजांच्या शोधात जायचे आहे. आपण निवडलेले ते अनेक सावज."

तिसरा जलजीवा म्हणाला: "आता वेळ आली आहे. सगळ्या दुनियेला आता कळेल लवकरच. आम्ही कोण आहोत ते!"

ते जलजीवा एकमेकांशी बोलू लागले. नमातुआ जोराजोरात किलकिल करू लागला. तेथे मग पाच सहा नामातुआ पक्षी आले. त्या जलजीवांनी त्या पक्ष्यांवर हल्ला चढवला. तळ्यातले पाणी स्वयंस्फूर्तीने तळ्यातून वर जावून त्या पक्ष्यांच्या अवती भवती घोंगावू लागले.

त्त्या पक्ष्यांच्या नाकातोंडात घुसू लागले. ते पक्षी जीवाच्या आकांताने ओरडू लागले आणि तेथून पळून गेले.

एक जंगल. मध्यवर्ती ठिकाणातले तळे. संध्याकाळ. पाऊस पडतोय. अंधारलेल्या त्या तळ्यात उद्भवलेले सात जलजीवा आणि एक स्त्री जलजीवा.

त्यांच्या मधोमध सापडलेला अमेय.

मागच्या वेळेस तो आला होता तेव्हा फक्त तीच तेथे होती. ते तळयातले सातजण तो प्रथमच पाहात होता.

ती स्त्री-जलजीवा त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत होती. अमेय ला हे दृश्य पाहून भोवळ आली. भोवळ येता येता त्याने एक नांव त्या सगळ्या जलजीवांच्या तोंडून पुसटसे ऐकले. ते नांव त्याने या आधी नक्की ऐकले होते असे त्याला वाटत होते.. पण काही समजण्याच्या आतच तो कोसळला.

पण अंगात त्राण होते. तो उठून पळायला लागला. ते तळ्यातले पाणी जलजीवांच्या रुपाने आपोआप वर उडाले आणि अमेयच्या मागे मागे येवू लागले.

ते पाणी अमेयच्या शरीराला वेढा घालू लागले. तो जीवाच्या आकांताने पळू लागला. पाणी पायापासून त्याच्या शरीराला वेढा घालत घालत कमरेपर्यंत येत होते.

***

"व्ह्याय अमेय नॉट पिकींग अप फोन?" अ‍ॅना विचार करत होती.

तीच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती. ते सांगायला तीने त्याला फोन केला होता.

"कुठे गेला असेल तो? आणखी थोड्यावेळाने ट्राय करून बघते." असे म्हणून ती कार मध्ये बसली आणि तीच्या आईला जेथे अ‍ॅडमीट केले होते त्या हॉस्पीटल मध्ये ती जायला निघाली.

आई बेशुद्धावस्थेत होती. तीला अचानक भोवळ आली होती. त्यानंतर तीला दवाखान्यात अ‍ॅडमीट केले होते.

संध्याकाळी तीने पुन्हा अमेयला कॉल केला पण कुणी उचलत नव्हतं.

***

संध्याकाळी सहा वाजता काकूंना चिंतेत पाहून अशोकराव म्हणाले, "काय ग? काय झाले? अहो अमेयचा नंबर लागत नाही आणि तुम्हाला फोन करत होते तर तुमचा नंबय सतत बिझी येतोय. "

अशोकराव - " काय? म्हणजे अजून अमेय घरी आला नाही? मी तर त्याला फोन केला होता, पावसाचं लवकर निघण्यासाठी... अजून आला कसा नाही?"

तेवढ्यात अशोकरावांच्या मोबाईलवर कॉल आला. मुंबईहून. अरविंद म्हणजे अमेयचे वडील यांचा.

अरविंद- "अमेय ला कॉल केला तो उचलत नाही म्हणून तुम्हाला केला. कुठे आहे तो?"

अशोक - "अरे मी आता बाहेरून येतोय. अमेय अजून आला नाही. मी ही त्याला लवकर निघून येण्यास सांगितले होते, पण अजूनपर्यंत तो आला नाही. मी जातोय त्याला आता बघायला. माझ्या सोबत काही जणांना घेवून जातो"

अरविंद- "काय? मला वाटते तो आज एकटा होता. त्याची टीम उद्या येणार होती. त्याचा मित्र जितिन? तो नाही का गेला त्याचेबरोबर आज?"

अशोक - "तसा काही धोका नाही आहे तेथे, पण ... मी आता जातो आणि कळवतो. तू निश्चिंत रहा."

अशोकराव त्यांची मोटारसायकल घेवून जंगला कडे निघाले.

"अगं! मी येतो. असेल कुठेतरी. कदाचीत तो रस्त्याने परत यत असेल आणि मोबाईल कुठे विसरला असेल. मी बघतो."

असे म्हणत आणि रेनेकोट अंगावर चढवत त्यांनी आपली मोटारसायकल सुरु केली. त्यांनी सोबत टॉर्च घेतला होता.

तो जार्वार पर्वताच्या पायथ्याशी गेला असेल याची त्यांना कल्पना होती.

पाऊस थोडा थोडा पडत होताच. त्यांनी शेतातला गडी धोंडू याला ही सोबत घेतले होते.

गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता. संध्याकाळचे सहा वाजले होते. नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव आला. मग वर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता.

चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आला आणि मग ते शर्वरी जंगल होते. स्थानिक लोकवस्ती होती. त्यांच्या झोपड्यांत अंधुक प्रकाश येत होता

अन मग पुढे सुना कच्चा रस्ता. कच्च्या रस्त्यावर पावसात गाडीचा प्रकाशझोत पडत होता.

नामातुआ जोरात ओरडत यांच्या गाडीच्या मागे येत होता.

एव्हाना जितिनलाही ही खबर काकूंकडून कळली आणि तोही अशोकरावांच्या गाडी मागोमाग मोटारसायकलवरून आला.

***

दिल्ली आणि मुंबईहून आलेली टीम आसंद जवळच्या एका शहरातल्या हॉटेलमध्ये सात वाजता येवून थांबली होती. त्यात त्रीशा आणि भार्गवी दोन्ही होत्या.

त्यांनी आल्यावर सेटल झाल्यावर अमेयला कॉल केला.

पलीकडून अमेयचा फोन उचलला गेला.


(7)

दिल्ली आणि मुंबईहून आलेली टीम आसंद जवळच्या एका शहरातल्या हॉटेलमध्ये सात वाजता येवून थांबली होती. त्यात त्रीशा आणि भार्गवी दोन्ही होत्या.

त्यांनी आल्यावर सेटल झाल्यावर अमेयला कॉल केला.

पलीकडून अमेयचा फोन उचलला गेला आणि तो उचलला होता अशोकरावांनी.

त्या जंगलाच्या मध्यभागी तळ्याच्या जवळ भर पावसात अमेयला शोधून शोधून थकलेले अशोकराव, जितिन आणि धोंडू हे तिघे उभे होते.

शेवटी जवळपास मोबाईलची बीप बीप ऐकू आल्याने त्यांना अमेयचा मोबाईल सापडला आणि त्यांनी तो उचलला. पण, बॅटरी फारच थोडी उरली होती.

अशोकराव- "हॅलो! कोण?"

भार्गवी- "हाय.. अमेय?... मै भार्गवी बोल रही हू... नाफ्ट चॅनेल की टीम से."

अशोकराव- "अरे. ओके. मला तुम्हाला हे सांगायला थोडं अवघडल्यासारखं होतय की, अमेय हरवलाय, जंगलातून गायब झालाय. आम्ही त्याला शोधतोय."

सांगतांना अशोकरावंचा आवाज थरथरत होता.

कॉल अचानक कट झाला. कारण मोबाईलमधली बॅटरी संपली होती.

भार्गवीने आपल्या टीमला हा निरोप दिला. ती ही हादरली होती. पण बोलता बोलता अचानक कॉल कट झाल्याने त्यातले बारकावे तीला कळले नाहीत.

भार्गवी- "पण, अमेय ऐसे कैसे गायब हो सकता ऐ, समझ नही आ रहा है!"

त्रीशा- "आपण, लेस्टर बेनेटला कॉल करूयात का? की आधी वस्तुस्थिती जाणून घेतल्या नंतरच काय ते ठरवायचे?"

टीम बराच वेळ चर्चा करत होती. जर अमेय खरंच हरवला असेल तर शूटींग पुढे करायची की परत जायचे की आणखी काही?

त्यांनी प्रथम वस्तुस्थिती जाणून मगच लेस्टर बेनेटला दुसर्‍या दिवशी कॉल करायचे ठरवले. शूटींगचा स्पॉट आणि इतर माहिती या टीमला ही होतीच.

पण, अमेयवीना ही शूटींग? शक्य नव्हते. अमेय ची शूटईंग करतांनाची स्टाईल, त्याची बोलण्याची लकब आणि तो स्वतः हे अगदी लोकप्रिय होते. अमेयच्या या आणि इतर अनेक वैशिष्ट्यांमुळेच त्याहे व्हिडीओज खुप लोकप्रिय झाले होते. बरेच लोक फक्त तो एखाद्या व्हिडीओत अ‍ॅन्कर आहे म्हणून फक्त त्याची डॉक्युमेंटरी वगैरे बघायचे.

भार्गवी -"अरे त्रीशा, एक मिनीट! अमेय के काका के घर चलते है हम सब.... किसी के पास उनका अ‍ॅड्रेस तो जरूर होगा?"

त्रीशा- "लेकीन, अब यहासे बस मिलेगी क्या हमें?"

टीम मधील एक जण राहुल म्हणाला- " मै नीचे जाकर पूछ्ताछ करके आता हू, वरना कल चलेंगे...!"

****

इकडे अ‍ॅनाची आई बेशुद्धावस्थेत होती. तीला अचानक भोवळ आलेली होती आणि त्यानंतर तीला मोठ्या हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट केले गेले होते. तीने एन. एच. एस. मधून पूर्ण सुटी घेतली होती आणि तीची आई दाखल असलेल्या हॉस्पीटलमध्ये ती आली होती. संध्याकाळी मुख्य डॉक्टर नुकतेच आले होते आणि ते तीच्या आईला चेक करायला आतमध्ये गेले होते.

डॉक्टरांच्या येण्याची वाट बघत ती बाहेर बेंचवर बसली होती.

तीच्या सोबत मदतीला म्हणून बाजूच्याच रस्त्यापलीकडे राहाणार्‍या तीच्या एका मित्रास - जेफ ट्रेल यास ती घेवून आली होती. ते दोघे स्कूलमध्ये सोबत शिकले होते. तो संध्याकाळी मदत लागल्यास पुन्हा येणार होताच.

....आता संध्याकाळी तीने पुन्हा अमेयला कॉल केला पण कुणी उचलत नव्हतं.

नंतर पुन्हा कॉल लावल्यानंतर मोबाईल स्वीच ऑफ येत होता.

तीने त्याला कॉल करण्याचा नाद तात्पुरता सोडून दिला. पुन्हा तीला रडू यायला आले.

शक्यतो तीची आई वाचणार नव्हतीच. पण तीला आशा होतीच!

पण डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी तो निरोप सांगितला.

डॉक्टर- "मिस अ‍ॅना, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी टू से... युवर मदर हॅज ऑन्ली टूमॉरोज टाईम. शी इज नाऊ कॉन्शस अ‍ॅण्ड कॅन स्पीक.. ती आता शुद्धीवर आहे आणि, तीच्या जवळ फक्त उद्याचा दिवस आहे. तीला तू घरी घेवून जावू शकतेस. तू स्वतः डॉक्टर असल्याने तुला माहिती आहे की हा आजार किती तीव्र आणि असाध्य आहे... मी माझ्या परीने प्रयत्न केले..."

अ‍ॅनाला रडू कोसळले आणि तीला प्रकर्षाने अमेयची आठवण आली. पण फोन लागत बव्हता. काय झाले याला?

आज दुपारनंतर त्याने फोन का केला नाही? त्याचा फोन का लागत नाही आहे?

तेवढ्यात कारने जेफ आला आणि रडणार्‍या अ‍ॅनाला पाहून त्याच्याही पोटात गोळा आला आणि त्याला पुढची धोक्याची सूचना आपोआप समजली. डॉक्टर ने त्यालासुद्धा समजावून सांगितले आणि अ‍ॅनाला आधार देण्यास सांगितले.
मग ते तीघे हॉस्पीटलच्या अँम्ब्युलन्स ने अ‍ॅनाच्या घरी आले. प्रवासात आई निश्चल पडून होती आणि अ‍ॅना सारखी रडत होती.

घरी बेडवर आईला व्यवस्थीत झोपवल्यानंतर अँम्ब्युलन्स आणि इतर कर्मचारी सूचना देवून निघून गेली.....

जेफ- "रात्री मी थांबू का मदतीला?"

अ‍ॅना- " यस, प्लीज. थॅन्क्स! तू खालच्या हॉलमध्ये झोपू शकतोस.. खरंच प्लीज थांब आजच्या रात्री... आईला काही त्रास झाला तर तुझी फार मोलाची मदत होईल."

जेफ- "आय वील ब्रीग यु अ सॅण्डविच ऑर समथिंग..?"

अ‍ॅना- "नो आय एम फाईन"

जेफ- "काहीतरी खावून घे. अशाने तब्येत बिघडेल. मी आणतो. तोपर्यंत आईशी बोल् टिची काळजी घे...तीला काही बोलायचे असेल! चल येतो."

जेफ कारने बाहेर निघून गेला.

अ‍ॅना ने पुन्हा अमेयला फोन लावला पण व्यर्थ.

मग तीला अचानक आठवलं की त्याचा मुंबईचा पत्ता आणि त्याच्या भावाचा अमोलचा नंबर तीने एकदा कुठेतरी लिहून घेतला होता. तो शोधायला ती टेबलाकडे वळताच तीला आईने हाक मारली.

आई- "अ‍ॅना.. इकडे ये.. मला तुला काहीतरी सांगायचंय!"

अ‍ॅना ला हुंदका आवरला गेला नाही- "आई... सांग ना"

आई- "अमेय ला फोन केला होतास? "

अ‍ॅना- "नाही... फोन लागत नाही आहे."

आई- "माझी शेवटच्या दोन इच्छा आहेत: एक म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न करावे आणि दुसरी म्हणजे तुझ्या बाबांच्या काही गोष्टी मला तुला आताच सांगायच्या आहेत."

अ‍ॅना- "तसंच होईल आई. सांग कोणत्या गोष्टी आहेत त्या?"

आई- "माझा लॅपटॉप ऑन कर!"

अ‍ॅना ने लॅपटॉप ऑन केला. विंडोज सुरू झाले.

टास्क बार आणि स्टार्ट मेनू दिसयला लागला.

आई- "डी ड्राईव्ह मध्ये माझी एक एक्सेल फाईल आहे, ती पासवर्डनेच ओपन होते. त्यात माझे सगळे ईमेल आणि बँकेचे पासवर्ड आहेत..."

अ‍ॅना- "ममा... ते ठीक आहे. या पैशांच्या गोष्टी आता इतक्या महत्त्वाच्या नाहीत...."

आई- "मी काय म्हणते ते पुढे ऐक्....त्या फाईलमध्ये तुझ्या वडीलांच्या अनेक सिडीज ओपन करण्याचे पासवर्ड्स लिहिलेले आहेत. ते फक्त तुलाच देण्याचे मला त्यांनी सांगितले होते... त्या सीडींमध्ये बरीच रहस्ये आहेत...."

आई पुढे म्हणाली- "त्या सिडीं मध्ये बरीच रहस्य आणि माहिती आहे. ती मी तुला सगळी आता सांगू शकत नाही. पण, त्यातली कोणती माहीती जगजाहीर करायची आणि कोणती नाही हे सगळं त्यात लिहिलं आहे. ते पाळ!!!

तुला माहीतीच आहे की तुझे वडील जहाजावर इंजिनियर होते. तू बरीच लहान असतांना ते वारले...झाली का ओपन फाईल"

अ‍ॅना- "ठीक आहे आई. सांग तुझ्या एक्सेल फाईलचा पासवर्ड.."

आईच्या त्या फाईलचा पासवर्ड म्हणजे वडीलांच्या नावाचा होता.

ऑर्थर हॉफमन.

पासवर्ड टाकताच फाईल ओपन झाली. सहज फाईलवर नजर टाकताच त्यात अनेक पुस्तकांबद्दल माहिती होती...अनेक सीडींची माहिती, त्यातल्या फाईल्स त्यांचे पासवर्ड व इतर अशी अनेक प्रकारची माहिती होती.

त्यात लिहीलेल्या प्रत्येक फाईलचा प्रत्येक पासवर्ड एकाच शब्दाने बनलेला होता पण फक्त त्यात नंबर्स वेगवेगळे होते.

तो पासवर्ड होता- "डेव्हिल्स स्क्वेअर"!! (DEVIL'S SQUARE)

(8)

त्या मुख्य एक्सेल फाईलचा पासवर्ड तीच्या वडीलांच्या नावाचा होता पण फक्त स्पेलींगमध्ये थोडा फेरफार केलेला होता तो आईने तीला सांगितला होताच!

फक्त चकीत करणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्या फाईलमध्ये ज्या इतर सिडीजची, तारखेवार विविध प्रकारच्या फाईलसची जी लीस्ट होती, त्यांचे पासवर्ड समोरच्या कॉलममध्ये लिहिले होतेच पण प्रत्येक फाईलचा पासवर्ड डेव्हील्स स्क्वेअर या शब्दानेच बनलेला होता आणि फक्त त्यात विविध अंकांची योजना केली होती.

आणखी वरच्या बाजूला एक बारीक सूचना लिहीली होती, की हे जे लिहीलेले पासवर्ड्स होते त्यांच्या अंकात अजून काहितरी एक ठरावीक बदल करायचा आणि मगच तो पासवर्ड व्हॅलीडेट (प्रमाणीत) झाला असता.

आणि काय फेरफार करायचा हे पुन्हा एका फाईलमध्ये लिहिले होते आणि ती फाईल कशी ओपन करायची याबद्दलही काही सूचना होत्या.

"सगळे काही विस्मयकारक आहे, आश्चर्यजनक आणि अविश्वसनीय आहे", अ‍ॅना विचार करत होती.

"ठीक आहे, आणखी काही आहे की फक्त हेच आहे जे तुला सांगायचे होते?" अ‍ॅना आईला म्हणाली.

"नाही लाडके, एवढीच एक फाईल दाखवायची होती", आईचा श्वास थोडा गुदमरल्यासारखा वाटत होता.

"बंद कर ती फाईल आणि शट डाऊन कर..."

अ‍ॅना म्हणाली, "ओ.के. नंतर मी बघेन सगळं! आता मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे."

असे म्हणत तीने विन्डोज शट डाऊन केले.

पण जसा कॉम्प्युटर आणि विंडोज शट डाऊन केल्यावर पुन्हा स्टार्ट करता येतात तसे मानवी जन्म शट डाऊन केल्यावर नंतर पुन्हा स्टार्ट करता येत नाही, किमान आपल्या हाती तरी ते नसतं. मानवी आयुष्य शट डाऊन करणं आपल्या हातात नसतं. ते या पृथ्वीला चालवणारा कुणीतरी प्रोग्रामर असतो की आणखी कुणीतरी, त्याच्या हातात असते. मानवी जन्म शट डाऊन झाल्यावर पुडे काय होते? हे आजपर्यंत कुणालाही कळलं नाही. पण, नक्की काहीतरी होत असावं.

कारण, शरीर जरी नष्ट होत असलं तरी त्यात असलेल्या मेंदूंमधले विचार? त्यांचं अस्तित्त्व नेमकं शरिरात कसं, कुठे असतं (आपण मानतो की ते मेंदूत असतं), मृत्यू सोबत शरीराबरोबर ते विचारही नष्ट होतात? नाही! विचारांना वस्तुमान नसतं. विचार ही एक उर्जा असते का? आणि उर्जा नष्ट केली जाऊ शकत नाही, फक्त उर्जेचे रुपांतर होवू शकते. कशात होते रूपांतर या सगळ्या विचारांचे, विचारांना उर्जा मानले तर??

रोझी डिमेलो- हॉफमन चे आयुष्य शट डाऊन झाले होते. इकडे कॉम्प्युटर आणि तिकडे अ‍ॅनाच्या आईचे जीवन. अ‍ॅनाचे लक्ष मॉनिटरकडून उजवीकडे हातात सॅण्डविच असलेल्या आणि डोळ्यातून अश्रू गाळत असलेल्या जेफकडे गेले. आणि तीने गर्रकन मागे वळून बघितले.

आताच आपल्याशी बोलत असलेली आई अशी अचानक निघून गेली?

निदान डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे उद्यापर्यंत तरी तीचा सहवास लाभला असता. पण, ती तीच्या शेवटच्या इच्छा सांगू शकली हे महत्त्वाचे होतेच.

अमेय? कुठे आहेस तू?

आई आता या जगात नसल्याने तीला रडू कोसळले. जेफने तीला आधार दिला. मनातल्या तीव्र भावनेतून निर्माण झालेला तो अ‍ॅनाच्या डोळ्यातला अश्रू!!

अ‍ॅनाच्या नाजुक, सुंदर गालावरून ओघळत जाणारा तो तीव्र भावनेचा अश्रू!!
त्या अश्रू सारखेच असलेले दोन मोत्यासारखे भितीदायक डोळे त्या जंगलातल्या तळ्याजवळून घरी परतणार्‍या अशोकराव, जितिन आणि धोंडू यांचे कडे रोखून पाहात होते. त्या तिघांना त्याची अर्थातच कल्पना नव्हती. अमेयचा फक्त मोबाईल त्यांना सापड्ला. बाकी कॅमेरा आणि इतर वस्तू गायब होत्या. बॅग ही कुठे सापडत नव्हती.

जंगलात नामातुआंची अखंड किलकिल सुरूच होती. नेहेमी पेक्षा त्यांच्या ओरडण्याला आज एक विचित्र अशी मिती होती.अमेयचा शोध न लागल्यामुळे ते तिघे घाबरले होते, काळजी करत होते.

ते भर पावसात बाईकवर परत येत असतांना त्या जंगलातल्या मध्यभागी असलेल्या जार्वार पर्वतावर उभी असलेली अद्वीतीय सुंदर स्त्री पावसाच्या पाण्यात हसत हसत विरघळत होती. विरघळून ती पर्वताच्या टोकाशी जात होती. इतर पावसाचे पाणी पर्वतावरून खाली कोसळत होते, पण "ते" पाणी, पर्वताच्या पायथ्यापासून वरच्या दिशेने चढत होते. असे अनेक जलजीवा पाणी रुपात पर्वताच्या टोकाकडे उलट वाहात जात होते. दॄश्य मोठे अदभुत होते.

रस्त्यावरून परत येत असतांना एक वीज कडाडली आणि त्या विजेच्या प्रकाशात आकाशात अनेक मोत्यासारखे डोळे पापणी न लवता पॄथ्वीवर बघतांना दिसत होते.
पाऊस सुरु असतांना खिडकीतून कडाडल्या वीजेकडे सहज म्हणून बघतांना अ‍ॅनाला त्या वीजेच्या प्रकाशात आकाशात अनेक डोळे पापणी न लवता पॄथ्वीवर बघतांना दिसत होते. एव्हाना तीला अमोलला कॉल केल्यावर अमेयच्या गायब होण्याची बातमी समजली होती आणि तीच्या साठी हा दुसरा धक्का होता.

अरविंद आणि अमोल वगैरे सगळ्यांना बातमी समजलेली होती. सगळ्यांनी आपापल्या परीने तपास करायला सुरूवात केली होती.

अशोकरावांचे मित्र असलेले पोलीस सुद्धा सत्य परिस्थिती समजावीन घेवून तपस करण्याचे ठरवून, विविध प्रश्न विचारून निघून गेले होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी टीव्ही टीम सुद्धा अशोकरावांकडे येवून पोहोचली होती. यापूर्वी जगातल्या विविध अशा अनोळखी आणि दुर्गम पर्वतात, जंगलात कधी एकट्याने तर कधी टिमसोबत कितीतरी वेळा अमेयने शूटींग केली होती,

पाण्याखाली सुद्धा त्याने बरेच व्हीडीओज शूट केले होते. पण स्वतःच्या काकांच्या गावी ओळखीच्या अशा ठीकाणी अमेय अचानक नाहीसा कसा झाला?

तशा व्यक्ती रहस्यमयपणे नाहीश्या होणाच्या अनेक घटना आतापर्यंत जगात विविध ठिकाणी घडल्या आहेत आणि त्या व्यक्तीचा नंतर कसलाच ठावठीकाणा, थांगपत्ता लागला नाही. पण, काही बाबतीत गायब होणारी व्यक्ती ही एक्तीच असायची. त्या व्यक्तीसोबत काय घडले हे त्यामुळे कुणालच कळत नव्हते.

अमेयचा कॅमेरा सुद्धा गायब होता. त्यामुळे काय झाले हे इतरांना कळायला काही मार्ग नव्हता. जंगलात हिस्र प्राणी नव्हते. फक्त रानमांजरासारखे दिसणारे काहीतरी त्या जंगलात राहात होते, पण त्यापासून तसा धोका नव्हता.

लेस्टर बेनेट ला परिस्थीती समजावून सांगितल्या नंतर त्यांनी शूटींग रद्द करायचे ठरवले आणि टीम आपापल्या स्टुडीओत परत गेली.

रोझी डीमेलो चे तसे कुणी फारसे नातेवाईक भारतात नव्हते. जे होते त्यांना अ‍ॅनाने बातमी कळवली.

ऑर्थर चा एकमेव भाऊ होता तोही राहात होता ऑस्ट्रेलीयात आणि इतर काही नावापुरते दूरचे नातेवाईक होते.

त्याला ही बातमी अ‍ॅनाने कळवली होतीच.

रविवारी दुपारी जड डोळ्यांनी अ‍ॅना ने लॅपटॉप काढला.

ती फाईल ओपन केली. कसलाही पासवर्ड न टाकता ओपन होवू शकणार्‍या फाईलही त्यात खुप होत्या.

त्यात विविध प्रकारची माहिती होती.

आतापर्यंत अ‍ॅनाला वडीलांच्या या जॉबबद्दल जास्त काही माहिती नव्हते. आईकडूनचे जे काय ते तीने ऐकले होते. या लॅपटॉपबद्दल सुद्धा तीला आताच माहिती झाले होते.

जहाजावरच्या जीवनावरच्या काही नोंदी असलेली पासवर्ड असलेली एक फाईल तीने ओपन केली.

त्या फाईलमध्ये तीच्या वडीलांनी लिहिलेली डेव्हिल्स स्क्वेअर बद्दलची माहिती होती. फाईल बरीच मोठी होती.
तीने वाचायला सुरुवात केली:

"साऊथ अटलांटीक ओशन जवळच्या "साऊथ जॉर्जिया" या यु.के. च्या अधिपत्याखाली असलेल्या बेटाच्या थोडे खाली दक्षिणेकडे गेले असता एक चौकोनी आकाराचे बेट आहे. ते बेट आणि त्याच्या आसपासचा भाग मिळून डेव्हिल्स स्क्वेअर म्हणून ओळखले जाते.

तसे त्या बेटाचे नाव कागदोपत्री - जॉर्जियन स्क्वेअर आयलॅण्ड असे आहे.
त्या बेटावर जंगल आणि मोठमोठे पहाड आहेत. त्या पहाडांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील मातीचा रंग हिरवा आहे.

हे बेट तसे सर्वज्ञात नाही. फार थोड्या लोकांना याबद्दल माहिती आहे. त्या बेटाच्या आजूबाजूला अनेक छोटीछोटी बेटे आहेत. असे म्हणतात की काही बेटांवर समुद्री चाचे वास्तव करून असतात.

डेव्हिल्स स्क्वेअर हे बेट मोठे चमत्कारीक आहे.
त्या बेटाबद्दल आणि आसपासच्या समुद्रा बद्दल अनेकांना वेगेवेगळे चमत्कारीक आणि भीतीदायक अनुभव आले आहेत!!!
मी जहाजावर असतांना त्याबद्दलच्या, त्यावर वास्तव्य करून असलेल्या चाच्यांबद्दलच्या अनेक कथा ऐकायचो. तेथे खरोखरीच चाचे होते की नाही माहीत नाही पण, तेथे जाण्यार्‍या जहाजांवर चाचे अनेकदा हला करत हे नक्की! ते चाचे कोठून येत, कोठे जात कुणाला नीट सांगता येत नाही....

पण ते येत. अचानक येत. बरोबर त्यांना जहाज येण्याचा सुगावा लागे आणि ते जहाजावर दाखल होत.
त्यांच्या ग्रुपमध्ये एक स्त्रीही असायची. मोठी सुंदर, मादक आणि अद्भुत स्त्री असायची ती.....

तो प्रसंग माझ्या चांगलाच आठवणीत आहे....

एकदा माझी नियुक्ती लंडनहून साऊथ जॉर्जिया कडे जाणार्‍या जहाजावर होती. जहाजावर असलेल्या अनेक टेलीकॉम इंजिनियर्स पैकी मी एक होतो.

आमच्या तीन शिफ्ट मध्ये ड्युटीज असायच्या. कामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळात मी आमच्या स्पेशल रुममध्ये महत्त्वाचे प्रसंग फाईल्स मध्ये लिहायचो. मला जलप्रवास खुप आवडतो. माझ्या सोबत मी माझा लॅपटॉप नेहेमी बाळगतो. महत्त्वाच्या नोंदी करण्यासाठी....पण बरेचदा घरी आल्यानंतरच घडलेले प्रसंग मी लिहीतो.

... जहाज साऊथ जॉर्जिया कडे जात होते. हाडे गोठवून टाकणारी थंडी. सगळे काही सुरळीत चालले होते. रात्र झाली. त्या रात्री माझी ड्युटी होती.."

(9)

......हताश अ‍ॅना पुढे वाचत होती:

रात्र शांत होती. जहाजावर काही प्रवासी होते आणि काही भाग माल वाहून नेण्यासाठी राखून ठेवलेला होता. प्रवाश्यांपैकी बहुतकरुन लोक हे श्रीमंत लोक होते. काही हौस म्हणून तर काही संशोधनाचा भाग म्हणून तर काहींना आपल्या काहीजण जलमार्गे काही सोन्याच्या, जुन्या किमती तसेच कर चुकवून आणलेला माल वाहून आणण्यासाठी आणि लपवून ठेवण्यासाठी वापर करत. अनेक अवैध धंदेही चालत जहाजावर. आपण भले आणि आपले काम भले या न्यायाने मी तेथे होतो.

पोटापाण्यासाठी या मोठ्या जहाजावर प्रवास करावा लागत असे. मी ही त्यापैकीच एक. पोटापाण्यासाठी जहाजावर काम करणारा एक टेलीकॉम इंजिनियर. तसा मी जलप्रवासाची आवड असणारा एक हौशी जलप्रवाशी ही आहेच. आम्हाला सहा सहा महिने फॅमिली पासून दूर रहावे लागते....

.....आता मी हे घरी आल्यानंतर लिहीत आहे.

यातला काही भाग वापरुन मला वर्तमानपत्रांमध्ये लिखाणही करायचे आहे.
सामान्य वाचकांना सगारातली अदभुत रहस्ये सांगायची आहेत म्हणूनसुद्धा मी हे विस्तृत स्वरुपात लिहून ठेवत आहे....

मात्र लिखाणाचा काही भाग फक्त ठरावीक महत्त्वाच्या लोकांपर्यंतच जावा अशी माझी इच्छा आहे. ....

तो महत्त्वाचा भाग मी "हाऊ टू कंट्रोल वॉटर डीमन्स" या सिडी मध्ये साठवून ठेवला आहे.
तो कुणाला आणि केव्हा द्यायचं हेही त्या सिडीत तपशीलवार सांगितलेले आहे.
तसेच "स्टेटस ऑफ द वॉटर: अ बुक बाय अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो" यातला एक महत्त्वाचा भाग सुद्धा त्या सिडी मध्ये आहे.......असो.

तर मी काय सांगत होतो... त्या रात्रीबद्दल.
ती रात्र. जहाज साऊथ जॉर्जिया कडे जात होते.
हाडे गोठवून टाकणारी थंडी. सगळे काही सुरळीत चालले होते.
रात्र झाली. त्या रात्री माझी ड्युटी होती..माझे केबीन जहाजाच्या कॅप्टनच्या केबीनजवळच होते.
माझ्या केबीनमध्ये इतर इंजिनियर्स सोबतच मीही असे.
समोरच्या मोठ्या स्क्रीनकडे बघून जहाजाच्या रडार यंत्रणेद्वारे येणारे सिग्नल नियंत्रीत करणे हे माझे काम, वेगवेगळे कंट्रोल पॅनेल्स असलेल्या बोर्ड वर वेगवेगळ्या की होत्या.

तशी आधी मनात भीती होतीच. साऊथ जॉर्जिया जवळ थोडे खाली दक्षिणेकडे असलेल्या चौकोनी आकाराच्या बेटाचा आणि आसपासचा भाग जो डेव्हिल्स स्क्वेअर म्हणून ओळखला जातो, त्याबद्दल ती भीती होती. आतापर्यंत ऐकून होतो त्या भागाबद्दल.

तसे त्या बेटाचे नाव कागदोपत्री - जॉर्जियन स्क्वेअर आयलॅण्ड असे आहे. त्या बेटावर जंगल आणि मोठमोठे पहाड आहेत. त्या पहाडांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील मातीचा रंग हिरवा आहे....

सर्व सुरळीत होते. मी शेजारच्या इंजिनियरला सांगून कॅप्टनच्या केबीन मध्ये गेलो. तेथे कॅप्टन शी ओळख असल्याने मी त्याच्याशी गप्पा मारल्या.

नंतर, आम्हाला समोरच्या काचेतून दूरवर समुद्रावर एक तरंगणारा बर्फाचा मानवी आकार दिसला. काळ्याशार समुद्रात तो तरंगणारा मानवी आकार. कॅप्टनच्या मदतनीसाला आम्ही थोड्या वेळाकरता जहाजाचा कंट्रोल देवून आम्ही दोघे पळत जावीन डेकवर गेलो तर आम्हाला जे दृश्य दिसले त्यात दूरवर समुद्रात अनेक बर्फाच्या बनलेल्या मानवाकॄती दूर असलेल्या आणखी एका जहाजाचा पाठलाग करत होत्या. डेकवर इतर कुणी नव्हते.

त्या आकृती नंतर जहाजावर चढल्या आणि मग ते जहाजच तेथून क्षणात दिसेनासे झाले....
हा अद्भुत प्रकार बघून क्षणभर आमचा डोळ्यांवर विश्वास बसला नाही.....
घडलेला प्रकार आम्ही कुणाला सांगितला नाही.......
थोड्याच वेळात पाण्यावर छोटछोटे हिमनग तरंगत होते. आणि आधी पाहीलेले ते तिथे नव्हते....

ते जहाज गेले? कुठे?
योगायोगाने आम्ही वाचलो....की अजून धोका पुढे यणार आहे?

कदाचीत हा भास असेल तर....?

तसे आम्ही त्या डेव्हिल्स स्क्वेअर च्या हद्दीत शिरणार नव्हतोच.....

पण त्या जहाजावर आलेले काही हौशी प्रवासी जे जीव धोक्यात घालून त्या डेव्हिल्स स्क्वेअर च्या हद्दीत जाणार होते, अशांबद्दल मी एका रात्री सहज म्हणून डेकवर फिरण्यासाठी गेलो असता ऐकलं होतं.

त्यांनी सर्व तयारी केली होती. तसे सगळे ऐकीव असल्याने कुणी कायदेशीरपणे त्या भागावर जाण्यास मज्जाव केलेला नव्ह्ता. पण, तरीही विषाची परीक्षा कोण घेईल? पण, ते चार लोक आले होते. विषाची परिक्षा घेण्यासाठी. नुसती परीक्षा घेवून थांबण्याचा त्यांचा मानस नव्हता तर, ते त्या विषाला आव्हान देणार होते. देवोत.

साऊथ जॉर्जिया. सुंदर ठीकाण!

मी पहिल्यांदाच जात होतो. तेथे सहा दिवसांचा हॉल्ट होता आणि परत यायचे होते.

ते चार जण तयारीला लागले होते. त्यांची नावे होती - सॅम, जेन, मॅट, केट.

जेन आणि केट या दोन्ही मुली सुद्धा साहसा साठी तयार होत्या. त्या सर्वजणांनी जहाजावरचीच एक छोटी नाव भाड्याने घेतली होती आणि त्याद्वारे ते सहा दिवसात परत येणार होते. माझी त्यांच्याशी काही दिवसांपूर्वी जहाजाच्या स्वीमींग पूलवर ओळख झाली होती. त्या पैकी दोघेच होते त्या दिवशी स्वीमींग पूलवर. केट स्विमींग ड्रेसमध्ये खुपच छान दिसत होती. त्याच स्विमींग ड्रेस सह ती कॉफी प्यायला बसली होती. ती आणि मॅट हे दोघे कॉफी घेत असतांना मी जवळ बसलो होतो. त्यांचे बोलणे ऐकल्यावर मी त्यांना त्याबद्दल विचारले.

केट म्हणाली, " होय. मी मूळची कॅनडातली. मला अशी सागरी साहसे करायला आवडतात. मी आणि मॅट लहानपणापासूनच मित्र. नंतर कॉलेजमध्ये आमची ओळख सॅम आणि जेन शी झाली. तेसुद्धा असेच साहसी."

मॅट. ब्राऊन कोट आणि ब्राऊन सूटातला मॅट. केट-मॅट. अगदी शोभून दिसणारी जोडी.

मॅट पुढे हसत म्हणाला, "आणि हो, आम्ही सुट्ट्या एंजॉय करायला सोबत येथे आलोय. या जहाजाच्या कॅप्टन च्या ओळखीने आम्ही यथे आलो आहोत. तर म्हट्लं येथे असलेल्या त्या "स्क्वेअरमधल्या डेव्हीलशी" बघावं दोन हात करून. कुणी म्हणतं की त्या डेव्हीलस स्क्वेअर मध्ये असलेल्या एका बेटावर एका दुर्मिळ धातूंचा खजिना दडलेला आहे.

कुणी म्हणतं तेथे दुसर्‍या महायुद्धात लुटलेलं सोनं आहे. काही म्हणतात की तेथे चाचे असतात आणि एका बेटावर त्यांचं एक पूर्ण शहर आहे. त्यामुळे तेथे कुणी येवू नये आणि सोने, धातू कुणी घेवू नये म्हणून या भागाबद्दल तशा अफवा पसरवल्या आहेत."

मी म्हणालो, "नाईस टू मीट उ. यु ऑल आर इंटरेस्टींग गाय्ज."

ते चौघं गेले. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसे त्या दिवशी वादळ घोंघावत होतं. पण त्या चौघांनी त्या साहसाची जय्यत तयारी केली होती, ते थांबणार नव्हते.

"काही रहस्ये सापडलीत तर मलाही सांगा बरं का धमाल चौकडी!"

ते बोटीतून निघून गेले. मी सहज म्हणून आकाशाकडे पाहीले असता मला आकाशात ढगांमध्ये चमकणारे डोळे दिसले. आकाशात एक विद्रुप काळा चेहेरा छद्मीपणाने हसत माझ्याकडे बघत होता. मला पुढे येणार्‍या कसल्यातरी संकटाची चाहूल लागली. मी देवाची प्रार्थना करुन त्या चौघांचे रक्षण करण्यासाठी मागणी मागीतली....


(10)


.... सहाव्या दिवशी परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी दुपारी चार वाजता, किनार्‍यावर बेशुद्धावस्थेत केट सापडली. तीच्यावर उपचार केल्यानंतर कॅप्टन शी बोलतांना मी म्हणालो,

"सध्या तर ती संभ्रमावस्थेत आहे. काही बोलत नाही आहे. पण आपण ऐकतो त्याप्रमाणे त्या बेटांवर जलजीवा वास्तव्य करून असतात. तेथे आलेल्या मानवांवर हल्ला करून ते त्यांना "मानव्-जलजीवा" बनवतात आणि आपला टोळीत सामील करतात. ते मरत नाहीत. त्यांना कसे काबूत आणायचे हे अजूनपर्यंत कुणालाही कळले नाही असे म्हणतात. ते स्वतःला पाणी, बर्फ, वाफ, ढग या सर्व रुपामध्ये पाहीजे तेव्हा रुपांतरीत करून घेतात. मी एका पुस्तकात हे वाचले आहे. मी त्यांना हे सांगितले सुद्धा होते. पण त्या चौघांनी ते हसण्यावर नेले....मला वाटते या सर्वांसोबत असेच काहीतरी घडले असले पाहीजे.
आणि आपण दोघांनी त्या रात्री बघीतलेले ते हिमनग? तो भास नसावा असे वाटते...."

कॅप्टन : "या सगळ्या कल्पना आहेत किंवा नाहीत हे नक्की सांगता येत नाही, असे मला वाटते. पण, काहीतरी गूढ आहे हे नक्की. तीला बरे वाटल्यावर आपल्याला कळेलच. "

केट बरी व्हायला आठवडा गेला.

तीने त्यानंतर आपला जो अनुभव आम्हाला सांगितला तो भयानक होता. कल्पनातीत होता."

यापुढील भाग फाईल नं. २ मध्ये. त्याचा पासवर्ड - डेव्हील्स स्क्वेअर- ९०९९२"

हे सर्व वाचतांना अ‍ॅनाच्या डोळ्यासमोर ती सतत फोटोत पहात असलेल्या आपल्या वडीलांचा चेहेरा तीला दिसला. तीला रडू आले. तीचा मोबाईल वाजू लागला.

अमोलः "अ‍ॅना. धीस ईज अमोल."

अ‍ॅना: "यस. अमोल. टेल मी."

अमोलः "अ‍ॅना, वि आर व्हेरी पॉझीटीव्ह टू फाइंड अमेया. बट वी रिक्वेस्ट यू टु कम डाऊन टू इंडिया. वी ऑल वांट टू मीट यू. आम्हाला तूला भेटायचे आहे. तू इकडे ये म्हणजे तुझी दोन्ही दु:खे हलकी होतील.

आपण सर्व मिळून अमेय ला शोधूयात. "

अ‍ॅना: "......"

अमोलः "वी नो. यु आर अपसेट. इफ यु टेक सम टाईम ऑफ अ‍ॅण्ड कॉल अस बॅक अ‍ॅण्ड लेट अस नो युर डिसिजन. सुटी घे आणि भारतात निघून ये. आम्ही तुझी वाट बघत आहोत."

अ‍ॅना: "थॅन्क्स....मे बी लॅटर आय वील टेल यू......आईची शेवटची इछा टिच आहे...अमेया शी लग्ना..... मी येईन... ठरवून सांगते...बाय!!"

आकाशात दोन डोळे अ‍ॅनाच्या खिडकी कडे पाहून हसत होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता आंघोळ करायचे ठरवून अ‍ॅना बाथ-टब मध्ये गेली.

अंगावरचे सगळे कपडे काढून ती टब मध्ये बसली. डोक्यात अमेयचाच विचार सुरू होता. गरम पाण्याचा शॉवर हातात धरून ती सगळी कडे फिरवत होती....

मग तीने शॉवर तोंडासमोर धरला. शॉवरचे सगळे थेंब तोंडावर आदळत होते.

शून्य मनाने ती शॉवर बाथ घेत होती. तीने डोळे बंद केले होते.

.......शॉवर मधले थेंब हळू हळू एकत्र यायला लागले.
एकत्र येवून येवून मोठमोठे थेंब व्हायला लागले. ते थेंब एकत्र येवून त्या थेंबातून चेहेरा तयार व्हायला लागला. तीने अचानक डोळे उघडले. समोर पाणी सदृश्य अमेयचा चेहेरा होता. तीला वाटले भास असेल. तीने पुन्हा डोळे बंद केले.

समोर अधांतरी हवेत पाण्यापासून अमेय तयार होत होता, तो तयार होवून बाथरूमच्या भिंतीवरून ओघळत ओघळत वरच्या दिशेला गेला आणि पाणी-सदृश्य अमेय आता बाथरूमच्या वरच्या भागाला चिटकलेला होता.

तीने डोळे उघडताच त्याला छतावर पाहून ती किंचाळली. तो अमेय उर्फ जलजीवा तीच्या कडे पाहून गूढ हसत होता. अमेय? आता? इथे? जलजीवा? बाबांनी लिहिलेले ते वाचल्यामुळे आपल्याला भास तर होत नसेल?

अचानक तीच्या डोक्यात प्रकाश पडला. अमेय मला सांगायचा ती स्त्री.... त्याला भेटली होती. ते जंगल. ती अचानक गायब झालेली स्त्री. बाबांनी लिहिल्याप्रमाणे जहाजावर हल्ला करणारे ते जलजीवा... त्यातही एक स्त्री असायची....

आणि हा समोर? कोण? अमेय? तो तर भारतात आहे. येथे कशाला येईल तो?

ती किंचाळताच तो अमेय पूर्ण माणूस बनू लागला, त्याने तीच्या अंगावर उडी मारली. ती पटकन बाजूला झाली.

तो टब मध्ये पडला. पुन्हा पाणी झाला. त्यामुळे तीला दिसला नाही.

बराच वेळ ती स्तंभित होवून हा सगळा प्रकार बघत होती. त्यानंतर बराच वेळ बाथरूम मध्ये कुणीही नव्हतं.

भास झाला असे समजून ती तशीच बाथरुम च्या बाहेर गेली. तीने कपडे घातले.

ती फारच भेदरलेली होती. पटापट तयार होवून तीने एक ऑमलेट बनवले. ते खाल्ले. कालपासून काही खाल्ले नव्हते.

जेफ ला तीने घडलेला प्रसंग सांगितला. जेफ हसू लागला.

त्याने सल्ला दिला, "हे बघ अ‍ॅना. अमोल म्हणतो त्याप्रमाणे तू इंडीयात का निघून जात नाहीस? तुझ्या वडीलांनी जरी तसे लिहिले आहे तरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते सगळे ऐकीव माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे तो तुला भासच झाला असेल. तु इंडियात जा. त्याच्या घरच्यांना भेट. आणि अमेयने तूला सांगितलेल्या त्या स्त्री बद्दल म्हणशील, तर अमेय ने तुझी गम्मत सुद्धा केली असूऊ शकेल गं. डोंन्ट वरी! "

अ‍ॅना: "ठीक आहे जेफ. तेच बरे राहील. मी आज सुट्टी साठी अर्ज करते. आणि जाते निघून इंडीयात. पण माझ्या वडीलांचे लॅपटॉप आणि सर्व सिडीज? त्या सुद्धा सोबत घेवून जाव्या लागणार...."

जेफः "इट्स योर चॉइस. डु अ‍ॅज यू फिल राईट. चल बाय. काही मदत लागली तर सांग! "

जेफ निघून गेला.

विचारात असतांनाच अ‍ॅना ट्युब मध्ये चढली.

तीने सगळी परिस्थीती समजावून सांगितल्यानंतर काही दिवसांची सुट्टी तीला मिळाली. तीने त्याच दिवशी रात्रीची फ्लाईट बुक केली.

अमोलला तीने भारतात येत असल्याचे कळवले.

संध्याकाळी घरात शिरताच घरात सगळीकडे पाणीच पाणी होते. ते तीने काठी असलेल्या स्पंजने पुसले. अगदी सगळी कडेच पाणी होते. कपाटावर, टेबलवर....

ती जायची तयारी करू लागली.

दोन मोठ्या लगेज बॅग्ज आणि स्वतः जवळ विमानात ठेवायच्या दोन छोट्या बॅग्ज अशा चार बॅग्ज तीने घेतल्या. जवळच्या एका बॅग मध्ये लॅपटॉप आणि सर्व सिडीज चा बॉक्स.

(11)

रात्री जेफ ने अ‍ॅनाला फोनवरून निरोप दिल्यानंतर टीव्ही लावला. एक पोलीस अधिकारी भर रस्त्यावर पाण्यावरून पाय सटकून खाली पडलेला दिसला. तेथे लोकल न्यूज चॅनेलची टीम आलेली होती.

वार्ताहर सांगत होती:

"आता एक अजब घटना घडली आहे. एक पाण्यासारखा दिसणारा मानव आता येथे होता....

या पोलीसाला एक अजब अनुभव आला आहे. एक पाण्यासारखा दिसणारा माणूस हातात काहीतरी घेवून पळत होता. सुरुवातीला पोलीस हबकून गेला. तो मानव अधून मधून बर्फ बनून काचेवर आदळत काच फोडत होता....

पण नंतर त्याने त्या पाणी-मानवाला गोळी मारली आणि त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो पाणी मानव पुन्हा माणुस झाला आणि पळायला लागला. त्या पाणी मानवाने पोलीसावर हल्ला केला, तो त्या पोलीसाच्या नाकातोंडात जावू लागला आणि शेवटी त्या पोलीसाने त्या पाणी-मानवाचा नाद सोडला आणि त्या पाण्यावरून तो सटकून पडला.

तोपर्यंत तो पाणी मानव वाफ बनून हवेत उडाला आणि ढगात जावून विविध आकारात रुपांतरीत होवून पळून गेला...."

जेफ आश्चर्यचकीत होवून हे बघत होता. त्याने अ‍ॅनाला कॉल लावला....अ‍ॅना नॉट रीचेबल होती......

विमानातल्या प्रवासात अ‍ॅनाला झोप लागली नाही. तीने तो लॅपटॉप काढला आणि फाईल नं. २ वाचू लागली.

केट चा अनुभव त्यात लिहिला होता.

" आम्ही चौघं मोठ्या उत्साहाने निघालो. आम्हाला तब्बल सहा दिवस मिळणार होते. आम्ही पुढे जावू लागलो. आमच्या एकूण दोन मिनी नाव- बोटी होत्या. पहीले बेट अगदी जवळच होते. सहा दिवसांत या डेव्हीलस स्क्वेअर मधली असतील नसतील ती सगळी बेटं आम्हाला पालथी घालायची होती. पाणबुड्याचे पोषाक सुद्धा आम्ही बरोबर घेतले होते. आम्ही होतोच असे साहसी. आम्हाला थांबवणारे तिथे कुणीही नव्हते. मॅट मोठ्या उत्साहात होता.

आम्हाला लवकरच पहीले बेट सापडले.

त्यावर आम्ही उतरलो. बोटी किनार्‍याला लावल्या. एवढे झकास बेट आणि लोक काय नसत्या अफवा पसरवत असतात.

बेटावर अनेक हिरवे पहाड आणि त्या बाजूला एक जंगल.

खाणे पिणे आटोपल्यानंतर आम्ही दुपारचे थोडे पहुडलो. आम्ही सर्व तेथल्या जंगलात गेलो.

जंगल मोठे अद्भुत. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी. त्यांची शूटींग केल्यानंतर संध्याकाळी आम्ही दुसर्‍या बेटावर जाण्याचा प्लान बनवत होतो.

पण, दिवसभर थकल्याने तंबू ठोकून तेथेच आराम करून उद्या सकाळी निघण्याचा बेत ठरला.

रात्र झाली. सॅम, जेन, मॅट सगळ्यांचा डोळा लागला. मी मात्र रात्रीच्या आकाशातल्या चंद्राकडे बघत पहुडले होते. मी मॅट्ला माझ्या बाहुपाशातून हळूच बाजूला केले आणि सहज आकाशाकडे बघत लोळत पडले.

आमचा तंबू किनार्‍यापासून फार लांब नव्हता. रात्रीचे आकाश थोडे विचित्र दिसत होते. आकाशात विविध आकारांच्या ढगांच्या आड चंद्र लपाछपी खेळत होता.

एक काळा ढग अचानक आपले आकार बदलू लागला. अमीबा या प्राण्यासारखे वेडेवाकडे आकार तो करू लागला. तो ढग नंतर पाणी होवून समुद्रावर खाली पडू लागला.

मी उठून बसले आणि आश्चर्याने बर बघत राहीले.....

काहीतरी भास झाला असेल असे वाटून मी ते विसरण्यासाठी थोडे चालायला लागले तोच अंधार्‍या किनार्‍यावर फेसाळणारी पांढरी लाट हळूहळू आपला आकार बदलू लागली. तीने माणसाचे रूप घेतले आणि तीने सरळसरळ तीघे झोपले होते तेथे हल्ला चढवला. एका लाटेने आमची एक नाव हातात धरून उलटीपालटी करून टाकली आणि सॅमच्या गळ्याभोवती ती स्वतःला गुंडाळून घेवू लागली, हळूहळू तीने सर्वांच्या अंगाभोवती विळखा घातला. त्या लाटेने तिघांना समुद्रात ओढून घेतले.

मग काही वेळ समुद्रात मला दिसले की एक बर्फाळ पांढरी पाणियुक्त स्त्री लाटांवर उभी होती अन मग गायब झाली...
काही वेळानंतर एक लाट माझ्या मागे यायला लागली तशी मी या प्रकाराने भेदरून जावून पहाडांच्या दिशेने पळू लागले......

समोरून अमीबाच्या आकारचे पाणी त्या जख्ख काळ्या अंधारात, चंद्राच्या अंधुक प्रकाशात वेडेवाकडे नाचत माझ्या पुढे येत होते.

मी पुन्हा किनार्‍याकडे पळाले.
अमीबाच्या आकाराचे ते पाणी माझेकडे येवून माझ्या अंगावर चढू लागले. एक अमीबा-पाणी गरम तर एक अगदी थंडगार लागत होता. मी किंचाळले... बचाव म्हणून मी खालची माती उचलून समोरच्य अलाटेवर फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
पण काहीच फरक पडला नाही.लाटेने मला उंच उचलले. आणि पुन्हा किनार्‍यावर आदळले....
थोड्यावेळाने शुद्ध आल्यावर सगळे शांत होते. मग मी कशीबशी बोटीला तरंगून समुद्रात जावू लागले....
.... त्यानंतर मी डोळे उघडले ते साऊथ जॉर्जियाच्या किनार्‍यावरच. "

"मोठा अद्भुत अनुभव आहे." अ‍ॅना स्तंभित होवून वाचत होती.....

ती पुढे वाचू लागली.

वडीलांनी पुढे लिहीले होते:

"या अनुभवावरून मला कळून चुकले की जलजीवा आहेत आणि ते आहेत तर त्यांना नियंत्रीत करण्यासाठी किंवा नाहिसे करण्यासाठी कुठेतरी काहितरी नक्कीच असणार.

त्यानंतर अनेक दिवसांनी रॉबर्ट गॉडमन याचेकडून मला मिळालेल्या माहितीच्या आधारे मी ते सगळे "हाऊ टू कंट्रोल वॉटर डीमन्स" या सिडी मध्ये साठवून ठेवला आहे. तो कुणाला आणि केव्हा द्यायचं हेही त्या सिडीत तपशीलवार सांगितलेले आहे. असो. तसेच "स्टेटस ऑफ द वॉटर: अ बुक बाय अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो" यातला एक महत्त्वाचा भाग सुद्धा त्या सिडी मध्ये आहे.......असो."

पुढचे न वाचताच अ‍ॅनाला अचानक काहीतरी वाटले आणि तीने सिडीजचा बॉक्स उघडून पाहीला. त्यात नेमकी ती सिडी नव्हती.......ज्यात जलजीवांना कंट्रोल कसे करायचे ते लिहिले होते!!!

विमान मुंबईत धावपट्टीवर उतरले.
विमानतळावर अमोल, अरविंद आणि अमेय ची आई असे सगळे होते.
अ‍ॅनाला प्रत्यक्ष प्रथमच ते तिघे बघत होते.
पुढे गाडीतून ते सर्व घरी आले.
जुजबी बोलणे झाल्यावर ... ती थकव्या मुळे झोपली.
सकाळी सकाळी जेफचा कॉल आला.
अ‍ॅना: "हा जेफ, आय रिच्ड सेफली... "
जेफ : "अ‍ॅना... तू म्हणत होतीस ते खरे आहे.... इकडे एक जलजीवा सापडला आहे.... चॅनेल्स वर च्या अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार जलजीवा पुन्हा जागॄत झालेत्....आंटार्टीका खंडाजवळच्या डॅव्हील स्क्वेअरवरून ते जगभरात हळूहळू पसरत आहेत आणि आपल्या साध्यासाठी ते अनेक माणसांना "मानव्-जलजीवा" बनवत आहेत... टी.व्ही बघ."

... काही वेळानंतर थोडक्यात सगळी हकिकत सगळ्यांना सांगितल्यानंतर अ‍ॅनाने टी.व्ही. लावला.
सि. एन. एन. वर न्यूज येत होत्या.....

"दुसर्‍या महायुद्धाच्या काळात काही ठीकाणी असे जलजीवा दृष्टीस पडले होते....असे काहीजण सांगत होते...
पण आता ते पुन्हा परत आलेत....वॉटर्-डीमन्स आर बॅक!"

(12)


टीव्ही वर जाहीर होत होते: वॉटर डिमन्स आर बॅक! पण अजूनपर्यंत मिडीयाला या प्रकरणाचे मूळ सापडले नव्हते.
नाफ्ट चॅनेल ने सुद्धा अमेयच्या गायब होण्याचा आणि या उद्भवलेल्या जलजीवाचा संबंध आहे असा संशय व्यक्त करणारा एक कार्यक्रम बनवला होता...

अ‍ॅना ला कळून चुकले की त्या दिवशी घरात अमेय कशासाठी आला होता?

जलजीवांना कसे कंट्रोल करायचे ही सिडी चोरण्यासाठी....

त्या दिवशी बाथरुम मध्ये भास झाला असेल असे समजून ती तशीच पळत पळत बाथरुम च्या बाहेर गेली होती. मग घाबरत घाबरतच ओल्या अंगासहच तीने कपडे घातले.

ती फारच भेदरलेली होती. पटापट तयार होवून तीने एक ऑमलेट बनवले. ते खाल्ले कारण आदल्यादिवशी तीने काही खाल्लेले नव्हते.

आई जगातून तीला सोडून गेल्याचे आणि लगेचच अमेय अचानक गायब झाल्याचे दु:ख तीला सतावत होते.

हे सगळे रहस्य बाबांनी आईला सांगितले होते का?

जलजीवा उद्भवण्यास सुरुवात, आईचा मृत्यु, तसेच अमेयचे गायब होणे, तो जलजीवा होणे या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत का?

की सगळे ठरलेले होते आणि ठरलेले असते??

एकटेपण खायला उठेल म्हणून ती तयार होवून घराबाहेर पडली....

घराचा दरवाजा बंद होताच बाथरुमचा दरवाजा बर्फाने बनलेल्या हाताने हळूच उघडला गेला. दोन्ही हात आणि पाय बर्फाचे, शरीर पाण्याचे आणि चेहेरा गरम वाफेपासून बनलेला असा एकूण तो मानवी आकार होता. शरीराचा प्रत्येक भाग किंवा पूर्ण शरीर केव्हाही पाण्याच्या कोणत्याही रूपात म्हणजे वाफ, पाणी किंवा बर्फ यात बदलवण्याचे सामर्थ्य जलजीवांमध्ये होते.
त्या जलजीवा बनलेल्या अमेयने घरात शोधाशोध सुरु केली. ड्रॉवर, टेबल, कपाट यात सोयीस्कररीत्या वाफ, पाणी बनून त्याने सगळीकडे शोध घेतला. शोध घेता घेता त्याला आठवत होते:

....त्या जलजीवा-स्त्रीने त्याला आदेश दिला होता त्या सगळ्या सिडींना नष्ट करायच्या ज्यात जलजीवांना कसे मारायचे, नष्ट करायचे हे लिहीलेले होते. ती सगळी पुस्तके, पुरावे नष्ट करायचे होते.

पहील्या महायुद्धाच्या काळात जन्माला आलेले ते सगळे जलजीवा दुसर्‍या महायुद्धात पुन्हा एकदा जागॄत झाले होते...
....आणि त्यांना त्यावेळेस नष्ट करता आले नव्हते पण नियंत्रित केले गेले होते. रॉबर्ट गॉडमन या महा बुद्धीमान शास्त्रज्ञाने त्यांना नियंत्रित करण्याची पद्धत संशोधन करून सिद्ध केली होती. त्यांना नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असते हिरव्या मातीत उगवणारे ते झाड आणि त्यांची पाने....!!!
त्या झाडाचा एका भारतीयाने लावलेला शोध आणि ती माहीती त्या भारतीयाकडून मिळवणारा: अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो!! स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचा लेखक!!!

ते अद्भुत झाड. काय आणि कसे होते ते झाड आणि त्याची पाने???

पुढे त्यांना भेटावयास आलेल्या ऑर्थर हॉफमन यांना ते रहस्य सांगितले होते. ऑर्थर हॉफमन यांनी ते रहस्य जास्त गवगवा होवू नये म्हणून कॉम्प्युटर आणि सिडींच्या स्वरुपात साठवून ठेवले होते.

त्या दिवशी जंगलात जलजीवांच्या तोंडून बेशुद्ध होण्यासाधी अमेयने त्यांच्या तोंडून ऑर्थर हॉफमन हाच शब्द ऐकला होता. भोवळ येता येता त्याने एक नांव त्या सगळ्या जलजीवांच्या तोंडून पुसटसे ऐकले. ते नांव त्याने या आधी नक्की ऐकले होते असे त्याला वाटत होते.. पण काही समजण्याच्या आतच तो कोसळला होता.

पण अंगात त्राण होते. तो उठून पळायला लागला. ते तळ्यातले पाणी जलजीवांच्या रुपाने आपोआप वर उडाले ओते आणि अमेयच्या मागे मागे येवू लागले. ते पाणी अमेयच्या शरीराला वेढा घालू लागले. तो जीवाच्या आकांताने पळू लागला. पाणी पायापासून त्याच्या शरीराला वेढा घालत घालत कमरेपर्यंत येत होते. ते पाणी गरम वाफ बनून त्याच्या नाकात गेले आणि तो बेशुद्ध झाला.

...जाग आल्यावर तो एका स्त्रीसमोर उभा होता.

एक अतिशय सुंदर स्त्री. जलजीवा रुपातली. कमनीय बांधा. रसाळ ओठ, आकर्षक चेहेरा, सुडौल, सुंदर, आकर्षक आणि भरदार स्तन, घोटीव मांड्या आणि पाय. एकूणच एक आकर्षक शरीर!! कोण होती ही स्त्री??

पहील्या महायुद्धात हीच स्त्री जलजीवांच्या उद्भवण्यास कारणीभूत झाली होती आणि आता ती इतर अनेक जलजीवांसमोर आपली कहाणी सांगत होती. तीचे नाव होते: जेनिफर.
आणि आपली पहील्या महायुद्धातली कहाणी ती इतर जलजीवांसमोर अमेयला सांगत होती......
"काय होते त्या झाडात? " अमेयने जेनिफरला त्यावेळेस विचारले होते आणि ती भेसूर हास्य हसली होती. आणि तीच्या तोंडून अमेयने त्याच्या एका पूर्वजाचे नाव घेतले होते......

.....हा प्रसंग आठवता आठवता अ‍ॅनाच्या घरी अमेयच्या टणक बर्फाळ हाताला ती सीडी लागली. आता पूर्ण पाणी किंवा वाफ बनून बाहेर पडता येणार होते, पण ती सिडी घेवून नष्ट करण्या आधी जेनिफरला नेवून द्यायची होती. कारण ते झाड ज्या बीयांपासून बनते आणि त्या झाडाच्या ज्या पानांपासून जलजीवांना अद्भुत पद्धतीने नियंत्रीत करता येते त्या बीया जेथे जेथे ठेवल्या आहेत तेथून तेथून त्या नष्ट करायच्या होत्या. त्या जलजीवा नष्ट करू शकत नव्हते, तर त्यासाठी त्यांना गरज होती मानव असलेल्या पण जलजीवांत रूपांतरीत झालेल्या जलजीवांची...!!

सिडी घेवून अमेय लंडनच्या रस्त्यावरून चालला होता. सिडी धरण्यासाठी त्याला कडक बर्फाळ हाताची गरज होती.....तो सिडी घेवून निघाला होता. पकडायला आलेल्या पोलीसांच्या गाड्यांना तो बर्फाळ टणक हातापायांनी फोडत जात होता.

पोलिसाने गोळीबार केला. जलजीवा गोळीबाराने मरत नसतात. पण अजून जलजीवांचे सिडी नष्ट करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत जगासमोर येण्याचे टाळावे असा जेनिफरने त्यांना सल्ला दिला होता.

शेवटी न्यूज चॅनेल ला कळल्याने आणि पोलीसाने हल्ला केल्याने अमेयने ती सिडी तोडून टाकली आणि तो वाफ बनून उडून गेला आणि ढगात रूपांतरीत होवून आपापल्या मार्गी लागला.

कारण बर्फ, पाणी या रुपात जास्त वेळ असलो तर जगाला कळून चुकेल आणि कुठेतरी असू शकलेल्या जलजीवांना नियंत्रीत करण्यासाठीच्या गोष्टी जगासमोर पुन्हा येण्याची शक्यता जास्त होती.

आणि लोकांनी पुन्हा जलजीवांना नियंत्रीत करणे सुरु करण्या आधी शक्यतो सगळ्या सिडी, पुस्तके, आणि त्यात लिहीलेल्या त्या बीया, झाडे हे सगळे जलजीवांना नष्ट करता येणार नव्हते पण मानव- जलजीवांच्या मदतीने ते नष्ट करता येणार होते. आता आणखी सिडी, पुस्तके दुसरीकडे असणार होत्या का??

जेनिफरला फक्त हवे होते ते रहस्य! जलजीवांना नियंत्रीत करणार्‍या बीया, झाड.

ते जेथे जेथे म्हणून लपवले असेल तेथून नष्ट करायचे होते तीला....

सिडी न आणता अमेय जेनिफरजवळ पोहोचला. आता सर्व जलजीवा आकाशात ढगांच्या रुपात जमले होते. त्या ढगात अमेय ढगरुपात आला. त्याने सिडी आणली नव्हती हे तीला तो वाफरुपात परत आल्यावर कळले होते....

त्यांचे पुढचे टार्गेट होते - "स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचे लखक अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो! हे पुस्तक वैज्ञानिक क्षेत्रात क्रांतीकारी ठरले होते.

वाफ, पाणी, बर्फ या व्यतिरिक्त आणखी चौथी पाण्याची स्टेट म्हणजे पाण्याचे चौथे रूप शोधून काढण्यात त्यांना यश आले होते.

आणि त्या शोधाच्या आधारेच मध्य प्रदेशातल्या जंगलातल्या सर्वप्रथम शोध लागलेया "त्या" अग्नीवृक्षाच्या पानांच्या मदतीने पाण्याला या चौथ्या रुपात रुपांतरीत करता येत होते. पण हा प्रयोग जलजीवांना नियंत्रीत करण्यासाठी वापरण्यात आला होता. एरवी रोजच्या जीवनात त्या चौथ्या रुपाचा काहीच उपयोग नव्हता. ते चौथे रूप म्हणजे वाफ आणि बर्फ या मधले रूप. म्हणजे वाफेचे रूपांतर पाण्यात न होवू देता सरळ बर्फात तयार केले असता हे चौथे रूप तयार होते....

इकडे अ‍ॅना आपल्या वडीलांच्या लॅपटॉप मधली साऊथ जॉर्जिया हून परत येत असतांना च्या अनुभवाची फाईल वाचत होती. आता वाचतांना ती एकटी नव्हती. सगळे होते. अमोल, जितीन, त्याचे वडील आणि इतर....

ऑर्थर हॉफमन यांनी पुढे लिहिले होते-
" परतीच्या प्रवासात कॅप्टन कडून मला माहिती मिळाली की पहील्या महायुद्धात काही युद्धकैद्यांच्या खुप छळ केला गेला होता. त्यांना डेव्हील्स स्क्वेअर वरच्या बेटांवर ठेवण्यात आले होते..."


(13)

ऑर्थर हॉफमन यांनी पुढे लिहिले होते-

.....परतीच्या प्रवासात कॅप्टन कडून मला माहिती मिळाली की पहील्या महायुद्धात काही युद्धकैद्यांच्या खुप छळ केला गेला होता. त्यांना डेव्हील्स स्क्वेअर वरच्या बेटांवर ठेवण्यात आले होते. त्या बेटावर त्यांचा खुप छळ केला गेला होता. विरुद्ध राष्टाकडच्या अधिकार्‍यांकडून, जवानाकडून!

त्यामध्ये अनेक महिला होत्या. त्यापैकी जेनिफर नावाची एक अमेरीकन गुप्तहेर होती. ती पूर्वी एक अट्टल गुन्हेगार होती. पण अमेरीकेने तीला काही वर्षे तुरुंगात ती सुधारल्यानंतर रशियाच्या हेरगीरी साठी पाठवले होते. पण, ती युद्धा दरम्यान पकड्ली गेली. तीला रशियाने इतर कैद्यांसमवेत बंदी बनवून या डेव्हील्स स्क्वेअरवरच्या बेटावर ठेवले होते असे ऐकीवात आहे.

कॅप्टनने सांगितले की पूर्वी एकदा जहाज साऊथ जॉर्जिया कडे येत असतांना प्रवासात काही अतर्क्य घटना घडल्या होत्या. तेव्हा योगायोगाने जहाजावर एका संशोधनासाठी रॉबर्ट गॉडमन आलेले होते.

जहाज ऐन समुद्राच्या मध्यावर असतांना जहाजावरच्या लोकांसह कॅप्टनने आणि रॉबर्ट गॉडमन यांनी एक घटना पाहिली.

कॅप्टन मला म्हणाले- "त्या घटनेनंतर रॉबर्ट गॉडमन यांनी मला ही युद्ध कैद्यांची थोडक्यात माहिती त्यावेळेस थोडक्यात दिली होती. एवढेच! तुम्हाला लागल्यास त्यांना भेटू शकता."

कॅप्टन पुढे सांगत होता-

"त्या घटनेबद्दल सांगायचे झाल्यास साऊथ जॉर्जिया च्या आम्ही जेव्हा जवळ आलो होतो तेव्हा रात्री दूरवर डेव्हील्स स्क्वेअरच्या हद्दीतून एक प्रवासी विमान उडत होते. डेकवर सहज आम्ही ते विमान बघत बसलो होतो.

त्या विमानाभोवती अचानक काळ्या पांढर्‍या ढगांनी गराडा घातला. ते विमान हवेतच हेलकावे खावू लागले. मग त्या विमानाची बॉडी गरम ज्वालामुखीने विरघळावी तशी विरघळू लागली. ते विमान आतल्या प्रवाशांसह वितळले आणि काही वेळाने तेथे काहीही नव्हते."

रॉबर्ट गॉडमन चा ठावठीकाणा मला देवून कॅप्टन आपल्या कामावर निघून गेला. त्या बेटावरून वाचलेली केट तिघा मित्रांच्या मृत्यू मुळे आणि तीला आलेल्या विचित्र अनुभवाने विमनस्क अवस्थेत होती आणि उपचार घेत होती. ती तीच्या मूळ देशात- कॅनडाला उपचारासाठी निघून गेली होती.

नंतर लंडनला आल्यावर मी रॉबर्ट ला शोधले. सर्वप्रथम रॉबर्ट ने मला ती माहीती सांगण्यास नकार दिला. पण मी आग्रह केला कारण जलजीवा पुन्हा जागृत झाले होते हे मी त्यांना पटवून सांगितले. या विषयी पूर्ण नाही पण थोडीफार कल्पना मी रोझीला दिली होती.

रॉबर्ट ने मला स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचे लेखक अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो याबद्दल सांगितले आणि ते पुस्तक मला वाचायला दिले.

पहील्या महायुद्धाच्या काळात अनिस्टन ला एकदा मध्य प्रदेशातल्या शर्वरी जंगलात हिरव्या मातीच्या संशोधनासाठी भारतात आले होते.समुद्रातल्या अनेक निर्जन बेटांवर सुद्धा अशी हिरवी माती असते आणि भारतात फक्त मध्य प्रदेशातच ही माती होती असे संशोधना अंती स्पष्ट झालेलेल होते.

तेथे असतांना त्यांची भेट योगायोगाने एका व्यक्तीशी झाली...ते एक साधे शेतकरी होते.
जार्वार पर्वतावर चढण्यासाठी संध्याकाळी अनिस्टन निघाले असता त्या शेतकर्‍याने त्यांना रोखले.
सहजच माहीती विचारण्यासाठी तोडक्या हिंदी भाषेतून त्या शेतकर्‍याला विचारले असता एक माहीती समोर आली.

ती व्यक्ती (शेतकरी) पुढे अनिस्टनला सांगू लागली-

"एकदा त्या जंगलातून परतताना उशीर झाला. सहज म्हणून त्या जार्वार पर्वताकडे माझे लक्ष गेले. मला त्या पर्वतावर एक झाड दिसले. पण ते झाड साधे झाड नव्हते.

त्या झाडांच्या प्रत्येक पानाऐवजी तेथे रात्री प्रखर ज्वाळा निघत असतात.

रात्रीच्या अंधारात ते जळणारे झाड विचित्र दिसते होते.

मला प्रथम वाटले की कुणी या झाडाला आग लावून दिली असेल. पण आग लावली असती तर त्या झाडांच्या ज्वाळा वरच्या बाजूने गेल्या असत्या.

पण येथे प्रकार वेगळाच होता. झाडाच्या पानां ऐवजी ज्वाळा होत्या. "

दुसर्‍या दिवशी अनिस्टन त्या झाडाजवळ दिवसा गेले. सोबत त्यांनी त्या व्यक्तीला ही आणले होते...

त्या झाडाची पाने दिवसा हिरवीच पण आगीच्या ज्वाळा निघतांना जसा आकार होता तसा त्या पानांचा आकार होता. ती पाने

तोडून संशोधनासाठी त्यांनी घेतली. त्या पानांचा वाळवून भुगा करून घेतला.

त्यापैकी काही भुगा जवळ साचलेल्या पाण्यात उडाला असता त्या पाण्याचा तात्काळ बर्फ झाला.

पण, तो बर्फ हाताला गरम लागत होता. म्हणजे पाण्याची ही चौथी वेगळीच स्टेट (रूप) होती. एक अद्भुत शोध लागला होता......"

अ‍ॅनाच्या वडीलांच्या फाईलमध्ये त्या व्यक्तीच्या पुढे लिहिलेल्या नावावरून आणि वर्णनावरून अरविंद आचरेकरांना अचानक काहीतरी आठवले. ते व्यक्ती म्हणजे अमेयचेच पूर्वज होते हे नक्की झाले होते. म्हणूनच अमेयला जलजीवांकडून टार्गेट करण्यात आलेले होते, बदला म्हणून.

सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या होत्या. उलगडत होत्या.

त्या फाईलमध्ये पुढे लिहिले होते-

"पहिल्या महायुद्धातल्या छळ करण्यात आलेल्या कैद्यांना नंतर पाण्यात बुडवून मारणयात आले.

त्यांच्या छळ होत असतांनाच्या त्या आर्त किंकळ्या त्या पाण्यातच राहिल्या.....
त्या किंकाळ्यांची शक्ती जलजीवांच्या रुपात उफालून बदला घ्यायला निघाली.....
पाण्यातले सैतान जन्मले....
पहिला जलजीवा स्त्री होती, म्हणजे जेनिफर.

अनिस्टनच्या त्या प्रयोगाद्वारे त्यांनी त्या झाडाच्या पानांचा उपयोग करून पाण्याच्या चौथ्या रुपात म्हणजे "गोठलेल्या पाण्याच्या पण गरम असणार्‍या बर्फाच्या" रुपात त्या जलजीवांना गोठवून अनेक हेलीकॉप्टरद्वारे अंटार्टीका खंडावर त्यांना मोठ्या टाक्यांमध्ये आणून अतिशय खोल खोदून त्यांना गाडून बंद करून टाकले होते.

हे फक्त ठरावीक लोकांनाच माहिती होते.

पण त्याच झाडांना पोसणारी हिरवी माती त्या गरम बर्फावर टाकली की ते पुन्हा वितळून जलजीवा बनतात,असे आढळून आले होते. आफ्रीकेच्या जंगलात सुद्धा तशी हिरवी माती सापडते. पण तश्या प्रकारचे झाड आणि त्याच्या बीया मात्र सर्वप्रथम भारतात सापडल्या.

या जलजीवांबाबत माहीती अमेरिकेने सर्वसामान्य लोकांसमोर जास्त येवू दिली नाही.

दुसर्‍या महायुद्धात पुन्हा कुणीतरी त्या जलजीवांना जिवंत केले.

पुन्हा त्यांना जमीनी खाली गाडण्यात आले. पण त्यावेळेस जलजीवांना नवीन सैतानी खेळ सापडला होता.

जिवंत माणसांना जलजीवा बनवायचे. जिवंत माणसां भोवती वेढा घालून हे त्यांनाही जलजीवा बनवत असत.

ही जलजीवा बनलेली जीवंत माणसं मात्र त्या पानांमुळे रुपांतरीत होत नव्हती. त्यांना लाल माती टाकून पुन्हा मूळ मानव रूपात आणता येत होते....जोपर्यंत ते मूळ रुपात येत नाही तोपर्यंत ते जलजीवांच्याच सैतानी शक्तींच्या संमोहनाखाली असतात आणि ते आणखी जास्त खतरनाक बनतात..."

त्या नंतर त्या हिरव्या, लाल मातीची ठीकाणे आणि त्या बीया आणि झाडॅ याबद्दल माहिती त्या फाईल्स मध्ये होती.

त्यातल्या एका लिहिले होते की जार्वार पर्वताच्या पायथ्याशी खणले असता एका गुहेवजा जागेत खुप खोल एका अंधार्‍या जागेत त्या बीया, रोपटे आहेत. तसेच इतर अनेक देशांतली बीया, रोपटे, झाडाच्या पानांचा भुगा (चुरा) असलेली ठीकाणे तेथे सांगितली होती. गरज पडली तर घेण्यासाठी!!

त्यानंतर एकदा ऑर्थर हॉफमनचा चा जहाजावरच्या चाच्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पण ते सर्व चाचे हे मानव-जलजीवाच होते. पेपरमध्ये ही मृत्यूची छापलेली बातमी स्कॅन करून त्या फाईल मध्ये होती.

अ‍ॅनाच्या डॉळ्यात पाणी आले.....

त्या सर्वांना कळून चुकले की अमेय जंगलातून असाच जलजीवांमुळे गायब झाला असावा. आणि त्या दिवशी घरी आलेला हा अमेयच होता आणि अ‍ॅनाला भास झाला नव्हता. टी.व्ही. वर सिडी घेवून पळणार्‍या त्या माणसाचा पाणीमय चेहेरा अमेयसारखाच दिसत होता.

मग ही सगळी माहिती अ‍ॅनाने लेस्टर बेनेट्ला सांगितली.

बीया लपवलेल्या ठीकाणांचा शोध जगभरच्या शास्त्रज्ञांनी घेण्यास सुरुवात केली. आता तिसर्‍यांदा उद्भवलेल्या जलजीवांना कायमचे नष्ट करायचे काम पार पाडायचे होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेयला पुन्हा मानवरूपात आणायचे होते.

अमोलच्या विनंतीवरून जितीन मुंबईला आलेला होता.

त्यांनी लाल माती मागवली आणि ती घेवून आता अमोल, अरविंद, अमेयची आई, आसावरी, अ‍ॅना हे सर्वजण मध्य प्रदेशात जायला निघाले. पण त्यांच्या पुढे प्रश्न होता, की अमेयला कसे शोधायचे आणि ओळखायचे? किंवा त्याला पुन्हा परत त्या जंगलात कसे बोलवायचे?

लॅपटॉप मध्ये बर्‍याच फाईल अजून वाचायच्या बाकी होत्या. कदाचीत त्यात सापडू शकेल काहीतरी..!!

गुगलवर सर्च करून अ‍ॅनाने वॉटर डीमन्स बद्दल लोकांना डेव्हील्स स्क्वेअर मध्ये आलेले अनुभव वाचण्यास सुरूवात केली. कदाचीत त्यावरून काही दुवा मिळेल का?

किंवा जलजीवांच्या तावडीतून वाचलेली माणसे काही मदत करू शकतील का? केट काही मदत करू शकेल का? चौघेजण बेटावर असतांना केट मात्र वाचली होती. कशामुळे?

अ‍ॅनाने जेफची मदत घ्यायचे ठरवले. तीने जेफला विनंती केली की रॉबर्ट गॉडमन किंवा त्याचे सहकारी यांना भेटून काही माहिती मिळते का ते बघायला सांगितले.

तसेच कॅनडातून केट चा काही ठावठीकाणा मिळाला तर बरे होईल असे अ‍ॅनाला वाटले.

...सिडी न आणता अमेय जेनिफरजवळ पोहोचला. आता सर्व जलजीवा आकाशात ढगांच्या रुपात जमले होते. त्या ढगात अमेय ढगरुपात आला. त्याने सिडी आणली नव्हती हे तीला तो वाफरुपात परत आल्यावर कळले होते....

त्यांचे पुढचे टार्गेट होते - "स्टेटस ऑफ द वॉटर: या पुस्तकाचे लखक अनिस्टन अ‍ॅन्टेनबरो! हे पुस्तक वैज्ञानिक क्षेत्रात क्रांतीकारी ठरले होते. अमेयच्या पूर्वजाला जलजीवांनी मारले होतेच. त्यानंतर अनिस्टनला सुद्धा त्याच वेळेस त्यांना मारायचे होते. पण, तेव्हा त्यांना गरम बर्फात बंद करून अंटार्टीका खंडातल्या थंड बर्फा खाली खोदून गाडून टाकले गेले होते.

आता कित्येक वर्षांनंतर जागृत झालयावर हे जलजीवा खुपच खतरनाक झाले होते. अनिस्टन ज्या विमानातून प्रवास करणर होते त्यावर हल्ला करण्याचे सर्व जलजीवांनी ठरवले होते.

ते पूर्ण विमानच वितळवून संपवण्याचा मानस त्यांचा होता. वेडेवाकडे आकार करून ढग आकाशात हल्ल्याची योजना बनवत होते. अमेय सुद्धा त्यांच्या अधिपत्याखाली होता.

इतर मानवांना आणि अमेयला जलजीवांच्या अधिपत्या खालून कसे वाचवायचे हा एक मोठा यक्षप्रश्न होता!!!

ते सर्वजण आसंद येथे पोहोचले. अशोकरावांना तसेच तेथल्या पोलिसांना या सगळ्याची पूर्ण कल्पना देण्यात आली.

त्यांनी सहकार्य करायची तयारी दर्शवली.

जंगलात त्या बीया शोधण्यासाठी जायचे होते. त्याच बरोबर अमेयलाही शोधून काढायचे होते. अजूनपर्यंत जलजीवांनी आपले अस्तित्त्व गरजेपुरते जगासमोर आणले होते. त्यामुळे प्रसार मध्यमांना सांगून या बद्दलच्या बातम्या देण्यास बंदी केली गेली.

त्यामुळे तो सिडी घेवून जाणारा माणूस आणि ती बातमी येणे बंद झाले.

सगळेजण जंगलात जाण्यासाठी निघले. सोबत पोलीसही होते.

गावाजवळची नदी आणि त्या बाजूने जाणारा रस्ता.
सकाळचे अकरा वाजले होते.
नदीचा रस्ता संपल्यावर एक चढाव होता.
त्यावर जाण्यासाठी एकेरी रस्ता होता. चढाव संपल्यावर गर्द झाडी आणि त्यानंतर बरेच अंतर पार केल्यावर एक कच्चा रस्ता आणि मग ते शर्वरी जंगल होते.
जंगलाच्या सुरुवातीला काही स्थानिक लोकवस्ती होती. अन मग पुढे सुना रस्ता.

काही जण दोन जीप्स मध्ये आणि तिसरी जीप पोलीसांची.

जीपस च्या मागे अनेक नामातुआ पक्षी ओरडत चालले होते. त्यांचा आवाज अतिशय भेसूर होता. पुढे येणार्‍या एखाद्या संकटाची ही चाहूल होती की आणखी काही? जेफचा कॉल लवकरात लवकर आला पाहीजे....

जेफला गॉडमन भेटेल का?

जंगल आले. जितीन त्यांना त्या जार्वार पर्वताच्या पायथ्याशी तळ्याजवळ घेवून गेला....

(14)

जेफ ट्रेलला अ‍ॅनाकडून सगळी माहिती मिळाल्यावर त्याच दिवशी तो रॉबर्ट गॉडमन च्या शोधार्थ निघाला होता....
त्याला विविध ठिकाणी चौकशीअंती कळले की रॉबर्ट गॉडमन आता रिटायर्ड झाले असून ते लंडन मधील एका उपनगरात राहातात.
प्रथम त्यांनी जेफच्या भेटीस नकार दिला. मग सर्व गोष्टी थोडक्यात फोनवर समजावून सांगितल्यानंतर ते अस्वस्थ झाले, त्यांची खात्री पटली आणि त्यांनी जेफला घरी बोलावले.

जेफ आणि ते घरासमोरच्या बागेत खुर्चीवर बसले होते.

जेफ विचारत होता: "आपली मदत हवी आहे. अ‍ॅना आणि सर्वजण मध्य प्रदेशातल्या त्या खेड्यातल्या जंगलात गेले आहेत."

गॉडमन गहन विचारात होते. बराच वेळ ऐकून घेतल्यावर मौन तोडले आणि अचानक काहितरी आठवल्यासारखे करून ते म्हणाले,

"जेफ, अ‍ॅनिस्टन च्या जीवाला धोका आहे हे नक्की. मी तूला सगळे काही सांगतो, पण त्या आधी मला अ‍ॅनिस्टन ला कॉल करून तो जेथे कुठे असेल तेथे त्याला सावध राहायला सांगायला हवे. आताच, ताबडतोब!"

असे म्हणून ते उठून फोन करायला गेले पण फोन लागत नव्हता. अचानक त्यांना आठवले की अ‍ॅनिस्टन विमानाने एका देशात संशोधनासाठी जाणार आहेत. म्हणून फोन लागत नाही आहे. ते सोबत काही लाल, पिवळ्या आणि निळ्या मातीचे नमुने घेवून् ते एका कॉन्फरन्स साठी निघाले होते. काही दिवसांपूर्वीच याबाबत गॉडमनची अ‍ॅनिस्टनशी चर्चा झाली होती. गॉडमन ने त्यांना एक सावध करणारे इमेल आणि एस्.एम. एस. करून ठेवला. जेव्हाही ते वाचतील तेव्हा सावध होतील. आता हातात दुसरे काही नाही.

तसा सुरूवातीला न्यूज बघून गॉडमन ला थोडा अंदाज आला होता की कदाचीत जलजीवा पुन्हा जागृत झालेत की काय? पण लागोलाग जेफ भेटल्यामुळे आणि त्याने सर्व वृत्तांत सांगितल्यामुळे ते आता त्यांना खात्री झाली.

ते म्हणाले,

"चल जेफ. तुला सांगतो सगळं काही. जर अ‍ॅनाला कॉल मध्ये घेता येत असेल तर घे, तेथे ते असतील त्यांना ऐकू दे हे सर्व."

जेफ आणि गॉडमन मध्ये गेलेत. त्यांनी अ‍ॅनाला कॉल लावला.

प्रथम जेफ बोलला,

"अ‍ॅना, मला गॉडमन भेटले आहेत. आपन एक ऑडॉओ कॉन्फरन्स घेवू यात. त्यात ते आपल्याला सर्व सांगणार आहेत. तुम्ही सर्व काय करत आहात?"

अ‍ॅना म्हणाली,

"थॅन्क्स जेफ. तुझे खुप धन्यवाद. आम्ही जंगलातल्या त्या तळ्यातच आहोत. शोधाशोध सुरू आहे. रॉबर्ट गॉडमन च्या मदतीची आनी मार्गदर्शनाची आता गरज आहे. अमेयला परत बोलावण्यासाठी आनी जलजीवांचा नायनाट करण्यासाठी!"

जास्त वेळ न दडवता गॉडमन नी सुरूवात केली,

"जेफ नी मला काय घडले याबद्दल कल्पना दिली आहेच. अमेय हा त्यांचा या वेळचा प्रथम मानव्-जलजीवा असावा.

त्याला जर पूर्वरूपात आणायचे असेल आणि जलजीवांच्या अधिपत्याखालून वाचवायचे असेल तर तो दिसताच लाल माती त्याच्यावर टाकायला हवी.

पण, त्याला शोधायचे कसे हा प्रश्न आहे. कदाचीत ते सर्व अ‍ॅनिस्टन ला मारण्यासाठी आकाशात जमले असावेत.

जसे दुसर्‍या महायुद्धात जलजीवांनी इतर मानवांना जलजीवा बनवण्यास सुरूवात केली होती तसेच आता सुद्धा केली आहे.
यावेळेस हे काही प्रथम नाही आहे की त्यांनी मानवांना जलजीवा बनवले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जलजीवा बनवलेल्या मानवांकडून सागरी लुटालुटीचे काम त्यांनी करून घेतले होते. मानव जलजीवा लाल मातीने पुन्हा मानव रूपात येतात. आता यावेळेस ते पुन्हा बर्‍याच मानवांना जलजीवा बनतील.

दुसर्‍या महायुद्धात अनिस्टनच्या प्रयोगाद्वारे त्यांनी त्या झाडाच्या पानांचा उपयोग करून पाण्याच्या चौथ्या रुपात म्हणजे "गोठलेल्या पाण्याच्या पण गरम असणार्‍या बर्फाच्या" रुपात त्या जलजीवांना गोठवून अनेक हेलीकॉप्टरद्वारे अंटार्टीका खंडावर त्यांना मोठ्या टाक्यांमध्ये आणून अतिशय खोल खोदून त्यांना गाडून बंद करून टाकले होते.

जेनिफर ही एक हुशार जलजीवा.

तीने त्याच वेळेस सर्व रहस्य जाणले होते.

म्हणजे अ‍ॅनिस्टन बद्दल, तसेच कोणत्या प्रकारच्या झाडांमुळे जलजीवांना पाण्याच्या चौथ्या रुपात बंद करून टाकता येत होते, तसेच लाल आणि हिरव्या मातीचा पभाव, त्या झाडांचा शोध लावणारा अमेयचा पूर्वज. पण हे समजल्यानंतर तीने काही उत्पात घडवण्याच्या आतच त्यांना अंटार्टिका खंडावर बंद केले होते.

तीचा एक प्रियकर होता. रेमो रॅमसन.

त्यानेच तीला आणि इतरांना हिरव्या मातीच्या मदतीने जीव धोक्यात घालून अंटार्टिका खंडातून पुन्हा जिवंत केले असावे. त्यानेच स्वतःचा जीव धोक्यात घालून तीला ही सगळी माहिती सांगितली होती.

पण, मला चांगले आठवते की नुकतेच त्याचा आणि इतर मित्रांचा मृतदेह अंटार्टिका खंडावर आढळला होता. जेनिफरनेच त्यालाही मारले असावे. या तिसर्‍या वेळेस ते पृथ्वीवर फक्त आणि फक्त विध्वंस करायलाच आले आहेत हे मी ठाम पणे सांगू शकतो. पण, आधी ते सगळी झाडे आणि त्या बीया आणि भुकटी जेथे जेथे असेत ते नष्ट करूनच मग जगासमोर स्वतःला आणतील. पण ती सगळी ठीकाणं त्यांना सहजा सहजी सापडणार नाहीत..."

तिकडे अ‍ॅनिस्टन प्रवास करत असलेले विमान ढगरूपात असलेल्या जलजीवांनी घेरले. ते ठीकाण होते मध्य प्रदेशातल्या जंगलाच्या बरोबर वरच्या बाजूला पण, अमेय जेव्हा अ‍ॅनिस्टन ला मारायला धावला तेव्हा त्यांचा जवळची प्रयोगासाठीची लाल माती त्याचेवर उडाली आणि तो पुन्हा मानव बनून खाली पडला त्याच तळ्यात!!


(15)


अमेय तळ्यात पडला, मोठ्ठा आवाज झाला आणि अ‍ॅनाच्या तोंडावर पाणी उडाले.....
ते पाणी खुप लालसर आणि काळपट होते. भयंकर भासत होते.....
त्या पाण्यातल्या प्रत्येक थेंबातून असंख्य जलजीवा तयार झाले.....
ते सगळेजण अ‍ॅनाकडे भेसूर हास्य हसत येवू लागले.....

अ‍ॅना घाबरून ओरडणार इतक्यात तीची तंद्री (ट्रान्स) भंग पावली.
तळ्यात तसे काहीही झालेले नव्हते. तळ्यात अमेय पडला नव्हता.
खरेच अमेय या तळ्यात पडला असता तर?
तो आज आपल्याला भेटला असता.
पण तसे दुर्दैवाने नव्हते.
मध्य प्रदेशातल्या त्या अंधार्‍या जंगलात सगळेजण स्तब्ध होवून रॉबर्ट गॉडमन चा आवाज फोनवरून ऐकत होते.
गॉडमन पुढे म्हणाले,
" मानवांना जलजीवा बनवून जेनिफर डेविल्स स्क्वेअर वरच्या भागात खुप दहशत पसरवत होती.
त्याच भागात त्यांना छळ करून मारल्यामुळे तेथे त्यांच्या सैतानी विचारांची शक्ती जास्त प्रभावी होती. त्या भागात शिरणारी जहाजे, विमाने आजही नष्ट होतात. त्याला कारण हे मानव-जलजीवा. मूळ जलजीवांना गरम बर्फात गोठवून जरी नष्ट केले तरी जलजीवा बनलेले मानव हे त्या भागात त्रास देतात. आजही त्या भागात अद्भुत घटना घडतात.

विमान चालले असेल तर ढग रुपात विमानाला वेढा घालून ते विमान नष्ट करतात. जहाजावर बर्फ रूपात हल्ला करून विध्वंस घडवून आणतात. सैतानी शक्ती शेवटी दुसरे काय करणार? विनाश, विध्वंस हेच!
अ‍ॅना म्हणाली,"पण मग हे सगळॅ जलजीवा हे अत्याचारीत आहेत. त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. अत्याचारामुळे ही शक्ती जन्माला आली आहे. त्याचे काय?"

गॉडमन म्हणाले,
"बरोबर आहे. त्या जलजीवांनी अत्याचार करणार्‍या त्या सगळ्या सैनिकांचा बदला घेतला आहे. त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना नष्ट केले आहे. पण आता ते सैतान झाले आहेत. सूडाने पेटले आहेत. ते पूर्ण मानवजातीवर सूड घेतील...."

अ‍ॅना म्हणाली, "मग आता काय करायचे? कसे संपवायचे त्यांना? आणि अमेयला कसे शोधायचे? आणि कसे मानवरूपात आणायचे?"

गॉडमन म्हणाले,

"त्यांना पाण्याच्या चौथ्या रुपात फक्त गोठवून ठेवता येते पण नष्ट करता येत नाही. त्यामुळे आता जरी आपण त्यांना त्या चौथ्या रूपात गोठवले तरी ते पुन्हा येवू शकतात. कुणीतरी पुन्हा हिरवी माती घेवून त्यांना जीवंत करेल. आणि कुणी त्यांना जीवंत करू नये म्हणून ही सगळि माहिती कायमची नष्ट करावी असे जर ठरवले तर ते काम सोपे नाही. आजच्या इंटरनेट्च्या महाजालाच्या रूपात ती माहिती कुठेही डीजीटल रूपात अस्णारच आहे. त्यामुळे त्यांना कायमचे नष्ट करता येईल का असा मी विचार करत होतो.. रिटायर झाल्यानंतर मी त्यावर संशोधन केले होते. तो प्रयोग करण्याची वेळ एवढ्या लवकर येईल असे मला वाटले नव्हते. "

अ‍ॅना आणि सर्वजण स्तब्ध होवून ऐकत होते,
"पाण्याला म्हणजे त्या जलजीवांना आधी चौथ्या रूपात आणायचे.....

मग त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये तोडायचे आणि त्यापैकी हायड्रोजनला लगेचच रूपांतरीत करून त्याचे रुपांतर ओझोन मध्ये करायचे.

पाण्याच्या इतर तिन्ही रूपात हा माझा फॉर्म्युला काम करत नाही. तर मी सांगत होतो की, तसे करण्यासाठी मी एक केमीकल बनवले आहे. ते पाण्यावर मारल्यास त्याचे रूपांतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये होते आणि आणखी दुसरे केमीकल वापरल्यास ओझोनमध्ये.

मला नक्की खात्री आहे की ते सर्व आणि जेनिफर हे अमेयसह अ‍ॅनिस्टन ला मारण्यासाठीच गेले असतील. मी तपास करतो की अ‍ॅनिस्टन नेमके कोणत्या देशात गेलेत, त्यावरून आपल्याला दुवा (कलू) मिळेल... मग आपण तेथे जावून कमीत कमी त्या जलजीवांना नष्ट करू आणी तेथे लाल मातीच्या आधारे अमेयला परत आणू... तुम्ही सर्व पटापट त्या गुहेतून ती रोपटी आणा. तोपर्यंत मी पुढचा प्लॅन सांगतो"

फोन बंद झाला.......

आता वेळ दडवून चालणार नव्हते. ते सर्वजण जार्वार पर्वताच्या पायथ्याशी होते.

आणि अनेक कामगार कोल तेथे खणत होते. शेवटी ती गुहेवजा जागा सापडली. ती सापड्ल्यावर खुप खोल एका अंधार्‍या जागेत त्या बीया, रोपटे आहेत असे त्या फाईलमध्ये लिहिले होते. तसेच इतर अनेक देशांतली बीया, रोपटे, झाडाच्या पानांचा भुगा (चुरा) असलेली ठीकाणे तेथे असणार होता.

ते सर्वजण गुहेतून आतमध्ये निघाले. बरेच पुढे गेल्यावर अंधारत दिसणारे ते दृश्य खूपच अद्भुत होते.
अंधारात ज्वाळांसारखी पाने दिसणारी ती झाडे. रांगेने त्या गुहेत अनेक तशी रोपटी आणी झाडे होती.

ते पुढे जावू लागले. त्यांचे जवळ सर्च लाईट होता.

ते पुढे पुढे जावू लागले.

पुढे धोका असू शकणार होता. पण सगलेजण आता एकाच ध्येयाने पछाडले होते. जलजीवांचा सर्वनाश!!

अंधारात चालत असतांना पायांना अनेक बीया आणि भुगा लागत होत्या. त्याच त्या बीया असाव्यात. त्या भरण्यासाठी त्यांनी मोठाल्या पिशव्या आणल्या होत्या. सोबत मदतीला आणलेले कामगार आणि गडीमाणसं त्या बीया, भुगा आणि चुरा पिशवीत भरू लागलेत.
पूर्वी इथे नक्की काहीतरी भयंकर घडले असावे. जे फक्त अमेयच्या पूर्वजालाच माहिती असावे.
आणि येथे तळ्यात नक्की जलजीवांचे वास्तव्य असावे, असे अ‍ॅनाला वाटून गेले.

थोडे दूरवर समोर काही चमकणारे डोळे त्या सर्वांचा माग घेत पुढे आले.
अ‍ॅना अचानक कींचाळली कारण, तीच्या उजव्या बाजूलाच अग्नीने, ज्वालांनी बनलेला एक मानव डोळे मोठे करून बघत होता.

जमतील तेवढी रोपटी जमा करून सर्वांनी त्या गुहेतून बाहेर निघण्याचे ठरवले.

पण, ते ज्वाला-मानव त्यांचा रस्ता अडवून उभे होते. तेवढ्यात जितीनने हातातले ज्वाला-रोपटे त्या विचित्र अग्नी-मानवावर मारले, तसा तो ओरडून दूर पळाला.

मग त्या रोपट्यांचा धाक दाखवत दाखवत ते मानव पळून गेले. मग अनेक प्रकारचे विचित्र आवाज करणारे प्राणी समोर येवू लागले. तेही रोपट्यांनी दूर पळाले. मग ते सर्वजण गुहेबाहेर पळाले.
कसे बसे ते गुहेच्या बाहेर आले. कदाचीत ते रोपट्यांचे रक्षक असावेत? की आणखी दुसरेच काही?

समोर गुहेबाहेर येताच एक विचित्र दृश्य होते. आणखी सैतानी शक्ती त्यांचे समोर उभ्या होत्या.
म्हणजे तळ्याजवळ जलजीवांच्या रूपात रान मांजर, कोल्हे तेथे उभे होते. साप होते. पण पाणी रूपात.
इकडे गुहेतले अग्नी मानव आणि अग्नी-प्राणी सुद्धा गुहेबाहेर आले.

सगळेजण स्तब्ध होवून हे दृश्य बघत होते.
म्हणजे जल-प्राणी सुद्धा उदयास आले होते.
मागून गुहेतून आलेले अग्नी-प्राणी आणि समोर अचानक उभे ठाकलेले जल-प्राणी.
कोल्हे, लांडगे, रानमांजरी गुरगुर करू लागले.

(16) -शेवटचा भाग!

जल-प्राणी उदयास आले होते. जार्वार पर्वतावरच्या त्या हिरव्या मातीने त्यांना जन्म दिला असावा. तळ्यात चुकून पडून मरण पावलेले ते प्राणी असावेत आणि नंतर जलजीवा बनले असावेत. किंवा त्यांची कुणी शिकार केली असेल आणि ते तडपून मरण पावले असावेत. पाण्यात पडले असावेत. जल प्राणी म्हणजे ते टणक बर्फाने बनलेले होते. ते जंगलातल्या अंधूक अंधारात पांढरे दिसत होते. जसा किसलेला बफ जमा करून त्याचा प्राणी बनवला तर तो जसा दिसेल तसेच हे दिसत होते. अतिशय भयानक. त्यांचे अणकुचीदार गोठलेले दात, पायाची नखे हे सर्व भकोल्हे, लांडगे, रानमांजरी गुरगुर करू लागले. मागच्या बाजूने अंगभर ज्वाळांनी भरलेले अग्नी-दानव उभे होते. मागून गुहेतून आलेले अग्नी-प्राणी आणि समोर अचानक उभे ठाकलेले जल-प्राणी. अशा दोन दानवांच्या आत ते सर्वजण उभे होते. आता काय घडणार असे वाटत असतांनाच त्या अग्नी दानवांनी त्या जल प्राण्यांवर हल्ला चढवला......

अचानक झालेल्या त्या हल्ल्याने जल-दानव दचकले, बावरले आणि आणखी हिंस्त्र बनले. आणि मोठमोठ्याने आवाज करू लागले. त्यात भर म्हणून नामातुआ पक्षी आले. तेही तुआआ तुआआ असा आवाज करू लागले. सगळे जंगल भितीदायक आवाजांनी घुमू लागले. तोपर्यंत सगळेजण यातून सुटून जीपमध्ये बसण्याचा प्रयत्न करू लागले....

जीपमध्ये बसल्यानंतर दोन्ही जीप जंगलातून बाहेर नेण्यासाठी धडपड सुरू झाली. काही जल-दानव जीपच्या मागे मागे पळू लागलेत. त्यांच्यावर त्या पानांची भुकटी टाकावी लागली. तसे ते गरम बर्फामध्ये रुपांतरीत होवू लागले. पण ते तात्पुरते असणार होते. पुन्हा हिरवी माती त्यांच्यावर टाकल्यास ते कधीतरी जीवंत होणारच होते.... कारण इथे त्यांचे जवळ ते केमिकल्स नव्हते.....

तिकडे गुहेसमोर अग्नी आणी जल यांचा संघर्ष सुरू होता. तो इतक्यात संपणारा नव्हता. अग्नी पाण्यामुळे विझतो. पण, येथे मात्र अग्नी दानव हे जल दानवांवर भारी पडत होते. त्या भयानक जल दानवांवर ते हल्ल करत ओते. त्यामुळे ते प्राणी तुकडे तुकडे होवून कोळसा जळतो त्याप्रमाणे अनेक तुकड्या तुकड्यात रूपांतरीत होवून जळत होते. म्हणजे हवेत असंख्य बर्फाचे जळणारे तुकडे दिसत होते. तरीही ते तुकडे हल्ला करतच होते.त्यांच्या तुंबळ जुंपली होती. जीपमध्ये अ‍ॅनाला गॉडमनचा कॉल आला.

गॉडमनने या आधीच सांगितले होते की,

"पाण्याला म्हणजे त्या जलजीवांना आधी चौथ्या रूपात आणायचे.मग त्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये तोडायचे आणि त्यापैकी हायड्रोजनला लगेचच रूपांतरीत करून त्याचे रुपांतर ओझोन मध्ये करायचे. पाण्याच्या इतर तिन्ही रूपात हा माझा फॉर्म्युला काम करत नाही. तर मी सांगत होतो की, तसे करण्यासाठी मी एक केमीकल बनवले आहे. ते पाण्यावर मारल्यास त्याचे रूपांतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये होते आणि आणखी दुसरे केमीकल वापरल्यास ओझोनमध्ये. मला नक्की खात्री आहे की ते सर्व आणि जेनिफर हे अमेयसह अ‍ॅनिस्टन ला मारण्यासाठीच गेले असतील. मी तपास करतो की अ‍ॅनिस्टन नेमके कोणत्या देशात गेलेत, त्यावरून आपल्याला दुवा (कलू) मिळेल...

मग आपण तेथे जावून कमीत कमी त्या जलजीवांना नष्ट करू आणी तेथे लाल मातीच्या आधारे अमेयला परत आणू."

आता अ‍ॅनाने कॉल उचलल्यावर ते म्हणाले, "अ‍ॅना, जगात इतरत्र ती झाडे असलेली ठीकाणे सापडली आहेत. काही ठरावीक महत्त्वाच्या व्यक्तींना आणि शास्त्रज्ञांना सांङून आम्ही एक मोहीम हाती घेतली आहे. लवकरच आम्ही अ‍ॅनिस्टन जात असलेले विमान शोधून काढण्यात यश मिळवले आहे. ते विमान सध्या साऊथ जॉर्जिया या बेटाच्या वरूनच उडत आहे असे आम्हाला कळाले आहे. आम्ही आखलेल्या मोहीमेत आम्।इ काही हेलीकॉपटर्स घेवून ता विमानाचा पाठलाग करतो आहोत. आमचि शंका खरी ठरली आहे. आम्हाला त्या विमानाच्या मागे अनेक ढग पाठलाग करतांना दिसले आहेत.

काही अघटीत होण्या आधी त्या विमानातल्या प्रवाशांना आणि अ‍ॅनिस्टनला वाचवायलाच हवे आहे. आम्ही ते जरूर करू. आनि त्या ढगांत कुठेतरी अमेय आनी जेनिफरही असावेत, त्यापैकी अमेयला लाल माती टाकून मूळ रुपात आणायचे काम आम्हाला करायचे आहे. मेल्यानंतर जेनिफर जेव्हा जलजीवा झाली तेव्हा तीने या आधीच तीच्या प्रियकराला म्हणजे रेमो रॅमसनला जलजीवा बनवून आपल्या सोबत यायला भाग पाडले होते. तो मात्र दुसर्‍या महायुद्धात जलजीवांना स्थानबद्ध करण्याच्या मोहीमेतून सूटला होता. त्याचे सोबत अनेक सुद्धा त्यातून सुटले होते. त्यांनीच समुद्रावर दहशत पसरवली होती. जलजीवा मरत नाहीत फक्त त्यांना पाण्ञाच्या चौथ्या रुपात गोठवून ठेवता येत होते.....

जेनिफरला मात्र अंटार्टीकावर गाडण्यात त्या मोहिमेत यश आले होते.

मग, अंटार्टीका मोहीमेत संशोधन करण्याच्या निमित्ताने अथक परिश्रमांनंतर त्याने जेनिफरला शोधून काढले आणि हिरवी माती टाकून पुन्हा जीवंत केले. इतर जलजीवांनाही त्याने जीवंत केले.

पण, त्याचे भाग्य चांगले नव्हते कदाचीत!

कारण तीने यालाच मारून टाकले. ती आता पूर्णपणे सैतानी शक्तींच्या अधिपत्या खाली आहे. तसेच तीचे इतर जलजीवा सुद्धा....

तुमचे तिकडे काय चालू आहे? तुम्ही जंगलातून त्या बीया घेवून पोहोचलात का? त्या सगळ्या बीया आता कुठेतरी गुप्त जागी तुम्ही सांभाळून हेवा. त्याबद्दलची माहिती योग्य व्यकींजवळ असू द्या. मी मोहीम फत्ते झाल्यावर संगतोच.

आम्ही आधी सगळीकडे लाल मातीचा फवारा सोडणार म्हणजे त्यात जे मानव जलजीवा असतील म्हणजेच अमेय पुन्हा मानवात रुपांतरीत होतील. आम्ही सगळे मास्क घालून तेथे जाणार आहोत कारण आमच्या असे लक्षात आले की जलजीवाम्चे कोणतेही रूप श्वासाद्वारे आत गेले की त्या माणसाचे किंवा प्राण्याचे जलजीवात रूपांतर होते. त्या मोहीमेत पुढे आम्ही मग त्या झाडांच्या पानांची भुकटी फवारणार. त्यामु़ळे ते पाण्याच्या चौथ्या रुपात येतील. मग आम्ही ती केमीकल्स असलेले स्प्रे मारणार आहोत म्हणजे ते हायड्रोजन आणि ऑक्सि़जन मध्ये रूपांतरीत होतील आनी पुढे दुसरे केमिकल ज्याद्वारे ते ओझोनमध्ये रुपांतरीत होतील. आपल्या आवाक्यातले जलजीवाच फक्त असे कायमचे नष केले जातील.

पण, त्यांना सगळीकडून जगभरातून शोधून नष्ट करणे अवघड काम आहे. आता एक होईल की जेनिफर आता नष्ट झाल्यास त्यांची टीम क्षीण (वीक) होईल. पण जेव्हा जेव्हा ते येतील, तेव्हा तेव्हा त्यांना आपण नष्ट करू शकतो. कायमचे!

कारण आता आपल्या जवळ सगळे उपाय आहेत. त्यांना नष्ट करण्याचे! मोहीम फत्ते झाली की मी पुन्हा कॉल करतो!"

असे म्हणून गॉडमन नी कॉल डिसकनेक्ट केला. अ‍ॅना मात्र आता अमेयची भेट होणार या आनंदात होती. जंगलातला तो संघर्ष सुरूच होता. ते सगळे त्या जीपस मधून निघून अखेर त्या जंगलाच्या बाहेर आले होते. पानांच्या भुकटी द्वारे अनेक जल दानवांना त्यांनी नष्ट केले होते.

आता सर्वजण घरी फक्त गॉडमनचा कॉल येण्याचीच वाट बघत होते.

तीन हेलीकॉप्टर्स त्या विमानाच्या मागावर निघाले. एकात स्वतः गॉडमन होते.

प्रत्येकाने तोंडावर मास्क लावला होता. कारण, ते जलजीवा नाकाद्वारे शरीराच्या आत जायला नको होते.

विमानाच्या पायलटला पुढे येणार्‍या धोक्याचा अगाऊ अंदाज दिला गेलेला होता. ब्रिटीश सरकारला या मोहीमेबाबत अंदाज होता. बरीच कोडी उलगडली होती.या मोहीमेद्वारे बरीच संकते टळणार होती.

हीच मोहीम पुढे विमानाला वाचवल्यानंतर डेव्हील्स स्केअरवर राबवण्यात येणार होती.

शक्य तेवढ्या जलजीवांना नष्ट करण्यात येणार होते. निदान जलजीवांचे निवासस्थान म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या त्या डेव्हिल्स स्क्वेअर वरचे जलजीवा जरी नष्ट झाले तरी बास होते. मग जगात इतरत्र जेही जलजीवा सापडतील त्यांना हळू हळू नष्ट करता येणार होते.

.....ते तीन हेलीकॉप्टर्स त्या विमानाचा पाठलाग करत होते. आधी केलेल्या लाल मातीच्या फवार्‍यातून काहीही हाती लागले नाही.

बराच वेळ विमान आणि आसपासच्या परिसरात त्यांनी लाल मातीचा फवारा केला. पण, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. म्हणजे अमेय तेथे नव्हता आणि जेनिफरही नक्कीच तेथून निघून गेली असेल. इतर जलजीवांना कामाला लावून. आता अमेयला शोधण्यात जास्त वेळ दडवून चालणार नव्हते.

.......कारण आता त्या ढगांनी हेलीकॉप्टर्स वर सुद्धा हला केला होता. शेवटी विमानाभोवती गराडा घातलेल्या ढगांना म्हणजे जलजीवांना एका तुंबळ युद्धानंतर गॉडमन ने सांगीतल्याप्रमाणे कायमचे नष्ट करून ओझोन वायूत रूपांतरीत करण्यात यश आले.मग हेलीकॉप्टर्स डेव्हिल्स स्क्वेअर च्या भागार असणार्‍या बेटांवर उतरवण्यात आले. तेथे सुद्दा काही जलजीवांनी तर काही चाच्यांनी (मानव्-जलजीवांनी) हला केला. बर्‍याचश्या अथक प्रयत्नांनंतर अनेक मानव जलजीवांना मूळ मानव रुपात आणण्यात तसेच इतर जलजीवांना कायमचे नष्ट करण्यात यश आले. विमान आणि अ‍ॅनिस्टन सुख्रूप होते. विमान पुढे आपल्या ठरलेल्या ठिकाणि निघून गेले. विमानाला काही नुकसान झाले नाही.

पण जेनिफर कुठे असेल? त्या अनेक जलजीवाम्च्या पाणी रुपात एकही स्त्री रूप नव्हते. म्हणजे ती यातूनही सुट्ली. आणि अमेयला ही घेवून गेली? कुठे गेली असेल ती? कुठे गेला असेल अमेय?

हेलीकॉप्टर्स पाठलाग करत आहेत हे कळल्यावर जेनीफर ने अमेयला वेढा घातला आणि दोघांच्या ढगरूपाचे पाण्यात रूपांतर झाले आणि ते उंचावरून पृथ्वीवर एके ठीकाणी पडत होते.

अमेयचे पाणी रूप एका लाल माती असलेल्या साऊथ जॉर्जीया बेटावरच्या एका पर्वतावर पड्ले आणि तो माणूस बनण्यास सुरूवात झाली.

जेनीफरला हे अनपेक्षीत होते. त्या पर्वतावरून अमेय घरंगळत खाली पडू लागला. त्यामागे जेनिफर पाणी रूपात त्याचे मागे लागली होती. आता तीने पुन्हा त्याला वेढा घातला तर पुन्हा तो मानव बनणार होता......

इतक्या दिवसांच्या तिच्या अधिपत्याखालून सुटून आनंद झालेला अमेय आता पुन्हा ती आपल्याला वेढा घालाणार या कल्पनेने हादरला होता. तो उठून अतिशय वेगाने खाल पडू लागला. ते एव्हाना त्या पर्वता खाली आले होते. तीही त्याचा पाणी रूपात पाठलाग करत करत त्याचे समोर उभी ठाकली. ती पाणी सदृश्य मानव रुपात त्याचे समर उभी होती. तीचे ते मादक रूप बघून तो क्षणभर हबकला. आनी पुन्हा पुढे येणार्‍या भीतीची जाणीव झाल्याने पळायला लागला.

त्या तीनही हेलीकॉप्टर्स पैकी एक साऊथ जॉर्जीयाच्या बेटावर घिरट्या घालू लागले. ते अगदी जमीनीच्या जवळ उडत होते. तेव्हा त्यात आलेल्या गॉडमनला अमेय पळतांना दिसला. त्यांनी ओळखले की आता अमेय पुन्हा मानव रुपात आला आहे. आणि बर्फ रुप्पात जेनिफर त्याचा आठलाग करत आहे.

ते हेलीकॉप्टर खाली घेण्यास गॉडमन नी पायलटला विनंती केली. आजूबाजूला जंगल होते. विविध प्रकारची झाडे होती. हेलीकॉप्टर येतांना बघून अमेयने मदतीची याचना करत आरोळी ठोकली. तोच जेनिफर पानी होवून वाफ बनली आणि वेगाने अमेयच्या दिशेने जावू लागली.
जेनिफरच्या वाफेचा फक्त थोडा अंश जरी अमेयच्या श्वासावाटे आत गेला तरी तो पुन्हा जलजीवा बनणार होता. अर्थात हेलीकॉप्टर मध्ये त्यांचे जवळ लाल माती होतीच. त्यामुळे तशी चिंता नव्हती. वाफ अमेयला वेढा घालणार तेवढ्यातच जेनिफरलाही शेवटी केमीकल्स च्या मदतीने कायमचे नष्ट काण्यात यश आले. सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला.
जलजीवांचा धोका आतापुरता तरी संपला होता.
अमेय सुखरुप असल्याचे अ‍ॅनाला कळवण्यात आले.
अ‍ॅनाने आईची आठवण येवून आकाशाकडे बघितले. अमेय मिळाल्याचा आनंद आणि आईल गेल्याचे दु:ख याचे मिश्रण तीच्या डोळ्यातून अश्रूंच्या रुपात बाहेर पडत होते. डाव्या डोळ्यातल्या त्या अश्रूमध्ये बारीक नजरेने बघितले तर लक्षात येत होते की त्यात जेनिफर ची प्रतीमा करुणपणे रडत होती. उजव्या डोळ्यातल्या अश्रूमध्ये अमेय ची हसरी प्रतीमा अ‍ॅनाच्या भेटीने व्याकूळ झालेली दिसत होती.

.....जेनिफर ची प्रतिमा दिसत असलेला तो अश्रू गालावरून घरंगळत अ‍ॅनाच्या हनुवटीवर आला आणी जमीनीवर पडला. जमिनीवर तो अश्रू पुढे पुढे सरकत जावू लागला. त्याला ठरावीक असा आकार नव्हता. तो अमीबा या प्राण्यासारखे वेडे वाकडे आकार करत करत भिंतीवर चढला. बरेच वर भंतीवर जावून तो चढला. अश्रूमध्ये बंदिस्त असलेल्या जेनिफरचे रडणे चालूच होते.
.....ते रडणे साधे नव्हते. ते भेसूर होते. बेसूर सुद्धा होते. कुठल्यातरी सूडाचे होते. त्या अश्रूतल्या जेनिफरच्या गालावरून सुद्धा रडण्यामुळे एक अश्रू ओघळत होता. त्या अश्रूत अमेय होता. तो अश्रू त्या मुख्य अश्रू मधून वेगळा झाला आणि आता भिंतीवर दोन अश्रू होते. एकात अमेय आणि दुसर्‍यात जेनिफर. अ‍ॅना मात्र त्या भिंतीवरच्या त्या दोन्ही अश्रू-जीवां पासून अनभिज्ञ होती.....


The END
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel