लेखाची मूळ तारीख: Mon, 05/07/2010
ई टीव्ही मराठी वर सोम- शुक रात्री ९:०० वाजता "श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी" ही मालिका सुरू झालेली आहे.
नितीन चंद्रकांत देसाईंनीच ही सुद्धा मालिका बनवली आहे. त्यांची यापूर्वीची मालिका "राजा शिवछत्रपती" ही स्टार प्रवाह वरून प्रसारित व्हायची आणि ती गाजली असून त्याच्या आता डी.व्ही.डी. सुद्धा निघाल्यात.
"श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी"ही मालीका सुद्धा नक्कीच छान जमून आली आहे असे माझे मत आहे.
मालिकेची मला जाणवलेली वैशिष्ट्ये-
- श्रीमंत निर्मिती मूल्ये
- चित्रपटाला लाजवेल असे भव्य सेट
- थरारक, जीवंत युद्धचित्रण
- सर्वच कलाकारांची उत्तम निवड
- बाजीरावाची संवाद्फेक उत्तम आणि लाजवाब
- कथेची उत्तम मांडणी
- श्रीमंत निर्मिती मूल्ये
- चित्रपटाला लाजवेल असे भव्य सेट
- थरारक, जीवंत युद्धचित्रण
- सर्वच कलाकारांची उत्तम निवड
- बाजीरावाची संवाद्फेक उत्तम आणि लाजवाब
- कथेची उत्तम मांडणी
जे बघत नसतील त्यांनी ही मालीका बघावी असे सुचवावेसे वाटते. जे सदस्य ही मालीका बघत असतील तर येथे त्या मालिके विषयी, त्यातील पात्रां विषयी, इतर संबंधीत गोष्टी आणि त्या अनुषंगाने मूळ कथा या संदर्भात चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.