नुकतीच जवळपास सर्वच वर्तमानपत्रांमध्ये एका सर्वेक्षणासंदर्भात अशी बातमी होती की, भारत हा सर्वाधिक खून होणारा देश झाला आहे. यात आपण अमेरिकेलाही मागे टाकले आहे. तसेच अपघातांच्या बाबतीतही आपण पुढेच आहोत. अशी चुकीच्या क्षेत्रात (आणि दिशेने) होत चाललेली आपली प्रगती पाहून मन विषण्ण होते. ही वाढती गुन्हेगारी कशामुळे?
काही प्रातिनिधीक उदाहरणे :
•आरूषी हत्याकांड
•आजीने अश्लील विडियो पाहू दिला नाही म्हणून एका कुमारवरवयीन मुलाने आजीचा डोक्यात दगड घालून केलेला खून (आणि हो, हे भारतातच घडले आहे, तेही कोल्हापुरात)
•मरिया सुसाईराज संबंधीत खुन प्रकरण
•हुंडा दिला नाही म्हणून जाळले
•बलात्कार करून खुन
•नगरसेवकाचा पुर्व वैमनस्यातून खुन
मला अशा वाढत्या गुन्हेगारीमागे खालील ठळक कारणे दिसतात :
•लोकसंख्येची भरमसाठ वाढ आणि बेरोजगारी (हे सगळ्यात महत्त्वाचे कारण!)
•कधी नव्हे एवढे आज पैशाला आलेले अवाजवी महत्त्व (हेही तितकेच महत्त्वाचे!)
•भ्रष्ट राजकारणी व सगळीकडे पावलोपावली उघड उघड चालणारा भ्रष्टाचार व त्याला बळी पडणारा सामान्य माणूस
•अत्यंत जिवघेणी स्पर्धा, त्यात टिकण्याची धडपड, कामाचा ताण आणि वाढते अनैतीक संबंध
•(साधारण १९९२ सालानंतर) आकर्षक स्त्रीदेहांचा सतत चोवीस तास सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांकडून होणारा हेतूपुर्वक मारा, त्यामुळे कुमारवयात स्त्रीदेहाविषयी चे मुळातच असलेल्या आकर्षणाला अजून मिळत असलेले खतपाणी व तो (स्त्री देह) कुठूनही, कसाही मिळवण्याची धडपड
•श्रीमंत गरिब यातील वाढती दरी (काही प्रगत देशांत ही दरी खुप कमी आहे)
•कष्ट न करता पैसा मिळावा असा वाढत चाललेला दृष्टीकोन
•स्पर्धेमुळे लहान मुलांवर पडणारा शिक्षणाचा अवाजवी ताण
•जगभराच्या बऱ्या- वाईट (बहुतेक वेळा फक्त वाईटच) बातम्या एका मिनिटांत सगळीकडे पसरतात. म्हणजेच माहितीचा मारा व अतिरेक. गुन्हेगारांना त्यातून मिळणारे आयते प्रशिक्षण...
•माणुसकीला व प्रामाणिकपणाला किंमत जवळपास शून्य, त्यामुळे प्रामाणिक माणसांची होणारी मुस्कटदाबी आणि बधीर झालेली माणुसकी.
•व्यक्तीवादाला व व्यक्तीपपूजेला आलेले महत्त्व
•प्रगतीच्या (चांगल्या अथवा वाईट?) मार्गाच्या आड कुणीही आले की त्याला सरळ सरळ संपवण्याचीच मानसिकता
•आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड हाच एकमेव उपाय उरला आहे असे वाटण्यासारखी परिस्थिती.
•हरवत चाललेली मन:शांती
हे सगळे बदलायला हवे अशी आशा करूया. महासत्ता वगैरे होण्याचे स्वप्न तर दूरच राहिले, आधी वरील पैकी एकतरी समस्या सुटली तरी खुप झाले. आपणांस काय वाटते.
आणखी कोणती कारणे असू शकतात यामागे?
कसे बदलता येईल हे सगळे? की बदलता येण्याच्या पलीकडे गेले आहे सगळे?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.