आजच सामील व्हा "मराठी बोला चळवळ" मध्ये.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://www.facebook.com/groups/MarathiBolaChalval/ 
------
(दोन्ही प्रसंग अलीकडचे आणि सत्य)

प्रसंग १: पुणे
कटिंग चे दुकान, मी केश कर्तनाला बसलोय.
रस्त्याने जाणारा एकजण दुकानात येतो आणि विचारतो.
"ये किलबिल होम्स के लिये रस्ता इधरसेही जाता है ना?"
कटिंगच्या दुकानातील एका कर्मचाऱ्याने सांगितले,
"हो, असेच सरळ जा, या दिशेने!"
रस्त्याने जाणारा- "हो का? पायी किती वेळ लागेल?" वगैरे!
आता मला एक सांगा, विचारणारा पुण्याचा (आणि मराठी भाषा बोलता येणारा),
ज्याला विचारतो तो माणूस पुण्याचा,
दुकान पुण्यात आहे,
तरीही सर्वप्रथम त्या रस्त्यावरील माणसाने हिंदीत सुरुवात का केली???
आपणच आपली भाषा आपल्याच राज्यात का बोलायला घाबरतो (की लाजतो?)
तेही महाराष्ट्रात?
पुण्यात?
सांस्कृतिक राजधानीत?
कमाल आहे!!

प्रसंग २: पुणे
मी एका "ओला" कंपनीच्या रिक्षावाल्याला बोलावले.
"कहां जानेका साब?"
"धानोरीला जायचंय!"
"OTP बताईये आपका?"
"तेराशे अडुसष्ट"
"सर समझा नही!"
"वन थ्री सिक्स एट!"
काही वेळाने एके ठिकाणी-
"किधर से लू साहब?"
"उजवीकडे" अस म्हणून मी उजव्या दिशेने हात केला.
नंतर -
"कहां से लेना है?"
"डावीकडे", अस म्हणून मी उजव्या दिशेने हात केला.
मी पूर्ण प्रवासात त्याला हिंदी येते मराठी येत नाही, म्हणून लगेच त्याच्या सोयीकरता हिंदीत बोलायला सुरुवात केली नाही.
उलट, मी त्याच्याशी संभाषण करतांना त्याच्या प्रत्येक हिंदी वाक्याला मराठीतच उत्तर दिले.
आणि उलट तो डावे उजवे हे दोन मराठी शब्दही (दिशेसहित) अप्रत्यक्षपणे माझेकडून शिकला.
एका दगडात दोन पक्षी. त्याला न टोकता आपोआप पराठीचा आग्रहपण मी धरला आणि त्याला दोन मराठी शब्द पण शिकवले.


-----


राजकीय आणि इतर अनेक क्षेत्रांत मराठी मंडळी भारतात तसेच इतर देशांत उच्च पदावर आहेत किंवा सुप्रसिद्ध सेलिब्रिटीज आहेत पण ही मंडळी "मोठी" झाल्यानंतर मात्र योग्य तिथे आणि योग्य तेव्हा मराठी भाषेचा आग्रह धरताना किंवा आवर्जून मराठीत बोलतांना दिसत नाहीत, हेही एक कारण आहे, मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण होऊन त्या शिरजोर होण्याचे!ही मंडळी मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत. याला काही अपवाद असतीलही! आपले मत काय आहे जरूर सांगावे!


-----

गुगल ट्रान्सलेट या गुगलच्या डिक्शनरी मध्ये प्रथम मराठी भाषा सोडून इतर सगळ्या भारतीय भाषा होत्या. मग मराठीपण आली. मात्र, गुगल ट्रान्सलेट च्या अँड्रॉइड एप्लिकेशन मध्ये फक्त मराठीच भाषेची डिक्शनरी ऑफलाईन डाउनलोड करण्याची सोय दिली नाही, असे का? दर वेळेस मराठीला दुजाभाव! मी मागे ईमेल लिहिला होता पण काही उत्तर नाही आले. यासंदर्भात काय करता येईल? किंवा असे तर नाही ना, की इतर विकतच्या मराठी डिक्शनरी एप्लिकेशन वर परिणाम होऊ नये म्हणून गुगल ला मुद्दाम कुणी मराठी माणसांचा गृप तसे करू देत नाही आहे? की आणखी इतर काही कारण आहे?

------

आपल्या मातृभाषेवर प्रेम असणे आणि मातृभाषेबद्दल अभिमान आणि गर्व असणे योग्य आहे पण म्हणून इतरांच्या मातृभाषेचा द्वेष करणे योग्य नव्हे. मात्र एकमेकांची मातृभाषा एकमेकांवर जबरदस्तीने लादणे चूक आहे. विशेषतः जेथे जी भाषा बोलली जाते तेथे आपण कायम वास्तव्यास गेलो तर ती भाषा शिकून घेणे आपले आद्य कर्तव्य ठरते. स्थानिक लोकांच्या भाषेत आपण बोलल्याने त्यांनाही आपण मित्रासारखे आणि आपलेसे वाटतो आणि त्यांच्या सामाजिक आयुष्यात स्थान मिळवू शकतो. कोणतीच भाषा उच्च किंवा नीच नसते. त्यामुळे मी कशाला कुणाची भाषा शिकू असा अहंकार कामाचा नाही. उलट आपल्याला जेवढ्या जास्त भाषा शिकता येतील तेवढे चांगले. तसेच भारतीय भाषांसोबतच जगात बहुतेक ठिकाणी ज्ञानभाषा इंग्रजी असल्याने तीही शिकणे अनिवार्य आहे. निदान आपल्यासारख्या भारतात राहणाऱ्या नागरिकांना भारत बहुभाषिक असल्याकारणाने भारतातील अनेक भाषा आणि त्याबरोबरच अनेक
आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्याशिवाय पर्याय नाही. इलाज नाही. 


#nimishtics



----

पुण्यात खडकी बाजार मध्ये शालेय वस्तू आणि स्टेशनरीचे एक पंजाबी सरदारजींचे दुकान आहे. पण ते आमच्याशी अगदी अस्खलित आणि शुद्ध मराठीत बोलत होते आणि त्यांनी अगदी अदबीने सगळ्या वस्तू आम्हाला दाखवल्या, हा एक सुखद धक्का होता.


#nimishtics

----

खिचडीसोबत आमसुलचा सार आवडतो म्हणून मी आमसूल घायला गेलो तर अनेक दुकानदारांना आमसूल हा मराठी शब्द माहिती नव्हता, ते मला आमचूर देऊ का असे विचारायला लागले. बरेचदा मी असे पाहिले आहे की काही किराणा दुकानदारांना रवा समजत नाही, सुजी समजते. तसेच एकदा लोहगावच्या आठवडे बाजारात एक मराठी भाजी विक्रेता दुधी भोपळ्याला "लौकी घ्या लौकी" असे ओरडत होता. हे सगळे बघून मला प्रश्न पडला की मी पुण्यात आणि महाराष्ट्रात राहतोय की कुठे उत्तरेकडच्या राज्यांत? कठीण आहे सगळं!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel