मधुमालती कथा सांगू लागली... एकदा राजा विक्रमादित्यने राज्यातील प्रजेच्या सुखासाठी एका विशाल यज्ञाचे आयोजन केले होते. राजा पूजेला बसला असताना तेथे एक ॠषिमुनी आले. राजाला पूजेतून उठता येणे शक्य नसल्याने राजाने त्यांना बसूनच अभ‍िवादन करून नमस्कार केला. ॠषिमुनींनी राजाला आशीर्वाद दिला. राजधानीपासून जवळच असलेल्या जंगलात ॠषिमुनींचे एक गुरुकुल होते. तेथे मुले विद्या प्राप्त करत असत. पूजा झाल्यानंतर राजाने ॠषिमुनीना येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा ऋषिमुनी म्हणाले, गुरूकुलमधील मुले सरपण वेचण्यासाठी जंगलात हिंडत असताना त्यांना दोन राक्षस पकडून डोंगरावर घेऊन गेले आहेत. त्यांनी मुलांच्या बदल्यात माँ कालीला बळी देण्यासाठी एका पुरुषाची मागणी केली आहे. ॠषिमुनी सांगितले की, बळी देण्यासाठी राक्षसांनी क्षत्रिय पुरुषाची मागणी केली आहे. हे ऐकताच राजा विक्रमादित्य त्या राक्षसांकडे जाण्‍यात तयार झाला. स्वत: राजा बळीसाठी तयार झाल्याचे पाहून ॠषिमुनींना आश्चर्य वाटले. ऋषिमुनींनी राजाला नकार दिला. तरी राजाने आपला निर्णयात बदल केला नाही. अनेक अडचणींचा सामना करीत राजा व ॠषिमुनी डोंगरावर पोहचले. राजाने राक्षसाला मुलांना सोडण्याची विनंती केली. दोन राक्षसांमधील एक राक्षस मुलांना सुरक्षित आश्रमात पोहचवून आला. रदूसरा राक्षस त्यांना घेऊन माँ कालीच्या मंदिरात घेऊन आला. राजा विक्रमादित्यने बलिवेदीवर आपली मान ठेऊन दिली. प्रजेच्या सुखासाठी राजा काहीही करण्यास तयार होता. राजाचया मानेवर राक्षस तलवार मारणार तोच दोनही राक्षस अचानक अदृश्य होऊन त्या जागी लख्ख प्रकाश झाला. स्वयं इंद्र देव व पवन देव राजासमोर उभे राहिले. राजाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार दिला. राजाची‍ परीक्षा घेण्‍यासाठी ते मृत्युलोकात आले असल्याचे त्यांनी राजाला सांगितले. प्रजेच्या हितासाठी राजा स्वत:चा बळी ही देऊ शकतो, हे पाहुन इंद्रदेव व पवन देव राजावर खूष झाले. राजाला आशिर्वाद देऊन पुन्हा अदृश्य झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel