मोकळी असोनि गुंतली खेळा । खेळ खेळतां झाली अवकळा ॥ १ ॥
सदैव नारी हिंडे दारोदारीं । विपरीत जहाली नवलाची परी ॥ २ ॥
असोनि पुत्र जाहलीसे वांझ । कोणासी सांगे अंतरीचें गुज ॥ ३ ॥
गुज जाणे तोचि ब्रह्मज्ञानी । एका शरण जनार्दनीं ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.