एक नवल देखिलें दृष्टी । पहातां पहाणें गिळिलें उठाउठी ॥ १ ॥

जें निजें चोजवेनाजे निजें चोजवेना । अंधारें सूर्य गिळिला जाणा ॥ २ ॥

कल्पनेविरहित पुत्र झाला । कल्पना गिळुनी आपणचि धाला ॥ ३ ॥

स्त्रीपुरुष नामें नटला प्राणी । एका जनार्दनीं प्रत्यक्ष देखो ॥ ४ ॥

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel