खर खर मुंड आवरे फकीरा । पालखीं निजविला मोतीया हिरा ॥ १ ॥

हळुहळु गाई निज रे बाळा । मोठा जटाधारी गोसावी आला ॥ध्रु०॥

ये रे ये रे कोल्ह्या जाय रे लांडग्या । नको भेडसावूं लेकरा दांडुग्या ॥ २ ॥

आळविला कान्हा पाजुनी प्रेमपान्हा । एका जनार्दनीं लाविला स्तनां ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel