ऐका ऐका पाटीलबोवाजी । गांव बरा राखा राजी । उद्यां येतील यमाजी बाजी ।

फटफजिती होईल की जी मायबाप ॥ १ ॥

जोहार मायबाप धनी । उठा उठा झोप सांडोनी । काळ भरला उरे ना कोण्ही ।

पुढें पडाल काळाचे वदनीं कीं जी मायबाप ॥ २ ॥

गांवांतील रयत स्वाधीन करा । कुलकर्णी आधीं हांतीं धरा । तरीच तुमचा बरा थारा ।

मोडेल कोपट होईल चुरा की जी मायबाप ॥ ३ ॥

कामाजी देशमुख मोठा मस्त । क्रोधाजी नाईक मिळाले त्यांत । मदाजीबोवा त्यासी शिकवीत ।

मत्सर श्वान पुढें भुंकत की जी मायबाप ॥ ४ ॥

दंभाजीची भारी हांव । अहंकारपंताने वोस केला गांव । जिवाजी तुम्ही विसरला धन्याचें नांव ।

या सहा जणांची हाव धरून की जी मायबाप ॥ ५ ॥

आतां तुम्ही विचार करा । मूळचा मार्ग हळुहळु धरा । तेणें चूकेल तुमचा फेरा ।

एका जनार्दनीं तुटेल सारा दोरा की जी मायबाप ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel