अरे अरे गांवगुंडा । क्षीरसागरींच्या पुंडा । हातां घेऊं नको धोंडा । भुलविशील गांवच्या रांडा । तर तर उगाच राही रे गांवगुंडा ॥ १ ॥

देशादेश देशांतरीं । आमुची गारुड्याची थोरी । तुझ्याच गांवची नवरी । शेलकी मुसलमानची पोरी । ती दासी करीन आपल्या घरीं रे र गांवगुंडा ॥ २ ॥

गांवगुंड बोले रे चावटा । पोरी नेतां लावीन तुला तीन वाटा । तुझ्या कंबरेचा मोडीन काटा । रिकामा नको आणूं रे थाट गांवगुंडा ॥ ३ ॥

अरे गारुड्याच्या पोरा । कारिका लावितोस दरारा । तुझ्या आईबापाला होता का थारा । म्यां सत्त्वगुण सोडिला वारा । म्हणून हा जगडंबर पसारा आवर की रे गारुड्या ॥ ४ ॥

धेड मांग किती एक आणि येवोनियां कितीएक गेले । ते जन्ममरणा विन्मुख झाले । एका जनार्दनीं निवांत राहिले रे गारुड्या ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel