तुझीं वाहीन मी दर्शनें शंख चक्रांकित भूषणें वो । निःशब्दांचें कुलुप तोडी दिवीं देहा उजळणें वो ॥ १ ॥

उदो म्हणा उदो पांडुरंग माउलीचा वो । तुझियेनि नामें गोंधळ घालीन सत्त्वाचा वो ॥ध्रु०॥

अधिष्ठानाचे रंगणीं देहाविण लोटांगणीं वो । पाहतां तुझें स्वरूप अवघी दिससी जनीं वनीं वो ॥ २ ॥

प्रकृति पुरुषाची चोखडी आव्हानिलसी आवडी वो । अनुहात चंडके उभी नाचसी उघडी वो ॥ ३ ॥

नवल दिवीचा प्रकाश केला रज तमाचा नाश वो । स्वानंदाभाव लाजिरें सत्त्वें केलासे विन्यास वो ॥ ४ ॥

एका जनार्दनीं भेटी हेचि वारी करणें मोठी वो । पुनरपि यात्रा न घडे पडली संसारासी तुटी वो ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel