मंडळ कमळ शुद्ध पराग हेंचि मुख ज्याचें वो । ओहं सोहं वाचे वदती अज्ञानपण त्याचें वो । परा आणि पश्यन्ती मध्यमा वैखरी सदा नाचे वो । तेचि विटेवरी अंबा उभी राहिली असे वो ॥ १ ॥

जयजय जगदंबे माउली वो ॥ध्रु०॥

गोजिरें रूप सुंदर उभी भीमातीरीं वो । चतुर्भुजा शोभिती शंख चक्र मिरवे करीं वो । कांसे पितांबर वैजयंती मिरवे ह्रदयावरी वो । पुंडलिकाकारणें तिष्ठे अठ्ठाविस युगें विटेवरी वो ॥ २ ॥

चरणरजालागीं वंदित ब्रह्मादिक जाहले पिसे वो । विश्वविश्वाकर जनीं जनार्दन भासे वो । अष्टभुजा नटली भक्तांकारणें विटेवरी वसे वो । एका जनार्दनीं आम्हां अनायासें दिसे वो ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel