सगुण गुण माया ।

आली कोल्हाटीण खेळाया ॥ धृ. ॥

प्रपंचाचा रोविला वेळु । चहुं शून्याचा मांडला खेळु ।

ब्रह्माविष्णु जयाचे बाळु । लागती पाया ॥ १ ॥

आला गडे निर्गुण कोल्हाटी । सोहं शब्दे ढोलगे पिटी ।

चैतन्याची उघडून दृष्टी । चला जाऊ पहाया ॥ २ ॥

कोल्हाटीण मारिती ऎशी उडी । एकवीस स्वर्गावरती माडी ।

देखे द्वार खिडकी उघडी । अगाध माया ॥ ३ ॥

कोल्हाटीण बसली असे डोळा । जाणे गुरु पुत्र विरळा ।

एका जनार्दनी लीळा । जाती वर्णाया ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel