आता मानभाव झालो भिक्षा वाढा बाई ॥ध्रु॥
मुळीचाची मानभाव वस्त्रे काळी केली ।
कोरके मागुन झॊळी भरली । उलटी काठी धरली ॥१॥
सोन्यारुप्याचे देव आम्ही मोडूनियां खाऊं ।
शेंद्राचे देव आम्ही दृष्टी ना पाहू ॥२॥
एका जनार्दनी मानभाव झाला ।
झॊळीवरती झॊळी ठेवूनी गडबड गुंडा केला ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.