धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे ।

रामकृष्ण वासुदेव सदास्मरा वाचे ॥१॥

सुखदु:ख समान सकळ जीवांचा कृपाळ ।

ज्ञानाचा उद्‌बोध भक्‍तिप्रेमाचा कल्लोळ ॥२॥

विषयी विरक्‍त जया नाही आपपर

संतुष्ट सर्वदा स्वयें व्यापक निर्धार ॥३॥

जाणीव शहाणीव वोझे सांडूनिया दूरी ।

आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४॥

एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन ।

आसनी शयनी सदा हरीचे चिंतन ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel