विषय सेविता गा जन्ममरणाचा बंधु ।

विवेक गुरु वाक्य छेदीभव बंधु ॥१॥

रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदे गळती गा ।

रामकृष्ण वासुदेव हरि देही विदेही जाला गा ॥२॥

गुरुवाक्य भावबळे निजबोधे पै बुद्धि ।

तेणे बोधे पाहता गा अखंड समाधी ॥३॥

जनी वनी निरंजनी वासुदेव समान ।

एका जनार्दनी चित्त चैतन्य घन ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel