जो जो जो जो रे त्रिनयना । निज बा पंचानना ।
सृष्टी संहार तमोगुणा । भोळ्या निर्मळ मना ॥धृ॥
सृष्टी संहार तुज तेणे । बहु झाली जागरणॆ ।
तो भ्रम सांडुनिया त्वां देणे । निजी निजसुख घेणे ॥१॥
भिक्षाटण करिता अवधूता । श्रमलासी बहु फिरता ।
सांडुनि निजकांता त्वा वसता । केला डोंगरमाथा ॥२॥
ऎसा बैरागी नि:संगी । होतासी तू जोगी ।
तो तु स्त्रीलागी अर्धांगी । घेऊनि फिरसी जगी ॥३॥
अहा त्वा कैसे तप केले । भिल्लीने भुलविले ।
बाळपणासी धरियेले । बायलेच्यानी बोले ॥४॥
ऎसा निलाजरा तू अससी । शंका नाही तुजसी ।
किती रे सांगावे तुजपाशी । त्र्यंबक प्रभु सुखराशी ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.