लागलें वेड मज तुझ्या प्रीतिचें भारी ।
झुरते दिसरात्रा सारी ॥धृ०॥
प्रारंभदशेपासून मन तुमचे पाई । ठेविलें मि अंतर नाहीं । जिवलगा ।
केलीत कां हो येकांतीं माझि मनाई । तें कारण सांगा काई ।
हा वियोग तप्त उन्हाळा मला न साही । कर्मिते दिवस वाई वाई ।
दहादहा वेळा येऊन उभी राह्ते द्वारीं ॥१॥
संनिध बसून सांगते, ऐका गुणिराया । जीव धरला आशा पुरवाया ।
घडविल्या गोष्टि त्या माघार्या न फिराव्या । पैलतीरपार कराव्या ।
शिव निर्माल्याच्या क्रिया कशा विसराव्या ? । अपअपल्या मनीं स्मराव्या ।
भिऊभिऊन फार वर्तते मी जनवेव्हारीं ॥२॥
नको टाकुं ओळख तुझीमाझी बहुत दिसाची । आण तुला माझे मासाची ।
बारा वर्षें लोटली प्रीत नवसाची । ही जुगण जशी हौसांची ।
स्वाधीन सख्या मी तुझ्या दासिदासांची ।
लागली मज गोडी उसाची । जिवलगा ।
बेइलाज मर्जि येवढी कोण्या प्रकारीं ? ॥३॥
धरीला पक्ष तो सरशेवटास न्यावा । पण केला तसा निभावा ।
पाहिना बरें जन विरुद्ध करिती दावा । स्नेह परिणामासी लावा ।
पहा पहा देहादर करिते जेव्हां तेव्हां ही आठवण माझी ठेवा ।
होनाजी बाळा म्हणे आमचें वचन स्वीकारी ।
तू प्राणाची अधिकारी । जिवलगे ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.