आलों तुझे मंदिरीं सुंदरी, इच्छा कर अमुची पुरती ।
पहा मनुष्याकडे, नको ठेउं दृष्ट गडे द्रव्यावरतीं ॥धृ०॥
झाला जनिं बोभाट आगाजा सुंदर स्वरुपाचा भारी ।
प्रसिद्ध जनवार्तेंत ऐकली कीर्त तुझी कर्णद्वारी ॥
मोहनिरूप निर्माण सखे, तुज केलें विधेनें निर्धारीं ।
आधिन करून सर्वत्र ठेविलें त्वां पुरुष आपुले आहारीं ।
राजमान्य लक्षणें तवांगीं लक्ष्मीचीं चिन्हें सारीं ।
काय दुसर्या बापुडया तुजपुढें रुपवंत्या सार्या नारी ! ।
अशि सुगर गुणवान अवडलिस तूं अंत:कर्णामाजीं ।
चित्तायोग्य पाहुन तुजवर्ती खुष अमची झाली मर्जी ।
बळे पडत नाहीं गळां, सखे सुखसंतोषें व्हावें राजी ।
विषयामृत हें पाजी, तुसाठीं पंचप्राण आमचे झुरती ॥१॥
नाही आवड दुसरी, वेधलें मन सखे सौंदर्यातें ।
तुला पाहिल्यापासुन विषयचळ अति सुटला सर्वांगातें ।
आशाभंग, मन विरस नये करूं, स्नेहमार्गें चालिव नातें ।
नको आमचें मन मोडूं, यामधें काय तुझें तरि जातें ? ।
मृगजळवत् हा व्यर्थ मानवी जन्म, पहा शोधुन पुरतें ।
जोड स्नेहाची करी, सांचलें द्रव्य कोणापाशिं राहतें ? ।
लक्ष देऊन शब्दाकडे सखे, गोष्ट ऐक आमचे मनची ।
उघड पुसावें कसें ? आहेस तूं स्त्री मोठया श्रीमंताची ।
लौकिकांत नाणितां योजना कर सत्वर एकांताची ।
आशा पुरव ही आमचि, अलि गडे विषयसमुद्राला भरती ॥२॥
कां विचारीं पडलिस ? कोणते अर्थीं भय वाटे तुजला ? ।
असें उगेच बसल्यानें मुक्याची खुण समजेल कैशी आम्हांला ।
रात्र उजाडूं पाहे बोलतां, अमृतकर अस्ता गेला ।
नये वक्त हा फिरून, अजुन तरि पहा पूर्तता लाभला ।
जाहाली पहाटेची हवा, प्रभंजन थंड सखे शीतळ आला ।
केवढा वेळ पहावी वाट तरि ? अंगिं मदन चंचळ झाला ।
आतां न करी उशिर सखे, ऊठ, चल मंदिरिं लवलाही ॥
इतर सुखाचे परिस विषयसुख, याला सर दुसरी नाहीं ॥
तुला सांगणें हवें कशास्तव ? मन देतच आहे ग्वाही ।
मुखचंद्राकडे पाहिं आमच्या, कां लाजिर केली वृत्ती ? ॥३॥
किति पर्यायें करुन तुला अम्हि पढवियले जैशी मैना ।
अजुन घडी पहिलीच अंतरीं, कसा तुझे मनिं द्रव येइना ? ।
जिव तोडून जिवलगे सांगतों तरि तुला उपतिष्ठेना ।
अम्हि तर अति अत्याधिर, वेडे झालों नवतीच्या रसपाना ।
बोल तर एकदां आम्हांसी शब्द सखे लाजिरवाणा ।
तेवढयानेंच मन शांत करुन मग जाऊं आपल्या स्वस्थाना ।
भीड सख्याची पडतांच सखीनें कृतनिश्चय मनाचा केला ।
तयारून मंदीर आवघें सखा एकांतामधें नेला ।
सावकाश नवतिचा लुटा भर, अशी रजा दे सखयाला ।
होनाजी बाळा म्हणे, मारला ठाव अखेरिस बेशर्थी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.