क्षणिक सुखाचेसाठीं मागशिल प्राण तरि द्यावया --
सिद्ध आम्ही झालों यांत गडे संशय उरला नाहीं । राजसवदने ।
या नरजन्मीं येउन आणखी तुजविण नलगे कांही ॥धृ०॥
सौख्यउदय पाहा सखे नवल परि हे नशिबाचे ताले । राजसवदने ।
चिंतलेच तुज, असें सगुण स्त्रीरत्न हाताशीं आलें । राजसवदने ।
तरि तुझें अमुचें सुख पुरें असें नाहीं अजून मन धालें । राजसवदने ।
नको मिळलें सोडुं हाताचे, जाती सुकाचे दिवस --
तुझ्या उपकारीं, प्राण तरमळे नाभींचे ठाई । राजसवदने ॥१॥
वाटशि आप्ताहुन अधिक योग्य, धन्य काय तुजपुढें नारी । रजसवदने ।
अशि आम्हांस प्रियकर नेहमीं जवळ हवीस शेजारीं । राजसवदने ।
जातां जवळुन तुझ्या घराकडे जिव पाहातों माघारीं । राजसवदने ।
फिरतों नित्य व्यवहारी, परंतु स्मरण तुझें --
पाउलापाउलीं गडे होतसे आमच्या अंतरध्याईं । राजसवदने ॥२॥
दाखवुन किंचित सुख सखये, आतां नको करूं माजी । राजसवदाने ।
धर निश्चय बळकट, प्रीतजल तृषांतिताला पाजी । राजसवदाने ।
अमचे उपाई जें मागशील तें उभें द्यावया राजी । राजसवदाने ।
काळजींत जीव तुझ्या घराकडे, नाहीं --
पहात आपलें स्वहित, सोडिलें प्रपंचा पाणी ग तुजपाईं । राजसवदाने ॥३॥
चांगट नट गुण अविट पाहतां तूं रूपवंति दारा । राजसवदने ।
संसार विषय तुजमुळें सखे आम्ही सोडीला सारा । राजसवदने ।
संकटीं पडले प्राण, लागुंदे विषयसुखाचा वारा । राजसवदने ।
इष्काप्रति ईश्वरा मति दे म्हणे होनाजी बाळा --
आतां प्रतिपाळ कोण तुजविणें करिल तें पाहीं । राजसवदने ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel