भोगुं देशिल तरी सुंदरी तुझ्या करिं विकले जाऊं ॥धृ०॥
रूप सार्‍यामधें शिरा उत्तम बहुत गुण योग तुजमधें गडे भरले ।
अति सुंदर वदनाची ठेवण, चित्र जसें भिंतीवरलें ।
रोज दृष्टीनें पाहातां पहातां मन अमुचें तुजवर फिरलें ।
निश्चय तुज भोगावें असें मग ह्रदयांतरि पुरतें ठरलें ।
या काळजीनें अजवरते
क्षिण जाहलो शरिरानें पुरतें
अणिक नको काहीं तुजपरते
शेजेवरते कधिं एकांतीं शरिर तुझें उघडें पाहूं ? ॥१॥
ठिक सुरेख ठेंगणी रुपानें, गौरवर्ण सुंदरशी ।
पुरुषाच्या वासना फिराया भाव प्रीतिचे तूं करशी ।
म्हणुन शरण तुज आलों उताविळ होउन तरि कां दुर धरशी ? ।
न लाजतांना अतां राजसे बैस येउन अमचे सरशी ।
नको उगेच अमुचें मन मोडूं ।
चार दिवस प्रीतिनें दवडूं ।
आहेस तंवर हा स्नेह गडे जोडूं ।
मग सोडुन हें वेड कधिंमधिं हात येउन नुसता लाऊं ॥२॥
आलिस यौवनामधें, उभार स्तन उभे कंचुकीआड दिसती ।
कोमल मुख नाजुक अप्रतिम, आम्हां ती सारा वेळ मुद्रा हसति ।
विषय कुशलतेचे गुण अवघे तुझ्या करतळामधें वसति ।
कधिं सुखानें भोगुं तुला ? गडे, व्यर्थ काय पाहाती नुसती ? ।
फार गांजिलें या घोरानें
जसे द्र्व्य नेलें चोरानें
पाहत फिरावें रानोरानें
तसे विषयजोरानें आम्ही गडे तुझ्यामागें धावत येऊं ॥३॥
कां ग सुटेगा विषयद्रव तुला ? किति बोलावें सांग आतां ? ।
एका एक जातिक दिवस निघुन हे, नाहीं पुढें कांहीं पाहतां ।
कोण अधीं जिंतील ? कळेना देह त्यागुन स्वर्गीं जातां ।
गेल्यावर हा प्राण अपेश हें सखे तुझ्या येइल माथा ।
मग नारीला संकट पडलें
गुप्त रूपें होतें तें घडलें
उभय चित्त मग पुरतें जडलें
होनाजी बाळा म्हणे, सापडलें रत्न तयाला उळगाऊं ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel