भीमातीरीं गुलजार अतिपवित्र, पाहुन वसविलं चांगलं फुलशहर ॥धृ०॥
हेच मीच नी (?) सुरेखा । विश्वासु माणसें सांगती कीर्तीचे कौतुक । दक्षणचे नाथ । स्वराज्याचे धनी कीं ब्रह्मपुरीचे ब्रह्मादिक । जें करणें तें अचुक गंगातिर पैठनीं उतरला फुलशहराचा झोक । वाणी उदमी सावकार । द्रव्य पदरचें देउन वसविलं चांगले फुलशहर ॥१॥
मम चित्तांतिल भावू । आश्वासन तुम्हि देतां सखया करिता जरी जीव लाऊं । नका सासरत्रास जाऊ । उभयतां माहेरीं तीर्थरूप आपलें दिलदर्याऊ । फुलशहर कसें पाहूं ? । हरप्रेत्न करू परंतु अप्सरा बनून जाऊं । श्रीमंतासमोर । बाच्छाई मुजरे करून देखिलें लखखित गौपुर ॥२॥
राव गेले स्नानासी । डागिने घालिते प्रियकरा पोषाख आभासी । मी बनले हरभासी । अति गुलजार करून मोहिले त्या रावराजींद्रासी । मग बोले सख्यासी । कर जोडुनी विनविते प्रियकरा, मी चरणाची दासी । दिल्ली अटकेवर । सगनभाऊ म्हणे कीर्त इथून लागली कटयार ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel