चालीव प्रीत माझ्या सजणा । प्राणसख्या गुणिजना ॥धृ०॥
माया ममता लाउन वचनीं गोउन मशीं जिवलगा । आशा फारशी लाउन जाशील देउन कुणीकडे दगा । मजपरीस तुला सवत चांगली कोण मिळाली ठगा ? ॥चाल॥  तिनें मोहनी घातली तुजला । पाहुन तिशीं तूं रिझला । म्हून त्यजिलें सख्या मजला ॥चाल॥ आतां काय मी करूं ? । किती ही भर नवती आवरूं ? । दावा राजहंस पांखरूं ।
जाऊन चरण कुणाचे धरूं । ? ॥चाल॥ सवतीनें घातलीं मोहनी, नेला स्वामी माझा फितवून । कोणाप न्यावी फिर्याद ? कोण माझी दाद देइल बेगीनं ? । ज्यापाशीं न्यावी फिर्याद तोच बाई बसला रुसुनशान । किती समजाऊं ? परी उमजेना ॥१॥

या रंगमहालीं शेज तुंसाठीं ठेविली करून । साजुक नाजुक कळ्या पिवळ्या हेत मनाचा धरून । चार प्रहर म्यां वाट पाहिलीं, नाहीं पाहिली फिरून (?) ॥चाल॥ रंगमहालीं शेज सुकली । सख्या, तुम्ही रात्र कुठें करमिली ? । कोणची सवत गळा पडियली ? ॥चाल॥ मर्जी कठिण कां केली ? । सख्या, कांहीं चुकी मजपासुन झाली ॥ म्हणून कां निजला राजमंदिरी ? ॥चाल॥ म्या करून कुल्पी विडे तूसाठीं तबक ठेविले भरून । येणार नाहीं बोललास माझे नेत्र आले भरून । रंगमहालीं तुझी सय होतांच उलथुन पडलें पलंगावरून । किती हात जोडूं, परि उमजेना ॥२॥

काय माझा अन्याय ? कां हो रुसला मज दुबळीवर ? । नाहीं बोलल्ये तुम्हां, कां हो टाकिलें कीं माझे घर ? । सुरतपाक मी असतां मन कां जातें दुसरीवर ? ॥चाल॥ नको दगा मशीं देऊं, सख्या, मी किती तुला समजाऊं ? । तुम्हांविण शरण कोणाप्रति जाऊं ? । ॥चाल॥ प्राणसख्या राजसा, आतां क्षणभर तरी पलंगीं बसा । करा तरी संग, होऊं द्या ठसा । सख्या, मी कमान, तुम्ही तीर कसा ॥चाल॥ आनंदाच्या वर्षामधिं सख्या तुझी मर्जी बिघडली कशी ? । आजवर चालली प्रीत, आतां भेटली कोण विवशी ? । नाहीं घेत पानाचा देठ, चला रंगमहालीं, झाले मी खुशी । विनंत्या करी सुंदर कामिना ॥३॥

करी विनंती, सुंदर सजणा, सोड मनाची अढी । सुरतपाक सकुमार सडक सडपातळ मी फुलछडी । नको झिडकाऊं मला, बसुन घे प्रेमसुखाची विडी ॥चाल॥ चाल सख्या रंगमहालीं । बोलले गंगु हैबती बोली । सुंदर पडली तुमच्या ख्यालीं ॥चाल॥ बसून पलंगावर सख्याला वारा घाली सुंदर । सख्या, तूं लूट ज्वानीचा बहर ॥चाल॥ कवि विश्वनाथ कवि म्हणे विठु लक्ष्मुण देश दक्षण । मलुद सुगुचे छंद, ख्याल कटिबंध, घ्यावा ऐकुन । वैरी झाले नादान, लागला बाणा, खोचलें मन, पळ सुटला धाक दुर्जना ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत