सांब कधीं कृपा करील ? तो येइल गृहीं ग स्नेही ॥धृ०॥
या घरा उलटोनी जावें माघारा । जलदी कुचाची करा त्वरा । ममता मजवर असों द्या जरा ॥मनोहरा॥ जाल मास बारा । रामा । कुठवर दम धरील दारा । ही तनु चंग, रंग ढंग संग करिल नीसंग, रंग भंगल्या न ये मग ॥१॥
या जीवा बहू क्लेश जाले केशवा । चरणांबुज दाखवी माधवा । करुणा येऊं दे तुज येधवा । जगदीशा । मी मनांत झुरतें । रामा । पक्षापरी वनांत फिरत्यें । कीं हनु कटीयार कारगार, वार करुं आरपार, फार नार घार जाहाली ॥२॥
पारिखा जाहालासी लोकांसारिखा । कधीं येसी घरा संसारीं का । विषयाची ढाल उभारिनास कां ? । येकदम । गुहकुटुंब पाहाया । रामा । आहो दिनरात्र हाची ठाया । श्रीहरि धांव पाव, दाव माव, करुनी उपाव, लाव डाव घाव, धांव तूं ॥३॥
श्रीहरि स्मरतांची स्वामी आले घरीं । नाना विलास करी सुंदरी । घेउनी गेली निज मंदिरीं । सखयाला । रंगमाहालीं नेलें । न्हाऊनियां उदेल तेलें । कीं फंदी आनंद, बुंद छंद पद करी, कडी बंद, तुंद धुंद फुंद यांतची ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.