पतीविणें जीव व्याकुळ मोठा । माझी मान कापुनिया बारवेंत लोटा ॥धृ०॥
जीव व्याकुळ होतो आबाजी । कसा असेल सखा परदेशी प्रवासामाजीं ? । सासुसासर्‍याला गांजी । राहावेना आतां माझ्यानं, मराया राजी । बोलावुनि आणा, पत्र त्याशीं धाडा जी ।
 
जाळुनि करा चुना, रंगमहाल पाडा जी । लक्षुमी करा फना, पाठी लागी वाडा जी । कां हो गेलां प्रवासामधीं ? घरीं काय तोटा ? ॥१॥

कोणे सवति तुला बीरमौली । पोटजाळी ईशी पायांत कशि रे भवली ? । इतकी तरी काय नीसवली । कशी काय तुला गत जाली ? बदलली नवली । कसा कोपला रामचंद्र बा गे ? । जीव हा धोपला, राजेंद्र नाहीं गे । कशीशी हो, पळा भोगेंद्रना (?) बाई गे । मजलागीं गर्मीं जाहाली, पाजा घोटा ॥२॥

इतक्यामधीं जासुद आले । सांगती, पति लष्करांत गारद जाले । पोशाख वळखिले शेले । उभीयान आंग टाकीलें जोतीयाखालें । करी शोक, ‘हाय हाय, आतां काय राहूं गे ?’ । रडे नार धाय, ‘आतां काय पाहूं गे ? । चंद्रभागे माय, तुला देह वाहूं गे ?’ । रडे नार धाय. ‘आतां काय पाहूं गे ? । चंद्रभागे माय, तुला देह वाहूं गे । आतां मी सती जातसें, यांत नाहीं तोटा ’॥३॥

हरगीस नाहीं राहायाचें । साहित्य करा मामाजी, सती जायाचें । बोलिल्यें मी कायावाचें । तरी सती सगळ्यांत समाधान जीवाचें’ । आणुनी लाकडें रचिलीं सरणा जी । घालुनी सांकडें पावे सुमरणा जी । लाउनी काकडे जोडुं हात चरणा जी । फंदी अनंताचा कोरडा सवाई सोडा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel