कां रुसतां हो आतां ? या रंगमहालीं । परगृहीं जातां होते लाही । सोसेना ही ॥धृ०॥

प्रीतविनोदें तुला । पदरी धरावें, छंड तुझा कीं मला । गुण आठवावे आज होऊं द्या सला । मज भोगावें, तरमळते मी गुणग्राही । मजकडे पाही ॥१॥

आजवर ममता बरी होती सुखाची । लोळेन चरणावरी, आवड मुखाची । जाऊन धरिते करिं, वेळ रुताची । सेज फुलांची सुकली जाई । दर्शन देई ॥२॥

सुखशयन दे करूं मरजी पाहाते । हेत मनाचा हो धरून लाजुन येते । कां जातां हो दुरून ? चला सदनातें । गुण किती आठवूं लवलाही ? । साक्ष विठाई ॥३॥

नार छबीली कीं उभी । थाट करोनिया दावी सखयाला खुबी । मन मोहोनिया अवचित उगवे नभीं । आनंदें करोनिया मजा उडवावी ठाई ठाई । रामा गाई ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel