सोडि सोडि गोपीनाथ वस्त्रं देई ॥धृ०॥

सासुरवाशी घरच्या नारी । जात होतों आम्ही मथुरे बाजारीं । रंग भरोनी मारी पिचकारी । नको करूं अशी मात ॥१॥

राधा विलासी हा ह्रषिकेशी । धाउनीच धरितो पदरासी । किति शिकवावें ग या नष्टासी ? । करूं उपाय कांहीं ? ॥२॥

यश्वदेपाशीं जाउं मिळोनी । सांगुं न आपली सर्व गार्‍हाणीं । जिव त्रासविला तुझ्या कुमरानी । आतां सांगुं त्याची मात ॥३॥

हा मनमोहन मुरलीवाला । किति शिकवावें या गव्हाराला ? । दिधलीं वस्त्रे, पळून गेला । रामा हा गुण गाई ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel