धर्म ग्रंथांनुसार यज्ञाच्या माध्यमातून प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते. धनाची प्राप्ती, कर्मांचे प्रायश्चित्त, अनिष्ट टाळण्यासाठी, दुर्भाग्याला सौभाग्यात बदलण्यासाठी, रोगांचे निवारण करण्यासाठी यज्ञ करण्याचे विधान आहे. देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि धन-धान्याची समृद्धी होण्यासाठी यज्ञ केले जातात. गायत्री उपासनेत देखील यज्ञ महत्त्वाचा आहे. गायत्रीला माता आणि यज्ञाला पिता म्हटलेले आहे. त्यांच्याच संयोगातून मनुष्याचा अध्यात्मिक जन्म होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.