१)औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ (Drugs & Cosmetics act 1940 and Rule 1945)
औषध निरीक्षण समितीच्या अहवालानुसार
ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात खराब गुणवत्ता असलेली औषधे आयात केली जात असत. याला प्रतिबंध करण्यासाठी १९३० साली चोप्रा समिती निर्माण करण्यात आली त्यानुसार काही नियम बनवण्यात आले. पुढे याच नियमात बदल करून १९४० रोजी औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा बनवण्यात आला त्यांनतर काही १९४५ साली काही नियम बनवण्यात आले.१९४० च्या या कायद्याच्या निर्मितीनंतर यामध्ये अनेक दुरुस्ती व बदल झाले आहेत.
१९६४ च्या दुरुस्तीमध्ये आयुर्वेदिक व युनानी औषधांचाही समावेश या कायद्यात करण्यात आला आहे.
यामध्ये औषध व सौंदर्य प्रसाधने यांच्या व्याख्या दिल्या आहेत
औषध- असे सर्व पदार्थ व यंत्र सामुग्री जी मानव तसेच जनावरे यांच्या रोग निदान, उपचार यासाठी वापरली जातात त्यांना औषध असे म्हणतात.
सौंदर्य प्रसाधने- सौंदर्य तसेच स्वच्छता यासाठी मानवी शरिरावर वापरले जाणारे पदार्थ सौंदर्य प्रसाधने म्हणून ओळखले जातात.
औषधाची निर्मिती, आयात, निर्यात, वितरण, परवाने, औषध गुणवत्ता या संदर्भातील नियम या कायद्यात समाविष्ट आहेत.
या कायद्यातील विविध भागात वेगवेगळे नियम दिले आहेत.
भाग १६- औषधाची गुणवत्ता याबत नियम
भाग १७- मिसब्रँडिंग सांधर्भात कंपनीने दावा केलेली वैद्यकीय गुणवत्ता औषधामद्ये असणारी वैद्यकीय गुणवत्ता यामध्ये तफावत आसने याला याला मिस्ब्रँडिंग म्हणतात.
भाग १८- मिसब्रॅण्डिंग औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीला बरखास्त करण्याबाबत नियम
भाग-२२ व २३- यध्ये औषध निरीक्षक (ड्रग इंस्पेक्टर) चे अधिकार, त्याची कामे, कठोर नियम, कारवाई यासंदर्भात सविस्तर माहिती आहे.
भाग २७- यामध्ये खोटी औषधे, औषधातील भेसळ याबाबत नियम आहेत.
या नियमांतर्गत औषधातील घटक लेबल वरती नमूद करणे बंधनकारक असते.
२) औषधनिर्माणशास्त्र कायदा १९४८ Pharmcy Act 1948
सुरवातीच्या काळात भारतात फार्मसी प्रोफेशन सांधर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. कायद्याच्या अभावामुळे औषध निर्मिती व वितरण कित्येक गैरप्रकार घडले. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक हानी झाली.
हे सर्व प्रकार टाळण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र कायदा १९४८ अस्तित्वात आला.
देशातील औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे त्याचबरोबर औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील सेवांची गुणवत्ता सुधारणे व फार्मसी प्रोफेशन ची उंची वाढवणे.
The Drugs and Magic Remedies (Objectionable Advertisements) Act, 1954
या कायद्यांतर्गत ताईत, मंत्र, धागे ,दोरे यामध्ये अदभूत शक्ती असून त्याद्वारे आजचे निदान,उपचार होतात आशा प्रकारे रुगणांच्या दिशाभूल करणे व अंधश्रद्धा पसरवणे या गोष्टी बेकायदेशीर आहेत.
तसेच या कायद्यांतर्गत औषध, सेवा, वस्तू यांची रुग्णाची दिशाभूल करणारी जाहिरात करणे याला बंदी आहे.
We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.