*Rx*
*फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...* *भाग १५*
रुग्णांचे अधिकार
अधिकार आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आज आपण रुगणांच्या अधिकाराबाबत जाणून घेऊ, रुग्णांची कर्तव्ये कोणती आहेत हे पुढील स्वतंत्र लेखात पाहू.
रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून रुग्णांणा काही अधिकार देण्यात आले आहेत. जर रुग्णच्या अधिकारांची पायमल्ली होत असेल तर ते त्यासंदर्भात न्याय मागू शकतात.
१)आदराने वागवले जाण्याचा अधिकार
२)भेदभाव, बळजबरी, उत्पीडन आणि शोषण यापासून स्वातंत्र्य असण्याचा अधिकार
३)योग्य दर्जाची सेवा मिळण्याचा अधिकार
४)प्रभावी संवाद करण्याचा अधिकार
५)आदर व स्वातंत्र्य असण्याचा अधिकार
६)उपचारांचा अंदाजे खर्चाविषयी फायदे तथा धोके याविषयी पूर्णपणे माहिती मिळवण्याचा अधिकार
७)माहितीपूर्ण निवड करण्याचा आणि माहितीपूर्ण संमती देण्याचा अधिकार
८)समर्थन कार्याचा अधिकार
९)कोणत्याही वेळेस रुग्णालय (Hospital) बदलण्याचा अधिकार.
स्वतःच्या जोखमीवर जी कदाचित आपणास समजावून सांगितली असेल.)
१०)व्यवस्थापक मंडळाकडे योग्य तऱ्हेने तक्रार करण्याचा अधिकार.
रुग्णांना जसे अधिकार आहेत तसेच त्यांची काही कर्तव्ये देखील आहेत जी आपण पुढील लेखात जाणून घेऊ.
*We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.*
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com