आत्तापर्यंत तुम्ही नार्को टेस्ट बद्दल ऐकलं असेलच...

आज आपण नार्को टेस्ट म्हणजे काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात

जेव्हा गुन्हेगार आपला गुन्हा कबूल करत नाही अथवा सत्य सांगत नाही अशा वेळी त्याच्याकडून सत्य जाणून घेण्यासाठी नार्को चाचणी हा अंतिम पर्याय असतो त्यामुळे ही चाचणी सत्य चाचणी या नावानेही ओळखली जाते.

नार्को चाचणीमध्ये ज्याची ही चाचणी करायची आहे त्या व्यक्तीला  truth serum हे इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जाते. या truth serum मध्ये इथेनॉल, सोडिअम पेंटाथॉल, बार्बिच्यूरेट हे घटक असतात.

या इंजेक्शनमुळे व्यक्ती अर्धबेशुद्ध होतो म्हणजेच तो पूर्ण शुद्धावस्थेत ही नसतो आणि पूर्णपणे बेशुद्धही नसतो...

खोटे बोलण्यासाठी व्यक्तीला त्याच्या कल्पनिकतेचा वापर करावा लागतो मात्र पूर्णपणे शुद्धावस्थेत नसल्याने व्यक्ती खोटे बोलू शकत नाही.

काही वेळा या अवस्थेतही काही व्यक्ती खोटे बोलतात पण याचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी आहे त्यामुळे ही चाचणी उपयुक्त आहे.

ही चाचणी करण्यासाठी अनेक नियम व कायदे आहेत.


नार्को चाचणी फक्त मोठमोठ्या केसमध्ये आणि अंतिम पर्याय म्हणूनच केली जाते शिवाय ही चाचणी केवळ ठराविक रुग्णालयातच केली जाते व ज्यासाठी अनेक परवानग्या मिळणे गरजेचे असते.

ही चाचणी सर्वप्रथम डॉक्टर रॉबर्ट हाऊस यांनी १९२२ साली टेक्सासमध्ये येथे दोन गुन्हेगारांवर केली होती.


नार्को चाचणी करण्यापूर्वी प्रथम व्यक्तीच्या आरोग्यविषयक चाचण्या केल्या जातात व त्यानंतर त्याला truth serum इंजेक्शन दिले जाते व सुरवातीला खत्री करण्यासाठी व्यक्तीला असे प्रश्न विचारले जातात की ज्याची तो खरी उत्तरे देऊ शकतो जसे की त्याचे नाव, पत्ता....

ही चाचणी नार्को चाचणी या नावाने ओळखली जाते कारण यामध्ये नारकोटिक्स औषध या प्रकारातील रसायनांचा वापर केला जातो.

या चाचणीमध्ये औषधाची मात्रा ही व्यक्तीचे वय,लिंग,वजन या गोष्टी तपासून दिल्या जातात. औषधाची मात्रा जास्त झाल्यास व्यक्तीच्या जीवावर बेतण्याचीदेखील शक्यता असते.


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel