औषधांची नावे ही तीन प्रकारची असतात रासायनिक नाव (केमिकल नेम) ज्यामध्ये औषधातील रासायनिक तत्त्वानुसार औषधाचे नाव दिलेली असते.

तर दुसरा प्रकार म्हणजे non proprietary name ज्यामध्ये प्रमाणित अधिकृत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे दिलेल्या नावांचा समावेश होतो 

आणि तिसरा प्रकार म्हणजे brand name ही औषधांच्या कंपनीने दिलेली नावे होत ही नावे प्रोप्रायटरी नेम म्हणूनही ओळखली जातात.


दुसऱ्या प्रकारातील औषधे जी नॉन proprietary औषधी म्हणून ओळखली जातात त्यांना जेनेरिक औषधे असेही म्हणतात ही औषधे कोणत्याही ब्रँडच्या नावाखाली असत नाहीत

ही औषधे प्रमाणित अधिकृत संस्था तसेच जागतिक आरोग्य संघटना यांच्या नियमानुसार व नियंत्रणाखाली बनवली जातात

ब्रॅण्डची औषधे स्वतः कंपनी बनवत असल्याने त्यांची किंमत ही स्वतः कंपनी ठरवत असते परंतु जेनेरिक औषधांची किंमत ही या अधिकृत संस्था व शासन याद्वारे ठरवली जाते त्यामुळे या औषधांची किंमत ही इतर औषधांच्या तुलनेत खूपच कमी व सर्वसामान्य जनतेला परवडणारी असते परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये सर्व औषधांच्या तुलनेत जनरिक औषधे फक्त सात ते दहा टक्केच विकली जातात याला आपल्या देशातील आरोग्यविषयक यंत्रणा कारणीभूत आहे आर्थिक लाभ वैयक्तिक फायदा आणि इतर कारणामुळे कित्येक डॉक्टर brand नेम नुसारच औषधे लिहून देतात असतात शिवाय अनेक मेडिकलमध्ये brand name चीच औषधे उपलब्ध असतात अशा पद्धतीने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जाते

परंतु शासनाच्या निर्णयानुसार जरी डॉक्टरांनी ब्रँडनेम नुसार औषधे लिहून दिली असली तरी रुग्ण जेनेरिक औषधांची मागणी करू शकतात


जनरिक औषधे ही कोणतेही brand च्या नावाखाली जरी बनवली जात नसली तरी त्यांच्या गुणवत्तेमध्ये कोणताही फरक असत नाही कारण ही औषधे जागतिक आरोग्य संघटना व अधिकृत संस्थांच्या नियमानुसार बनवलेली असतात या औषधांचा परिणाम हा इतर ब्रँडेड औषधांच्या परिणाम सारखाच असतो.

शासनाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक रुग्णाचा हा अधिकार आहे जर त्यांची इच्छा असेल तर ते जेनेरिक औषधांची मागणी करू शकतात.


We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई.

९७६५२६२९२६

ashishkarle101@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel