कट प्रॅक्टिस म्हणजे आर्थिक लोभापायी व्यावसायिक नैतिक मूल्यांची पायमल्ली करीत रुग्णांचे आर्थिक शोषण करणे ज्यामध्ये अर्धवट उपचार करणे, गरज नसताना अनावश्यक औषधांचा (बहुऔषधी उपचार पद्धतीचा) अवलंब करणे, अनावश्यक निदान चाचण्या करायला लावणे, आवश्यकता नसतानाही रुग्णांना रुग्णालयात ठेवणे/लवलर डिस्चार्ज न देणे, सोप्या पद्धतीने उपचार होत असताना देखील जटील उपचारपद्धतीचा अवलंब करणे जसे की नैसर्गिकरित्या प्रसूती होत असताना देखील माता/बाळाच्या जीवाला धोका असल्याची अवैध करणे देत सीझर प्रसूती करणे अशा अनैतिक गोष्टींचा समावेश होतो.
या सगळ्यात वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर,फार्मसिस्ट, रोगनिदानतज्ञ व इतर वैद्यकीय सेवा पुरवणारे दलाली (कमिशन) घेऊन काम करणे या अनैतिक गोष्टीचा वापर करत रुग्णांचे  आर्थिक शोषण करतात.

याठिकाणी मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की सर्वच डॉक्टर, फार्मसिस्ट,रोगनिदानतज्ञ अथवा वैद्यकीय सेवा पुरवणारे इतर घटक आशा गैरमार्गाचा वापर करतात अस नाही आजही समाजात असे अनेक वैद्यकीय सेवा पुरवणारे लोक आहेत जे व्यावसायिक नैतिक मूल्ये जपत लोकांना योग्य प्रकारे सेवा पुरवतात, कित्येकदा हे लोक स्वतःचा पैसा,वेळ वापरून विनामूल्य सेवा देण्यास देखील तत्पर असतात.
डॉ प्रकाश बाबा आमटे, डॉ अभय बंग, डॉ राणी बंग, डॉ रवींद्र कोल्हे, डॉ स्मिता कोल्हे   हे लोक पैसा या गोष्टीला प्राधान्य न देता रुग्णांची सेवा, त्यांचं आरोग्य या गोष्टींना महत्त्व देतात, रुग्णांची सेवा हेच  त्यांच आद्यकर्तव्य मानतात, समाजसेवेसाठी हे नेहमीच तत्पर असतात. तुम्ही जर योग्य मार्गाचा अवलंब करून लोकांना चांगली सेवा दिली तर आपल्या मूलभूत गरजा भागवण्याइतपत पैसा मिळवू शकतो शिवाय चांगलं काम केल्याचे समाधानही मिळते.

पैसा हा केवळ अनैतिक मार्गाचा वापर करूनच मिळवता येतो अस नाही तुम्ही जर नैतिक मार्गाचा अवलंब करून योग्य प्रकारे सेवा पुरवली, तुमच्या सेवेतील गुणवत्ता वाढवली तर भरपूर पैसे मिळता येतो तोही योग्य मार्गाने त्यासाठी आशा चुकीच्या गोष्टींचा अवलंब करण्याची गरज नसते.
 वैद्यकीय चिन्ह हेच सुचवते की डॉक्टर हे वाईट गोष्टीपासून आपलं संरक्षण करतात याशिवाय डॉक्टरांना पांढरा कोट असतो जो सभ्यता,नैतिकता, रुग्णांची काळजी, समाजसेवा आशा सकारात्मक गोष्टींचे प्रतीक आहे.
मात्र आज कट प्रॅक्टिस व अनेक गैरमार्ग असे प्रकार चालले आहेत हा वैद्यकीय क्षेत्राला लागलेला कलंक आहे.

फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!

आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel