पाण्याला जीवन असे म्हणतात.मानवी शरीरात ६०% पाणी असते लहान मुलांमध्ये हे प्रमाण ७५% तर वृद्धांमध्ये  हे प्रमाण ५०% असते. पाणी हा मानवी शरीरातील एक मुख्य घटक आहे जो शरीर योग्य प्रकारे कार्यरत राहण्यासाठी महत्वपूर्ण आहे त्यामुळे शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे गरजेचे आहे.

आपल्या शरीरातील विविध संस्था  स्वयंचलितरित्या पाण्याचे प्रमाण नियंत्रित करत असतात.

मात्र काही वेळा शरीरात जीवाणूचा शिरकाव झाल्यावर अतिसार/जुलाब, उलट्या होणे, उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होते त्यामुळे थकवा येणे,डोकेदुखी, स्नायू शिथिल होणे आशा समस्या जाणवतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर योग्य वेळी उपचार न घेतल्यास रूग्ण दगावण्याचीही शक्यता असते,खास करून बालकांमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन दगावण्याची शक्यता अधिक असते...


जेंव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर उपचारासाठी जलसंजीवनीचा वापर केला जातो. जलसंजीवनी हीच आशा वेळी जीवनदायी ठरते.


जलसंजीवनी ही आपण घरीही बनवू शकतो तसेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या सूत्रानुसार (फॉर्म्युला) जलसंजीवनीची तयार पाकिटे उपलब्ध आहेत जी पाण्यात टाकून आपण जलसंजीवनी बनवू शकतो इतकेच नव्हे तर पिण्यास तयार अशी जलसंजीवनीदेखील उपलब्ध आहेत.


घरच्या घरी बनवता येणारी जलसंजीवनी...


एक लिटर उकळून गार केलेले पाणी घेऊन त्यात आठ चमचे साखर, चार चिमटी मीठ आणि चवीपुरते लिंबू हे सर्व एकत्र करून घ्यावे.यामधून शरीराला त्वरीत पाणी , सोडियम व ऊर्जा मिळते.


याच्या जोडीला नारळाचे पाणी घेतले तर त्यातून पोटॅशियमची कमतरता भरून येते.


त्यामुळे हगवण / उलट्या होत असलेल्या व्यक्तीस ही जलसंजीवनी त्वरीत चालू करून दवाखान्यात जाईपर्यंत सतत पाजत रहावे.


जास्त प्रमाणात व जास्त दिवस हगवण होत असेल तर भूक मंदावते. अशावेळी जलसंजीवनी बरोबर फळांचे रस, ताक, डाळीचे पाणी व भाताची पेज इत्यादी घेणे आवश्यक आहे. त्यातून इतर पोषक घटक शरीराला मिळतात.



जागतिक आरोग्य संघटना सूत्रानुसार बनवलेली जलसंजीवनीतील घटक व त्यांचे प्रमाण...


३.५ ग्रॅम खायचे मीठ (सोडिअम क्लोराईड) + २० ग्रॅम साखर ( ग्लुकोज) + २.५ खाण्याचा सोडा( सोडा बाय कार्ब) + १.५ ग्रॅम पालाश (पोटॅशियम)

वरील सर्व घटक एकत्र करून बनवलेली पावडर मेडिकलमध्ये उपलब्ध असते ही पावडर एक लिटर पाण्यात मिसळून आपण जलसंजीवनी बनवू शकतो.

जास्त प्रमाणात व जास्त दिवस हगवण होत असेल तर भूक मंदावते. अशावेळी जलसंजीवनी बरोबर फळांचे रस, ताक, डाळीचे पाणी व भाताची पेज इत्यादी घेणे आवश्यक आहे. त्यातून इतर पोषक घटक शरीराला मिळतात.

यापुढे जर घरी, आजूबाजूला कोणाला हगवण / उलटी होत असेल तर सर्वात प्रथम ही जलसंजीवनी घरच्या घरी तयार करून त्याचा वापर सुरू करा.

जलसंजीवनीमुळे जुलाब/ उलट्या थांबणार नाहीत हे लक्षात घ्या. पण हगवणी व उलट्यांमुळे होणारी शरीरातील पाणी व क्षार यांची कमतरता भरून येईल. तेव्हा जुलाब/ पातळ शौचास/ उलट्या होत असतील तर डॉक्टरकडे तर जाच पण त्याआधी ताबडतोब त्या व्यक्तीस जलसंजीवनी चालू करा !

बालकांच्या शरीरातील पाण्याची कमतरता...

वरती नमूद केल्याप्रमाणे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बालकांमध्ये मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे अशा स्थितीत विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

जुलाब होणाऱ्या मुलाला भरपूर पातळ पदार्थ दयावेत. शहाळ्याचे पाणी दयावे. फळांचा ताजा रस दयावा. भाताची कांजी, भाताची पेज, भाज्यांचे सुप, वरण असे पदार्थ दयावेत. अंगावरचे दूध चालू ठेवावे.सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे बाळाला जल संजीवनी दयावी. एवढे करून फरक न पडल्यास डॉक्टरांना दाखवावे.

१.मुलांच्या शरीरातील पाणी संपल्यामुळे अतिसार होऊन मुले मरतात. त्यामुळे अतिसाराची सुरूवात आढळल्याबरोबर नेहमीच्या अन्नपाण्यासोबत जास्तीचे पातळ पदार्थ देणे आवश्यक आहे.

२.मुलास एका तासामध्ये बरेचदा पातळ शौचास झाल्यास किंवा विष्ठेमध्ये रक्त आढळल्यास त्याच्या जिवाला धोका आहे असे समजा व तातडीने कुशल आरोग्यसेवकाची मदत घ्या.

३.स्तनपान करविल्याने अतिसाराचे गांभीर्य व तीव्रता कमी होते.

४.अतिसार झालेल्या मुलाने नियमित जेवणे गरजेचे असते. अतिसारामधून बरे होणार्‍या मुलाने पुढील किमान दोन आठवडे एक जास्तीचे जेवण घ्यावे.

५.गंभीर अतिसारामुळे मुलास जलशुष्कता उर्फ डीहायड्रेशन झाले असल्यास फक्त तज्ञ आरोग्यसेवकाने शिफारस केलेले औषध किंवा जलसंजीवनी म्हणजेच ओरल रीहायड्रेशन सॉल्ट्स चा वापर करा. अतिसारावरील इतर औषधांचा अशा वेळी साधारणतः परिणाम होत नाही आणि त्यांमुळे मुलास धोका पोहोचू शकतो.

६.अतिसार टाळण्यासाठी विष्ठा शौचालयामध्येच करणे किंवा जमिनीत पुरणे गरजेचे आहे.

७.आरोग्याच्या चांगल्या सवयींमुळेदेखील अतिसारापासून संरक्षण मिळते. संडासास जाऊन आल्यानंतर तसेच एरवीदेखील अन्नास स्पर्श करण्यापूर्वी व मुलांना जेवण देण्याआधी हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवा.

संदर्भ:Practical Pharmaceutic,Principles of Anatomy and Physiology Tortora(Topics:Body fluid and Regulations), Marathi Vikaspedia, Wikipedia (अतिसार,जलसंजीवनी)


फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...

WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!

आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel