डोळ्यांनीच आपण ही सुंदर सृष्टी पाहू शकतो, असा हा डोळा आपल्या शरीराचा अतिशय संवेदनशील अवयव आहे त्यामुळे त्याची काळजी घेणे ही तितकेच आवश्यक आहे.
बऱ्याचदा डोळ्यांना झालेले आजार किंवा डोळे दुखत असतील आशा वेळी डॉक्टर आय ड्रॉप लिहून देतात असे आय ड्रॉप वापरताना आपण काय काळजी घ्यायला हवी याची माहिती घेणार आहोत.
डोळा हा अतिशय संवेदनशील असल्या कारणाने आय ड्रॉप हे आशा प्रकारे बनवलेले असतात की ते पूर्णपणे सूक्ष्मजीवांपासून मुक्त असतील या इंग्रजी मध्ये sterilization म्हणतात. त्यामुळे अशा औषधांची समाप्ती तारीख ही जरी एक किंवा दोन वर्षांची असली तरी औषध फोडल्यापासून एक महिन्यापर्यंतच आपण ही औषधे वापरू शकतो. आय ड्रॉप फोडल्यावर एक महिन्या नंतर असा आय ड्रॉप वावरू नये कारण एक महिन्यांपर्यंतच ते सूक्ष्म जीवांपासून मुक्त असते (sterility टिकून असते.
त्यामुळे *जरी त्यावर समाप्ती तारीख अजून पुढची असेल तर फोडल्यापासून एक महिन्यापर्यंतच आय ड्रॉप वापरावा (अशी सूचना देखील आय ड्रॉप वर असते)*
काही ड्रॉप हे डोळे (Eye) व कांनांसाठी (Ear) आशा दोन्ही साठी असतात तर काही ड्रॉप फक्त डोळे किंवा फक्त कान यासाठीच असतात त्यामुळे ते औषध कशासाठी आहे हे पाहूनच वापरावे. बऱ्याचदा आशा घटना घडल्या आहेत की चुकीचे औषध वापरल्याने डोळे खराब झाले आहेत. त्यामुळे ही औषधे वापरताना नीट काळजी घ्यावी.
आय ड्रॉप च्या ड्रॉपरला आपल्या हाताने स्पर्श करू नये.
वावरून झाल्यावर झाकण (कॅप ) नीट जोरात बंद करावे.
आय ड्रॉप व इतर औषधे देखील थंड व कोरड्या जागेत ठेववीत. टीव्ही फ्रीज अथवा इतर कुठेही ठेवू नयेत.शक्यतो सर्व औषधे ही लहान मुलांपासून दूर ठेवावीत.
फार्मसिस्ट व त्याची तुमच्या आरोग्यासंदर्भातील भूमिका याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा फार्मसिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
बुकस्ट्रक संकेतस्थळावर उपलब्ध शिवाय हे सर्व लेख आता गुगल प्लेस्टोरवर Health and Pharmacist या नावाने Application च्या स्वरूपात देखील उपलब्ध आहेत.
Bookstruck website link
http://web.bookstruck.in/book/show/1258
Google Play Store App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.health.arogya
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६