या आधी आपण कम्युनिटी फार्मासिस्ट व हॉस्पिटल फार्मासिस्ट बद्दल माहिती घेतली आहे.कम्युनिटी व हॉस्पिटल फार्मासिस्ट दोघांची भूमिका ही औषध वितरण,रुग्ण समुपदेशन,रुग्ण इतिहासाची नोंद ठेवणे आहे.हॉस्पिटल फार्मासिस्टची भूमिका ही थोडी व्यापक आहे जसे की हॉस्पिटलमध्ये औषध साठा नियंत्रण करणे,परिचारिका केंद्रावरील औषधांचे नियोजन करणे.तथापि क्लिनिल फार्मासिस्टची भूमिका ही अत्यंत व्यापला स्वरूपाची आहे.क्लिनिकल फार्मासिस्टचे काम हे आरोग्य यंत्रणेनेतील डॉक्टर, परिचारिका(नर्स) यांच्याबरोबरीने चालते.केवळ औषध वितरण न करता आरोग्य यंत्रणेतील एक महत्वपूर्ण भाग आशा स्वरूपाची त्याची भूमिका दिसून येते.क्लिनिकल फार्मासिस्ट हा देखील नोंदणीकृत फार्मासिस्ट असतात तथापि त्यांची शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण हे विशेष दर्जाचे असते जेणेकरून ते आरोग्य यंत्रणेतील इतर घटकांबरोबर मिळून व्यापक स्वरूपाची आरोग्य सेवा पुरवू शकतील.
क्लिनिकल फार्मासिस्टची आरोग्य यंत्रणेतील भूमिका
क्लिनिकल फार्मासिस्ट हा डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील इतर घटकांबरो सहयोगी भूमिका बजावत उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कार्यरत असतो.
१)रुग्णांचे मूल्यांकन करणे-
यामध्ये क्लिनिकल फार्मासिस्ट रुग्ण वैद्यकीय नोंद(पेशंट मेडिकल रेकॉर्ड) याचा सखोल अभ्यास करून रुग्णाची वैद्यकीय स्थिती जाणून घेणे.याचबरोबर रुग्णाला भेटून संपूर्ण रुग्ण इतिहास जाणून घेणे.
मिळालेल्या माहितीचा अभ्यास करणे.
रुग्णाच्या समस्या व वैद्यकीय गरज याला प्राधान्य देणे.
२)औषधोपचाराचे मूल्यमापन करणे-
डॉक्टर व इतर आरोग्यविषयक सहकाऱ्यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या औषध उपचाराचे मूल्यांकन करणे.
यामध्ये औषधोपचार पध्दतीचे ध्येय,औषध उपचार पद्धती संबंधित समस्या शोधणे.
३)औषध उपचार पद्धतीचा पाठपुरावा करणे-
रुग्णांना भेटून औषध उपचार पद्धती कितपत परिणामकारक आहे हे पाहणे.
४)वैद्यकीय नोंदी बनवणे-
रुग्णाच्या आरोग्याशी संबंधित वैद्यकीय नोंदी ठेवणे,ज्याचा भविष्यात रुग्णांना योग्य प्रकारे आरोग्यविषयक सेवा पुरवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.त्याच्याशिवाय या नोंदी शिकाऊ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी संदर्भ,तसेच केस स्टडी म्हणून वापरता येतात.
भारतामध्ये क्लिनिकल फार्मासिस्ट सराव हा नवोदित स्वरूपाचा आहे असे म्हणायला हवे.काही ठराविक व मोठमोठ्या रुग्णालयात आशा स्वरूपाचा सराव चालतो.
फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!
आशिष अरुण कर्ले.
गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)
ashishkarle101@gmail.com
९७६५२६२९२६
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.