विषय- मराठा समाज आणि आरक्षण
मराठा म्हटल्यावर टुमदार घर पाच पन्नास एकर जमीन अस चित्र लोकांसमोर उभ राहत. परंतु आज अशी परिस्थिती राहिली नाही काळाच्या ओघात पिढ्यानपिढ्या होणारे शेतीचे तुकडेकरण यामुळे मराठा समाजाची परिस्थिती खूपच हालाकिची झाली आहे. त्यातच आरक्षण नसल्यामुळे शैक्षणिक आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात मराठा समाज पिछाडीवर गेलेला आहे आज शेती कारखाण्यात 7 8 हजाराची बिनभरोषाची नोकरी अथवा मुंबईत मोलमजुरी इथपर्यंतच मराठा समाज खितपत पडला आहे,त्यामुळे आरक्षण ही आमची गरज आहे आणि ती फक्त गरज नाही तर तो आमचा अधिकार आहे.
एक काळ असा होता जेव्हा आमचा मराठा समाज हा इतर सर्व समाजांच्या कुटुंबप्रमुखाची भुमिका बजावत होता पण आज जी काही आमची परिस्थिती आहे तिला पुर्णपणे सरकारची आरक्षण पद्धती कारणीभूत आहे. एका विशिष्ट काळाकरता समाजातील काही घटकांना आरक्षणाची गरज होती मात्र हे आरक्षण कायमस्वरूपी राहिल्यामुळे खुल्या वर्गातील समाजाची खुप बिकट परस्थिती निर्माण झाली आहे. आज जर आमच्या मराठा समाजाला या हालाकिच्या स्थितीवरुण बाहेर काढायचे आसेल तर आरक्षण ही आमची तातडीची गरज आहे.
आणि आम्ही आरक्षण मागताना आमचा संयम शेवटपर्यंत जपलाय. आम्ही आरक्षण मागताना हरियाणातील जाट आणि गुजरातमधील पटेल समाजाप्रमाणे जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान नाही केले. 8 आॅगस्ट 2016 पासून आजपर्यंत एवढे मोर्चे निघाले लाखोंच्या सख्येने लोक रस्त्यावर उतरले पण कुठेही कसलही नुकसान केल नाही सर्व मोर्चे हे मुक मोर्चे हे शांततेत होते हे मोर्चे कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हते पण तरीही काही समाज माध्यमांनी आणि काही समाजकंटकांनी आमचे मोर्चे हे काही समाजांच्या विरोधात आहेत असा चुकीचा प्रचार केला. पण वास्तविकता ही आहे की आमचे मोर्चे हे फक्त आणि फक्त आमच्या हक्कांसाठी आणि आमच्या न्यायसाठी होते.
9 ऑगस्ट 2017 रोजी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरतोय आमचा हाही मोर्चा मुक मोर्चा असणार आहे. आम्ही शांततामय मार्गाने आमच्या मागण्या सरकारसमोर मांडणार आहोत. सरकारणे डोक ठिकाणावर ठेवून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा भविष्यात होणार्या मराठा समाजाच्या उद्रेकाला हे सरकारच सर्वस्वी जबाबदार असेल!
मराठा क्रांती मुक मोर्चांना कोपर्डी घटना ही केवळ निमित्त होते मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणाऱ्या लाखो मराठ्यांमध्ये कित्येक वर्षांपासून मान्य न झालेल्या मागण्या आणि या दयनीय अवस्थेबद्दलचा असंतोष धगधगताना दिसत होता.
आमचे सर्व मोर्चे हे शांततेत निघाले ही आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणुक नम्रपणा आणि समजूतदारपणा यामुळे होते. येत्या 9 ऑगस्ट आमचा मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरतोय तोही शांततेच्या मार्गाने!
मात्र आता जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आमच्या मराठा समाजाच्या असंतोषाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.
आशिष अरुण कर्ले.
32 शिराळा, सांगली.
एक मराठा लाख मराठा
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.