अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् ।
आर्षभाणां च संवादं विदेहस्य महात्मनः ॥१४॥
येच अर्थी विदेहाचा प्रश्न । संवादती आर्षभ नवजण ।
ते भागवतधर्म जीर्ण । इतिहास संपूर्ण सांगेन ऐक ॥१३०॥
आर्षभ कोण म्हणसी मुळीं । त्यांची सांगेन वंशावळी ।
जन्म जयांचा सुकुळीं । नवांमाजीं जाहली ब्रह्मनिष्ठा ॥३१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.