नवाभवन्महाभागा मुनयो ह्यर्थशंसिनः ।

श्रमणा वातरशना आत्मविद्याविशारदाः ॥२०॥

ऋषभकुळीं कुळदीप । स्नेहसूत्रेंवीण देदीप्य ।

नवही जण स्वयें सद्रूप । सायुज्यस्वरुपप्रकाशक ॥७२॥

आत्माभ्यासीं परिश्रम । करुन निरसिलें कर्माकर्म ।

यालागीं ते अकृताश्रम । निजनिभ्रम स्वयें जाहले ॥७३॥

शाब्दबोधें सदोदित । ब्रह्मज्ञानपारंगत ।

शिष्यप्रबोधीं समर्थ । परमाद्भुत अतिदक्ष ॥७४॥

ते ब्रह्मविद्येचें चालतें डिंब । त्यांचे अवेव ते ब्रह्मकोंब ।

ते विद्येचें पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ परब्रह्म ॥७५॥

दशदिशा एकूचि दोरा । भरुनि पांघरुणें मुनीश्वरा ।

वारा वळून कडदोरा । बांधिला पुरा ग्रंथीरुप ॥७६॥

आकाशाच्या ठायीं । अंबरत्व केलें तिंहीं ।

ते चिदंबर पाहीं । एकचि नवांही पांघरुण ॥७७॥

प्राणापान वळूनि दोन्ही । गांठी केली नाभीच्या ठायीं ।

तंव जीवग्रंथी सुटली पाहीं । तेंचि नवांही ब्रह्मसूत्र ॥७८॥

ऐसे परब्रह्मवैभवें । निडारले निजानुभवें ।

त्यांचीं सांगेन मी नांवें । यथागौरवें तें ऐक ॥७९॥

ज्यांचें नाम ऐकतां । कांपत काळ पळे मागुता ।

संसार नुघवी माथा । नाम स्मरतां जयांचें ॥१८०॥

त्यांचिया नामांची कीर्ती । आईक सांगेन परीक्षिती ।

ज्यांचेनि नामें आतुडे मुक्ती । जाण निश्चितीं भाविकां ॥८१॥

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel