इत्थं कर्मगतीर्गच्छन् बह्वभद्रवहाः पुमान् ।
आभूतसंप्लवात्सर्गप्रलयावश्र्नुतेऽवशः ॥७॥
होता पूर्णत्वें जो स्वतंत्र । तो झाला कर्मपरतंत्र ।
नानाकर्मगतिपात्र । दुःखसुखक्षेत्र सदा वाहे ॥४४॥
मानोनि विषयांचें सुख । देखतदेखतां घेतलें विख ।
त्याचें अगणित असुख । जन्मकोटी दुःख सोशिताम न सरे ॥४५॥
दुःखावरी दुःखांचे आवर्त । मोहशोकांचे गर्ती पडत ।
अतियातनेमाजीं बुडत । सदा उकडत काळाग्नीं ॥४६॥
ऐसे सोशितां दुःखशोक । पुढें अवचितां एकाएक ।
महाप्रळयाचा भडका देख । निकट सन्मुख अंगीं वाजे ॥४७॥
तेथें मागें न वचे काढिला पावो । पुढें निघावया नाहीं वावो ।
निजकर्में बांधिला पहा वो । प्रळयाचा घावो मस्तकीं वाजे ॥४८॥
उत्पत्तिस्थितिप्रकरण । तुज सांगितलें संपूर्ण ।
आतां प्रळयाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥४९॥;
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.