इति भागवतान् धर्मान् शिक्षन् भक्त्या तदुत्थया ।

नारायणपरो मायामञ्जस्तरति दुस्तराम् ॥३३॥

ऐशी भागवतधर्मस्थिति । शरण जा‍ऊनि सद्गुरूप्रति ।

अभ्यासावी भगवद्भक्ति । तैं मायेची शक्ति बाधूं न शके ॥६१५॥

माया वेदशास्त्रां अनावर । ब्रह्मादिकां अतिदुस्तर ।

ते सुखें तरती भगवत्पर । हरिनाममात्र-स्मरणार्थें ॥६१६॥

हरिनामाच्या गजरापुढें । माया पळे लवडसवडें ।

यालागीं तरणोपावो घडे । सुख सुरवाडे हरिभक्तां ॥६१७॥

परात्पर नारायणाची माया । भजतां नारायणाच्या पायां ।

सुखेंचि तरिजे गा राया । त्या भजन‍उपाया सांगितलें ॥६१८॥

मायातरणोपायस्थिति । राया तुवां पुशिली होती ।

तदर्थीं मुख्य भगवद्भक्ति । जाण निश्चितीं नृपनाथा ॥६१९॥

भक्तीपाशीं नित्य तृप्ति । भक्तीपाशीं नित्यमुक्ति ।

भक्तीपाशीं भगवत्प्राप्ति । मायानिवृत्ति हरिभजनें ॥६२०॥

हरिनामभजनकल्लोळें । माया जीवित्व घे‍ऊन पळे ।

भक्त तरती बाळेभोळे । हरिभजनबळें महामाया ॥६२१॥

करितां नरायणाची भक्ती । निजभक्त सुखें माया तरती ।

ते नारायणाची मुख्य स्थिती । स्वयें चक्रवर्ती पुसतु ॥६२२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel