साङगोपाङगां सपार्षदां तां तां मूर्तिं स्वमन्त्रतः ।
पाद्यार्घ्याचमनीयाद्यैः स्नानवासोविभूषणैः ॥५२॥
करचरणादि अव्यंग । मूर्ति चिंतावी सुंदर साङग ।
श्याम मनोहर श्रीरंग । उल्हास चांग निजध्यानीं ॥८३०॥
मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ।
सुनंदादि पार्षदमेळ । चिंतावे सकळ आयुधादिक ॥८३१॥
यथोक्त मधुपर्कविधान । अर्घ्यपाद्यादि आचमन ।
पुरुषसूक्तमंत्रें जाण । करावें स्नान निर्मळ जळें ॥८३२॥
मुकुट कुंडलें कटी मेखला । कांसे मिरवे सोनसळा ।
आपाद रुळे वनमाळा । कौस्तुभ तेजाळा कंठीं झळके ॥८३३॥
पाद पद्मांकित सुकुमार । ऊर्ध्वरेखा ध्वज वज्र ।
वांकी अंदुवांचा गजर । चरणीं तोडर गर्जतु ॥८३४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.