गन्धमाल्याक्षतस्त्रग्भिर्धूपदीपोपहारकैः ।
साङगं संपूज्य विधिवत्स्तवैः स्तुत्वा नमेद्धरिम् ॥५३॥
निढळीं शुद्ध श्यामकळा । टिळकु रेखिला पिंवळा ।
त्यावरी अक्षता सोज्ज्वळा । आरक्त तेजाळा कुंकुमाक्त ॥८३५॥
सुमनें गुंफिली वीरगुंठी । त्यांवरी मधुकरांची घरटी ।
तुळसीकमळमाळा कंठीं । चंदनाची उटी श्यामांगीं शोभे ॥८३६॥
धूप दीप उपहार । तांबूल अर्पावा सकर्पूर ।
निरंजनें जयजयकार । मंत्रावसर अर्पावा ॥८३७॥
स्तुति करावी वेदोक्त मंत्रें । कां पुराणोक्त नाना स्तोत्रें ।
अथवा प्राकृत नामोच्चारें । नाना प्रकारें गद्यपद्यें ॥८३८॥
स्तवनें संतोष अधोक्षजा । ऐसें भावावें महाराजा ।
मग साष्टांगें अतिवोजा । गरुडध्वजा नमस्कारावें ॥८३९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.