आदावभूच्छतधृती रजसाऽस्य सर्गे विष्णुः स्थितौ क्रतुपतिर्द्विजधर्मसेतुः ।

रुद्रोऽप्ययाय तमसा पुरुषः स आद्य । इत्युद्भवस्थितिलयाः सततं प्रजासु ॥५॥

तोचि आदिकल्पीं उत्पत्ती । रजोगुणें राजसा शक्तीं ।

स्वयें झाला शतधृती । 'ब्रह्मा' म्हणती जयातें ॥५७॥

एवं ब्रह्मरूपें उत्पत्ति । सृजिता झाला राजसा शक्तीं ।

तेथें प्रतिपाळावया स्वधर्मस्थिति । सत्त्वगुणें निश्चितीं 'श्रीविष्णु' जाहला ॥५८॥

तो द्विजधर्मप्रतिपाळणु । यज्ञभोक्ता श्रीविष्णु ।

देखतां धर्माचा अवगुणु । अवतरे नारायणु नानावतारीं ॥५९॥

तोचि ये सृष्टीचे प्रांतीं । तमोगुणें तामसा शक्तीं ।

स्वयें जाहला 'रुद्रमूर्ति'। सकळ कल्पांतीं निर्दाळितु ॥६०॥

जो शेताची पेरणी करी । तोचि राखे देखे सोकरी ।

तोचि वाळलियावरी । संवगणी करी सर्वांची ॥६१॥

तेवीं उत्पत्तिकाळीं तोचि ब्रह्मा । स्थितिकाळीं तोचि विष्णुनामा ।

प्रळयाकाळींही रुद्रपमा । ये पुरुषोत्तमा तेचि नामें ॥६२॥

यालागीं तो आदिकर्ता । श्रुतिशास्त्रीं दृढ वार्ता ।

दक्षकश्यपादिकां कर्तव्यता । त्यांसी समर्थता याचेनि ॥६३॥

यापरी विचारितां । हाचि एक सकळ कर्ता ।

यावांचून कर्तव्यता । अणुमात्रता नव्हे आना ॥६४॥

जो सृष्टीपूर्वीं स्वयंभ असे । जेणें उत्पत्तिस्थितिप्रळयो भासे ।

तोचि आदिकर्ता अनायासें । तोचि निजांशें पुरुषावतारु ॥६५॥

ऐक राया अतिविचित्र । जें परिसतां पुण्य पवित्र ।

तो नारायणाचा अवतार । ज्याचें चरित्र अलोलिक ॥६६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel