इति प्रगृणतां तेषां स्त्रियोऽत्यद्भुतदर्शनाः ।
दर्शयामास शुश्रूषां स्वर्चिताः कुर्वतीर्विभुः ॥१२॥
अपकार्यां उपकार करिती । या नांव 'निर्विकार निजशांति' ।
तेचि शांतीची परिपाकस्थिति । विघ्नकर्त्याप्रती हरि दावी ॥७८॥
सांगोनियां आपुली स्थिती । कामादिक स्तुति करिती ।
तंव परमाश्चर्य देखती । स्त्रिया अत्यद्भुती अकस्मात ॥७९॥
स्वरूप वैभव अळंकार । श्रियेहूनियां सुंदर ।
सेवेलागीं अतितत्पर । सदा सादर सावधानें ॥१८०॥
नवल लाघव नारायणा । कैसें यां दाखविलें विंदाना ।
त्या स्त्रियांखालीं स्वर्गांगना । दिवा खद्योत जाण तैशा दिसती ॥८१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.