गुप्तोऽप्यये मनुरिलौषधयश्च मात्स्ये क्रोडे हतो दितिज उद्धरताऽम्भसः क्ष्माम् ।
कौर्मे धृतोऽद्रिरमृतोन्मथने स्वपृष्ठे ग्राहात्प्रपन्नमिभराजममुञ्चदार्तम् ॥१८॥
तेणेंचि 'मत्स्यावतारें' । प्रलयकालांबुमहाभारें ।
मनूसगट रक्षिलें धरे । निजनिर्धारें औषधींसीं ॥१६॥
तेणेंचि 'कमठावतारा' । स्वपृष्ठीं धरूनि गिरिवरा ।
मंथोनिया क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिलें ॥१७॥
श्वेतवाराह महामूर्ति । धरेनें केली पूर्ण भक्ति ।
तिसी उद्धरोनि कृपामूर्ति । अभिनव शांति अर्पिली ॥१८॥
तेणें आर्तत्राणा तांतडी । वैकुंठींहून घालोनि उडी ।
'गजाचें ग्राहबंधन तोडी' । उद्धरिलें आवडीं गजेंद्रातें ॥१९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.