द्विषन्तः परकायेषु स्वात्मानं हरिमीश्वरम् ।

मृतके सानुबन्धेऽस्मिन्बद्धस्नेहाः पतन्त्यधः ॥१५॥

परमात्मा जो श्रीहरी । तो अंतर्यामी सर्व शरीरीं ।

तेथ पराचा जो द्वेषु करी । तेणें द्वेषिला हरि निजात्मा ॥८१॥

परासी जो करी अपघातु । तेणें केला निजात्मघातु ।

त्यासी सकुटुंब अधःपातु । रौरवांतु ते बुडती ॥८२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel